
आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वच पक्ष आज शहरातून प्रचार रॅली काढतआहे, भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सिडको भागात प्रचार रॅली काढण्यात आली. भाजपने 94 जागेवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
मुंबई /महाराष्ट्राच व्हिजन पुत्र म्हणून आदित्यकडे पाहिले जाते.शाखेतील लोकांनी बळ देण्यासाठी शाखा भेट सुरु आहे.दोन भाऊ एकत्र आल्याने लोकांना आनंद झाला आणि फायदाच होईल. 2017 नंतर निवडणुका ह्या सरकार नि घेतल्या नाही. मुंबईच्या ठेवी कशा मोडून टाकल्या आणि परत अजून मुंबई गिळायची असं काही चित्र दिसतेय त्याला लोक उत्तर देतील, असे वक्तव्य माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर शहरात बेगमपुरा भागात मनपा निवडणुकीत पैसे वाटपा वरून आगळा गोंधळ दिसून आला. पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्या प्रभागातील तरुणांनी फोटोतील यादी करणाऱ्या व्यक्तीचे घर शोधले.त्या व्यक्तीला जाब विचारला सुरुवात केली.काही तरुणांनी एकत्र येत त्या व्हायरल यादीचे बॅनर लावले.शेकडो लोकांनी यादी करणाऱ्यांनी संताप केला, हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दहिसर प्रभाग क्रमांक २ मधील भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचारादरम्यान उद्धव सेनेवर टीका केली.तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की अभिषेक घोसाळकर यांच्या नावाने गलिच्छ राजकारण केलं जातं आहे.जर मी माझ्या पतीचा फोटो लावला नाही तर कोण लावेल? सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे इथे येत काहीही बोलत आहेत, असे म्हटले.
दहिसर प्रभाग क्रमांक २ मधील भाजप उमेदवार घोसाळकर कुटुंबाची सून तेजस्वी घोसाळकर या भव्य रॅलीद्वारे आपली शक्तीप्रदर्शन करत आहेत. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि तेजस्वी घोसाळकर आज पहिल्यांदाच मुलासह या रॅलीत सामील झाल्या आहेत.तेजस्वीच्या या रोड शोमध्ये माजी महापौर शुभा राऊळ आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित आहेत.
भाजपला जनसेवा करण्याची पात्रता राहिली नाही. त्यांना फक्त आता लक्ष्मीसेवा करायची आहे. जनसेवा भाजपचा खोटा चेहरा आहे. खरा चेहरा आता समोर येतोय. लोकांना हे आता कळावं आणि दिसावं अशीच मी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी पार्थना करते… असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.
डोंबिवलीच्या पॅनल क्रमांक 29 मध्ये काल रात्री पैसे वाटप चा आरोप करत राडा झाला होता. हाणामारीत उमेदवार सह चार जण जखमी असून पोलीस गुन्हा दाखल करणीची प्रक्रिया सुरू आहे. याआधी देखील भाजपच्या चार कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत याच परिसरात गोंधळ झाला होता. काल पुन्हा या ठिकाणी भाजप शिवसेना उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आधी शिवीगाळ नंतर थेट हाणामारी झालेली व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो थोड्या वेळात सुरू होत आहे. वेगवेगळ्या प्रभागातून हा रोड शो जाणार असून मुख्यमंत्री स्वतः बुलेट चालविणार आहेत.
पैसे वाटपासाठी करण्यात आलेली एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या प्रभागातील तरुणांनी फोटोतील फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचे घर शोधले आहे. त्या व्यक्तीला जाब विचारला सुरुवात केली असून काही तरुणांनी एकत्र येत त्या व्हायरल यादीचे बॅनर लावले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा अत्यंत अटीतटीचा ठरत असतानाच शहरात राजकीय बॅनर वॉर पेटले आहे. काल रात्री उशिरा शिवसेना भवनासह मातोश्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर उत्तर भारतीयांच्या नावाने लक्षवेधी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर उत्तर भारतीय – ना बटेगा ना बिकेगा असा मजकूर लिहून राजकीय पक्षांना थेट संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जरी हे बॅनर सध्या प्रशासनाकडून काढून टाकण्यात आले असले, तरी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी उत्तर भारतीय मतांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी हे पोस्टर कुणी लावले, याबाबत आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या मैदानात जोरदार एन्ट्री केली आहे. आज अजित पवार प्रभाग क्रमांक ३४, ३२ आणि ८ मध्ये भव्य रोड शो करत असून, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) पूर्ण ताकद झोकून दिली आहे. या रोड शोच्या माध्यमातून अजित पवार पुण्याच्या विकासाचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवत असून, आजचा हा शेवटचा दिवस पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण करणारा ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले आहे. पुण्याला आता बदल हवा असून १६ तारखेला पुण्याचा कारभारी बदललेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जनतेला मोठी आश्वासने देताना सांगितले की, अजित पवार हे केंद्र सरकारशी चर्चा करून पुण्यातील मेट्रो आणि बस प्रवास मोफत करतील. दरम्यान, कुख्यात गजानन मारणे याच्या प्रकरणावर विचारले असता, तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. आगामी निवडणुकांच्या निकालाकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या सातपूर भागात प्रभाग ११ मध्ये प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणून त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रचाराला फिरू नकोस असे धमकावत एका तरुणाने बंदूक काढली, मात्र तिथे उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने त्याला पकडून चांगलेच चोपले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढवणारे आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात सध्या जाहीर आव्हान-प्रतिआव्हानांचे सत्र सुरू झाले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अमोल शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. कोठे असले १० लोक खिशात घेऊन फिरतात, अशा शब्दांत गोरेंनी शिंदेंना लक्ष्य केले, तर अमोल शिंदे यांनीही येणाऱ्या विधानसभेला मी देवेंद्र कोठेंच्या विरोधात उमेदवार असेन,” असे खुले आव्हान देऊन निवडणुकीतील रंगत वाढवली आहे. सोलापुरात भाजप स्वबळावर, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीमध्ये लढणार असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
कोथरूड गोळीबार आणि खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ पोलिसांना चकवा देऊन पुन्हा फरार झाला आहे. जामखेड तालुक्यातील एका शेतात तो लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने तिथे छापा टाकला, मात्र एका महिलेच्या मदतीने तो निसटण्यात यशस्वी झाला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, घायवळला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्या संबंधित महिलेला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
75 वर्षांवरील नागरिकांना यावेळी घरोघरी मतदानाची सुविधा नाही.यामुळे वृद्ध मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गर्दीमुळे टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने व्हीलचेअर सह विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी विशेष प्राधान्य देण्यात येणार.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज प्रभाग क्रमांक ३४ ,३२ व ८ मध्ये रोड शो. निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
भाजप आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात आव्हान-प्रतिआव्हान. असले 10 लोकं आमदार देवेंद्र कोठे खिशात घेऊन फिरतात. लढाई ही बरोबरीच्या पैलवानासॊबत केली जाते. पालकमंत्री जयकुमार गोरेंची शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंवर टीका तर आमदार देवेंद्र कोठेंना काय खुमखूमी आलीय माहिती नाही पण येणाऱ्या विधानसभेला भाजप आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध मी विधानसभेचा उमेदवार असेल.
कोव्हिड काळात बनावट कंपनीमार्फत शासनाची ३ कोटी ३७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी असताना गैरप्रकार. सरकारवाडा पोलिसांकडून सोमवारी सायंकाळी राहत्या घरातून अटक. नाशिक सिव्हिलमध्ये ३० खाटांचे आयसीयू उभारणीचे कंत्राट
नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची दिली धमकी. घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात. बंदुक ताणणारा युवक जेल मधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
पुणे- राज्यातील 107 परीक्षा केंद्र रद्द करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार आढळल्याने केंद्रावर राज्य मंडळाची कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यापूर्वी काही प्रकार झालेल्या परीक्षा केंद्रावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील दहावीची 31 बारावीची 76 केंद्राची मान्यता रद्द करण्यात आले आहे. यात परीक्षा केंद्र छत्रपती संभाजी नगर विभागातील आहेत.
नाशिक- टिळकवाडी तरण तलाव रस्ता तब्बल १२ महिने पूर्णतः बंद राहणार आहे. रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण कामासाठी वाहतूक बंदी करण्यात आली. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहनांना या मार्गावर पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे.
नाशिकच्या प्रभाग 11 मध्ये उमेदवारावर बंदूक ताणली गेली. नाशिकच्या सातपूर भागात आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी देण्यात आली. घटनेनंतर जमावाने बंदूक ताणणाऱ्या तरुणाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. बंदुक ताणणारा युवक जेलमधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे.
जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रभाग 11 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारानां मतदानासाठी पैसे वाटप केले जात असल्याचं लेखी तक्रारीत नमूद आहे. पैसे दिल्यावर मतदान कसं आणि कुणाला करावं याबाबत देखील डेमो दिला जात असल्याचं व्हिडिओमध्ये पहायला मिळत आहे.
नाशिक- 122 जागांसाठी 729 उमेदवारांचा प्रचार आज थांबणार आहे. अनेक ठिकाणी आज प्रचार रॅली आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीच्या कामासाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारी, 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसंच दहा हजार कर्मचारी तैनात असतील.
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारी ( बंडखोरी ) आणि पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई करण्यात आली.
पुणे- पोलीस शोधत येत असल्याची माहिती मिळताच गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ शेतातून फरार झाला. कोथरूड गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ परदेशात लपून बसला आहे. तर त्याचा भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. एका व्यावसायिक महिलेकडून 40 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी सचिन घायवळवर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून सचिन घायवळ फरार असून तो जामखेड तालुक्यातील एका शेतात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारांच्या तोफा आज (13 जानेवारी) संध्याकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली होती. चिन्हवाटपानंतर प्रचाराला वेग आला. गेल्या काही दिवसांत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी प्रभागाचा कोपरान कोपरा पिंजून काढला आहे. मतदारांना कामांची आश्वासनं देत, घराघरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं. अखेर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांचं प्रतिबिंब पुण्याच्या गल्लीबोळात पाहायला मिळत आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या..