AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार, महायुतीत बड्या मंत्र्याचा दावा

त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणीचा आढावा घेतला असून लवकरच नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. कोर्टाच्या निकालाची वाट पाहत भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारी करत आहे.

आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार, महायुतीत बड्या मंत्र्याचा दावा
BJP
| Updated on: Feb 06, 2025 | 8:25 PM
Share

Maharashtra Municipal Elections : काही महिन्यांपूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजपच्या एका बड्या मंत्र्‍यांने स्वबळावर निवडणुका लढण्याबद्दल भाष्य केले आहे.

दुग्ध विकास व पारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे हे आज धारशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद जास्त आहे हे दाखवून दिलं आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती मध्ये एकमत नाही झाले तर भाजप स्वतंञ लढणार, असे विधान अतुल सावे यांनी केले.

पुढच्या १० दिवसात नोंदणी पूर्ण करा

सध्या भाजपची सदस्य नोंदणी सुरु आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कमी नोंदणी झाली होती. त्यामुळे आज आम्ही बैठका घेऊन त्या नोंदणीचा पाठपुरावा केला. याबद्दलचा आढावा घेतला आणि आढावा घेऊन पुढच्या १० दिवसात नोंदणी पूर्ण करावी. भाजप नोंदणी झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही नोंदणी लवकरात लवकर व्हावी, असा आमचा आग्रह आहे, असेही अतुल सावे म्हणाले.

“…तर आम्ही स्वबळावर लढू”

“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक असली तरी तयारीही करावीच लागते. २५ फेब्रुवारीला जर कोर्टाचा निकाल आला तर त्यानंतर २ महिन्यांनी निवडणुका होतील. त्यामुळे त्याची तयारी आता करायला हवी. भाजपची ताकद आहे. विधानसभेत भाजपने ताकद दाखवली आहे. त्यामुळे जर आमच्या सर्वांचं एकमत नाही झालं तर आम्ही स्वबळावर लढू”, असेही अतुल सावेंनी म्हटले.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी