AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2025 Date : राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत, निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

Maharashtra Election 2025 Date : राज्यात आचारसंहिता लागू, अखेर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2025 | 4:35 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर आता प्रतिक्षा संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली,  या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगरपरिषद आणि नगर पंचायतीसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

काय म्हणाले निवडणूक आयुक्त? 

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे.  तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी  निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून  105 नगर पंचायतीची मुदत संपलेली नाहीये.

निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा

राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. 17  नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर  21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर  तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान दुसरीकडे निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे, याला देखील निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.  दुबार तिबार मतदारांबाबत आम्ही काही प्रक्रिया केल्या आहेत. निवडणूक आयोग कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. दुबार तिबार मतदारांबाबत कारवाई करता येते. क्लेरिकल मिस्टेक दूर करत आहोत. प्रभाग चुकला असेल तर आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाव नसेल तर तेही दुरुस्त करतो, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा