AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घराच्या भिंतींवर अडकवलेल्या या पाच वस्तू बनतात वास्तुदोषाचं कारण, घरात येते नकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार अशा काही विशिष्ट वस्तू असतात, ज्या वस्तू कधीही भिंतीला अडकवल्या नाही पाहिजेत. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Vastu Shastra : घराच्या भिंतींवर अडकवलेल्या या पाच वस्तू बनतात वास्तुदोषाचं कारण, घरात येते नकारात्मक ऊर्जा
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 8:47 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी एवढीच माहिती देण्यात आलेली नाहीये तर तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी आणि जर तिची दिशा चुकली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची माहिती देखील वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्ही तुमच्या घरात असलेल्या काही विशिष्ट वस्तू चुकीच्या दिशेला ठेवतात तेव्हा त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्या घरावर संकट येण्यास सुरुवात होते. जसं की घरात काहीही कारण नसताना अचानक भांडणाला सुरुवात होते, पत्नी -पत्नीचं पटत नाही. एखादं अचानक मोठं आर्थिक संकट येते, त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं आवश्यक असतं. घरात निर्माण झालेला वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या भिंतीला अशा काही वस्तू अडकवतो, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

बंद पडलेलं घड्याळ – वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे वेळ आणि गतिचं प्रतिक आहे. त्यामुळे ते नेहमी सुरू असलं पाहिजे. घरात बंद पडलेलं घड्याळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो, तुमच्या यशाची गती कमी होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये.

फुटलेला आरसा – वास्तुशास्त्रानुसार घरात कोणतीही तुटलेली वस्तू नसावी, घरातील भितींला कधीही फुटलेला आरसा लावू नये, तसेच फुटलेल्या आरशात तोंड देखील पाहू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, वास्तुदोष तयार होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

फुटलेले फोटो – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही फुटलेले फोटो भिंतीला लावू नये, या फोटोंमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ज्याचा परिणाम हा तुमच्या प्रगतीवर होत असतो, तसेच तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे देखील येऊ शकतात. त्यामुळे असे फोटो कधीही घराच्या भितींवर लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो – वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतीवर कधीही युद्धाचे प्रसंग असलेले फोटो नसावेत. यामुळे घरात गृहकलह वाढतो, तसेच मनाची अस्वस्थता देखील वाढते, असं वास्तुशास्त्र सांगतं.

सुखलेली फुलं – अनेकजण आपलं घर डेकोरेट करण्यासाठी सुखलेल्या फुलांचा वापर करतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार अशी फुलं कधीही घराच्या भिंतीवर लावू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?