AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022 Ward 29 : आगामी निवडणुकीतही प्रभाग क्र. 29 मध्ये कोण राखणार गड; भाजप की शिवसेना

आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांसह 26 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसह महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अवघड जाणार आहे.

AMC Election 2022 Ward 29 : आगामी निवडणुकीतही प्रभाग क्र. 29 मध्ये कोण राखणार गड; भाजप की शिवसेना
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 28, 2022 | 10:06 AM
Share

राज्यातील महानगरपालिका निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. राज्यात सध्या शिवसेनेतून फुटून गेलेला शिंदे गट भाजपला सोबत घेत राज्यात आता स्थानिक पातळीवरही आपलीच सत्ता आणण्यासाठी सक्रीय झाला आहे. तर महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कंबर कसली आहे. पण अकोला महानगरपालिकेत (Akola Municipal Corporation) जे 2017 ला झालं ते यावेळी होईल असे नाही. कारण आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांसह 26 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेसह महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अवघड जाणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commissions) आदेशानुसार अकोला महानगरपालिकेत प्रभागनिहाय आरक्षण सोडत ही झाली आहे. ज्यामुळे अनेक दिग्गजांचा प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना हादरा बसला आहे. दरम्यान प्रभाग क्र. 29 (Akola Muncipal Corporation Ward No.29) मध्ये प्रभाग क्र. 29 अ अनुसूचित जमाती, 29 ब सर्वसाधारण महिला आणि 29 क सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. त्यामुळे येथे कोण बाजी मारतं हे ही पहावं लागेल.

पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

अकोला महापालिकेत एकूण 91 जागा

अकोल्यातील महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या ही 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. तर 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 20 प्रभागात होते. ज्यात 80 सदस्य होते. मात्र यावेळी महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यामुळे यावेळी 11 जागा या वाढलेल्या आहेत. त्यामुळे अनेक नवख्यांना संधी मिळू शकते. तर 20 प्रभागा ऐवजी आता 30 प्रभाग झाले आहेत. र 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

अनेक दिग्गजांचा हादरा

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अकोला महापालिकेतही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक दिग्गजांचा प्रभाग हा आरक्षित झाला आहे. ज्यामुळे त्यांना हादरा बसला. त्यामुळे अनेकांना आता आपला प्रभाग सोडून दुसऱ्याच्या प्रभागात आपली डाळ शिजते का ते पहावं लागणार आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा असून एकूण 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर 15 जागा अनुसुचित जाती आणि 2 जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहेत. तर 8 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात 3-अ, 6-अ, 9-अ, 10-अ, 12-अ, 18-अ, 19-अ आणि 23-अ या जागा आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी 24-अ जागा महिला राखीव करण्यात आली आहे. तर 91 पैकी 74 जागा या खुल्या प्रवर्गासाठी राहतील.

पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर

लोकसंख्या

अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. तर प्रभाग क्र. 29 मध्ये लोकसंख्या एकूण 18749 आहे. त्यात अ. जा. 2463 आणि अ.ज. -825 लोकसंख्या आहे.

प्रभाग क्र. 29 मध्ये येणारी ठिकाण

कौलखेड गांवठाण, बलोदे ले-आऊट, बाजोरीया नगरी, आरोग्य नगर, उन्नती नगर, लहरीया नगर, बंजारा नगर, आनंद नगर, ख्रिश्चिन कॉलनी.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.