AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: बोटावर मोजण्याइतपत काँग्रेस उरली… मनोज जरांगे यांचा राहुल गांधी यांना तो थेट इशारा… वडेट्टीवारांचा असा घेतला समाचार

Manoj Jarange on Congress: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत काँग्रेसवरही मोर्चा वळवला. विजय वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर त्यांनी जोरदार प्रहार केला. त्यांनी वडेट्टीवार यांचा जोरदार समाचार घेतला. तर काँग्रेसला मोठा इशारा दिला.

Manoj Jarange: बोटावर मोजण्याइतपत काँग्रेस उरली... मनोज जरांगे यांचा राहुल गांधी यांना तो थेट इशारा... वडेट्टीवारांचा असा घेतला समाचार
राहुल गांधी, मनोज जरांगे,
| Updated on: Aug 11, 2026 | 12:29 PM
Share

कुणबी प्रमाणपरद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सरकारवर धावून जात आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसात सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 29 ऑगस्टच्या निर्णायक लढ्याची आठवण त्यांनी समाज बांधवांसह सरकारलाही करून दिली. आता महायुतीसोबत त्यांनी काँग्रेसवरही मोर्चा वळवला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला. तर नेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला. वडेट्टीवार हे ओबीसींची बाजू लावून धरत आहेत. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वी टीका केली आहे.

उपसमितीची बैठक, पण समाजाला फायदा काय?

आज सरकारच्या मराठा उपसमितीची बैठक होत आहे. त्यावरून जरांगे यांनी निशाणा साधला. किती बैठक घेणार अजून, समाजाला काय देताय तुम्ही, असा सवाल त्यांनी विचारला. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबासाठी ऊर्जा खात्याचा साधा एक जीआर काढता आला नाही. फडणवीस यावर आता काय बोलणार असा उलट सवाल त्यांनी केला. दरवेळी मुख्यमंत्री छत्रपतीचं नाव घेतात. जी चूक केली त्याबदल् बोला, लोकांचा रोष कमी होईल, प्रमाणपत्र पुन्हा द्या, अशी मागमी त्यांनी केली.

सरकारचां तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका, शेतकरी मुस्लिम ,ओबीसी मध्ये तिरस्कार वाढला आहे. सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिणवले आहे. 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि 3 वर्षात काय दिले. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे, असा इशारा त्यांनी दिला. मला अनेक मराठा नेत्याच्या फोन येतो, आमदारर,खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात. राणें सारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, याचे स्वागत आहे, असे जरांगे म्हणाले.

काँग्रेसवर सडकून टीका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी मोर्चा उघडला आहे. त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधीने हे सांगितले आहे का तुम्हाला? असा सवाल त्यांनी विचारला. चार दोन लोकांमुळे काँग्रेसचं जरा नीट सुरू आहे. थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ, नाना पेटोले यांच्यामुळे काँग्रेसचे बरं चाललं आहे, कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजण्याइतके काँग्रेस राहिली आहे ती ही संपवू नका. कशाला ती खड्यात घालत आहेत. वडेट्टीवार कितीही बोलले तरी आम्ही आरक्षण घेणारच आहोत, असे उत्तर जरांगे पाटील यांनी दिले.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती