Maharashtra 12th Result 2026 : परीक्षा मंडळ मोठा निर्णय घेणार, आता 12 वीची परीक्षा कागदावर होणार नाही? काय दिले संकेत ?

महाराष्ट्र बोर्डाचा 12वी निकाल 89.79% लागला असून, कोकण विभाग अव्वल आहे. मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली. पर्यावरण रक्षणासाठी बोर्ड भविष्यात 12वीच्या परीक्षा डिजिटल घेण्याचा विचार करत आहे. तसेच, आता निकालानंतर १५ दिवसांत मार्कशीट व सर्टिफिकेट मिळणार असून, त्यावर फोटो आणि QR कोड असेल, ज्यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.

Maharashtra 12th Result 2026 : परीक्षा मंडळ मोठा निर्णय घेणार, आता 12 वीची परीक्षा कागदावर होणार नाही? काय दिले संकेत ?
12 वी परीक्षेबद्दल अपडेट्स
Image Credit source: social media
| Updated on: May 02, 2026 | 12:44 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा रिझल्ट आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 89.79 लागला असून दरवर्षीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, 94 टक्के लागला आहे. तर लातूरचा निकाल सर्वात कमी, 84 टक्के लागला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून 93.15 टक्के मुली तर 86.80 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. निकालाचं सविस्तर वाचन करतानाच बोर्डाने निकालाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी मार्कशीटमध्ये काही बदलही केल्याचं नमूद केलं.

तसंच कागदांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगत बोर्डातर्फे काही बदल होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. 12 वीची परीक्षा कागदावर घेण्यासंदर्भात बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

काय दिले संकेत ?

निकालाचे सविस्तर वाचन करताना बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी कागदाच्या वापरबद्दलही माहिती दिली. परीक्षेसाठी जवळपास दोन हजार मॅट्रिक टन कागद वापरला. दोन हजार टन कागद वापरला जातो. मी जाणीवपूर्व किती कागद खर्च करतो हे सांगितलं. कागद हा झाडांपासून येतो. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे आपण रोज ऐकतोय. त्यामुळे आता 12 वीची परीक्षा डीजिटल घेता येईल का हे पाहावं लागणार आहे, असं अधिकाऱ्यांन नमूद केलं. 20-20 टनाचे 100 ट्रक एवढा कागद आपल्याला परीक्षेसाठी दरवर्षी लागतो. हा पर्यावरणाचा मोठा ऱ्हास आहे. त्यामुळे आता 12 वीची परीक्षा कागदावर न्वहे तर डिजीटली होण्याची शक्यता आहे. हाँ मोठा बदल लवकरत होऊ शकतो.

यावेळी बारामतीच्या कस्टडीवरून केंद्रावर पेपर वाहण्यासाठी जीपीएस ट्रंक वापरली होती. कुणीही प्रश्नपत्रिकेत छेडछाड होऊ नये म्हणून डीजिटल प्रणाली वापरली. हा प्रयोग सेफ झाला, असही त्यांनी नमूद केलं.

आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी

यापूर्वी निकालानंतर मार्कशीट दहा दिवसात मिळायची तर सर्टिफिकेट 6 महिन्याने मिळायचं. मात्र आता पहिल्यांदाच मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळेल. म्हणजे निकाल लागल्यापासून 15 व्या दिवशी मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. मार्कशीटवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि क्यूआरकोड असणार आहे. या सर्वांसाठी ३ कोटींची बचत केली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आधी मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर पूर्वी आधी आडनाव यायचं. आता अपार किंवा आधारवर जसं नाव असतं. तसंच पहिलं विद्यार्थ्याचं नाव, नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव देणार आहोत.

7 वेबसाईटसवर लागणार निकाल

12 वीचा निकाल, दुपारी 1 वाजता सात वेबसाईटवर डिक्लेअर करण्यात येईल. मंडळाची वेबसाईट, डीजीलॉकर, एमकेसीएल, टार्गेट पब्लिकेशन, नवनीत, टीव्ही९ मराठी, इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करणार आहोत. सर्व विद्यार्थी एकावेळी आले तरी साईटवर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे.

तुमचा निकाल पाहण्यासाठी इथे नाव आणि नंबर टाका…

 

Follow Us