AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election Vote Percentage : महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला, आतापर्यंत कुठे किती टक्के मतदान?

या मतदानाची सकाळी ११.३० वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. आता विविध जिल्ह्यांत मतदानाच्या टक्केवारीची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Election Vote Percentage : महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला, आतापर्यंत कुठे किती टक्के मतदान?
Maharashtra voting
| Updated on: Dec 02, 2025 | 1:12 PM
Share

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निमित्ताने मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासूनच अनेक ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये झालेले तांत्रिक बिघाड, मतदारांच्या यादीतील गोंधळ वगळता सर्वत्र सुरळीत मतदान सुरु आहे. आता या मतदानाची सकाळी ११.३० वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. आता विविध जिल्ह्यांत मतदानाच्या टक्केवारीची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात सकाळी 11.30 पर्यंत 17.57 टक्के मतदान झाले आहे. यात त्र्यंबकेश्वरमध्ये 31.55 टक्के इतक्या सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर येवल्यात 10.46 टक्के सर्वात कमी मतदान झाले आहे. यापाठोपाठ इगतपुरीमध्ये 11.30 पर्यंत एकूण 4801 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात 2629 पुरुष, 2171 स्त्रियांचा समावेश आहे. यामुळे मतदानाचा टक्का 19.14 टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 19.79 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

नगरपरिषद मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
बुलढाणा 14.87%
चिखली 12.00%
जळगाव जामोद 20.88%
खामगाव 20.98%
लोणार 22.27%
मलकापूर 24.70%
मेहकर 23.39%
नांदुरा 21.45%
शेगाव 21.11%
सिंदखेड राजा 23.48%
सरासरी 19.79%

हिंगोलीत सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 22.41 टक्के नोंदवली गेली आहे. तर गडचिरोली दुपारी १२ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. गडचिरोली नगर परिषदेत 23.82 टक्के, देसाईगंज या ठिकाणी 22.18 टक्के, आरमोरीत 21.98 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकेसाठी दोन तासात 27.29 टक्के मतदान झाले आहे. यात तळोदा नगरपालिकेसाठी सर्वाधिक 8.58 टक्के मतदान झाले, तर नंदुरबारमध्ये 5.21 टक्के, शहादामध्ये 8.09 टक्के, नवापूरमध्ये 6.41 टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली. तसेच नांदेड जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत सरासरी 19.95 टक्के मतदान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

नगरपालिका / नगरपंचायत मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
देगलूर 24.04%
बिलोली 24.38%
कुंडलवाडी 26.38%
उमरी 13.30%
मुदखेड 19.36%
भोकर 17.75%
हिमायतनगर 26.39%
किनवट 15.51%
हदगाव 13.50%
लोहा 21.20%
कंधार 17.60%

सातारा जिल्ह्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून मेढा नगरपंचायतीत सर्वाधिक 39.39 टक्के मतदान झाले आहे.

शहर/नगरपरिषद मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
मेढा 39.39%
रहिमतपूर 28.80%
म्हसवड 23.33%
मलकापूर 21.90%
वाई 20.80%
कराड 19.44%
सातारा 18.12%
पाचगणी 15.35%

पुणे जिल्ह्यात 11.30 पर्यंत सरासरी 20.22 टक्के मतदान नोंदवले गेले असून मंचर नगरपंचायतीत सर्वाधिक मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
मंचर (नगरपंचायत) 27.83%
चाकण नगरपरिषद 23.60%
जुन्नर नगरपरिषद 21.03%
राजगुरनगर नगरपरिषद 17.24%
शिरूर नगरपरिषद 13.23%

यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये मतदारांचा उत्साह मध्यम स्वरूपात आहे. ढाणकी नगरपंचायतीत सर्वाधिक मतदान झाले.

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
ढाणकी (नगरपंचायत) 23.50%
दिग्रस 19.15%
वणी 18.76%
दारव्हा 18.51%
उमरखेड 18.43%
आर्णी 17.53%
घाटंजी 16.21%
पांढरकवडा 15.85%
पुसद 15.74%
नेर 11.99%
एकूण टक्केवारी 18.26%

अहिल्यानगर जिल्ह्यात 8 नगरपरिषदेसाठी सरासरी 19.55 टक्के मतदान झाले.

नगरपरिषद मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
जामखेड 27.14%
राहता 23.82%
संगमनेर 21.65%
शेवगाव 20.14%
राहुरी 19.83%
श्रीगोंदा 16.81%
शिर्डी 16.46%
श्रीरामपूर 15.80%

सोलापूर जिल्ह्यात ११.३० पर्यंत सरासरी 19.46 टक्के मतदान झाले. दूधनी नगरपालिकेत सर्वाधिक 31.37 टक्के मतदान झाले आहे. करमाळा नगरपरिषदेत 23.17 टक्के मतदानाची नोंद झाली.

नगरपालिका मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
दूधनी 31.37%
मैंदर्गी 26.99%
मोहोळ 24.43%
करमाळा 23.17%
अकलूज 22.62%
अक्कलकोट 21.94%
बार्शी 19.58%
सांगोला 17.46%
पंढरपूर 15.00%
कुर्डुवाडी 12.81%

पालघर जिल्ह्यात मतदानाला मध्यम प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत मतदानाची टक्केवारी (११.३० पर्यंत)
डहाणू नगरपरिषद 21.15%
वाडा नगरपंचायत 19.55%
पालघर नगरपरिषद 19.31%
जव्हार नगरपरिषद 18.93%

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ