AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Congress : काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आलं आहे.

Congress : काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर? प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
| Updated on: Aug 13, 2026 | 11:42 AM
Share

काँग्रेसच्या गोटातून सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांमध्ये नाराजी सूर उमटल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारल्याने नाराजीचा सूर असल्याचे समोर आलं आहे. या बैठकीत खासदारांनी प्रणिती शिंदेंवर नाराजी व्यक्त केल्याचंही समोर आलं आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. दिल्लीत झालेल्या बैठकीत 16 पैकी 10 खासदारांची उपस्थिती होती. काही खासदारांनी प्रणिती शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांची जबाबदारी प्रणिती शिंदेंवर दिल्याने नाराजीचा सूर उमटल्याचे बोलले जात आहे. खासदारांपर्यंत सूचना आणि माहिती पोहोचत नसल्याची तक्रार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं?

हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीला 16 पैकी 10 खासदार उपस्थित होते. तर 6 खासदारांनी दांडी मारली होती. या बैठकीत अजेंडा सांगितला गेला. कामकाज कसं चालतं आणि मतदारसंघातील मुद्दे, यावर ही चर्चा झाली. या बैठकीत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा मांडल्याचे समोर आलं आहे. खासदारांनी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील खासदारांच्या समन्वयाची जबाबादारी प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून समन्वय साधला जात नाही, अशी नाराजी खासदारांनी व्यक्त केली. पक्षातील मुद्दे , सूचनांची माहिती मिळत नसल्याची तक्रार खासदारांनी प्रदेशाध्यक्षांकडे मांडली. त्यानंतर यावर लवकरात लवकर तोडगा काढूयात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शरद पवारांच्या बैठकीला खासदार सुरेश म्हात्रे यांची दांडी

राष्ट्रवादीच्या खासदारांची दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी भेट घेतल्यानंतर होत असलेल्या बैठकीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या रिस्पेशनला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते हे शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी उपस्थित होते. या बैठकीला लोकसभेतील ७ खासदार उपस्थित आहेत.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!