Mahapalika Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत घराणेशाहीला नकार, दिग्गजांच्या नातेवाईकांना पराभवाचा फटका
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं आणि आज मतमोजणी होऊन निकाल हाती येत आहेत. राज्यात पालिका निवडणुकांसाठी अनेक पक्षांनी बऱ्याच ठिकाणी पक्षातील नेते यांच्या कुटुंबातील नातेवआईक, मुलं, मित्र यांना उमेदवारी दिल्याचे समोर आले. मात्र त्यापैकी बऱ्याच जणांना मतदारांनी नाकारले असून अनेकांना पराभवाचा फटका बसला आहे.

गेल्या महिन्यात, निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची (Mahapalika Election 2026) घोषणा केली आणि एकच लगबग सुरू झाली. बघता बघता महिन्याचा कालावधी उलटून गेला आणि काल (15 जानेवारी) राज्यभरातील 29 महापालिकांसाठी मोठ्या प्रमाणत मतदान झालं. तर आज सकालपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली असून राज्यातील जवळपास 26 महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान या निवडणुकांमध्ये भाजपासह अनेक पक्षांनी त्यांच्याच पक्षातील अनेक नेते, पदाधिकारी यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र यांना उमेदवारी दिल्याचे चित्र दिसले.
पक्षासाठी मान मोडून झटणाऱ्या, काम करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना डावलून या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने अनेक पक्षात धूसफूस झाल्याचे चित्रही दिसत होते. पक्षाचे कार्यकर्ते फक्त मेहनतीसाठी आणि संतरंज्या उचलण्यासाठी असतात का असा सवालही अनेकांनी विचारला. घराणेशाहीवरून भाजप, काँग्रेसलवर जोरदार टीका करताना दिसतं, पण त्यांच्या पक्षातही फार वेगळं वातावरण नाही. घराणेशाहीवर सातत्याने आगपाखड करणाऱ्या भाजपाने सुद्धा अनेक नेत्यांच्या नातेवाईकांनाच तिकीट दिल्याने मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. या निवडणुकीतही घराणेशाहीचा जोर स्पष्टपणे दिसत होता.
Municipal Election 2026
Pune Election Results 2026 : अजित पवारांना राजकारणातील सर्वात मोठा धक्का, पुण्यासह...
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...
Mumbai Election Ward No 105, 217, 39,168 Result Live 2026 : वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : मुंबईत कुठल्या पक्षाकडे किती जागांची आघाडी?
अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप
सांगलीचा महानिकाल, भाजच्या हातीच महापालिका
मतदारांनी नाकारली घराणेशाही
मात्र असं असलं तरी राज्यातील जनतेने, मतदारांनी मात्र घराणेशाहीला नकार देत नेत्यांची मुल, पत्नी, मित्र, नातेवाईक यांच्याकडे थेट पाठ फिरवली. भाजप असो की शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट, अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना परभावाच सामना करावा लागला. त्यामध्ये सदा सरवणकर यांचा पुत्र, नवाब मलिक यांचा भा, सुधाकर बडगुजर यांचा मुलगा, डॉन अरूण गवळी यांची मलगी यांच्यासह अनेकांचा समावेश होता. घराणेशाही नको, असं म्हणत मतदारांनी सरळ या उमेदवारांना मतदान करण्यास नकार दिला.
दिगज्जांच्या नातेवाईकांना पराभवाचा फटका
– मुंबई प्रभाग 194 सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकर हरले
– मुंबई प्रभाग 165 – नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिका पराभूत
– मुंबई प्रभाग 73 – रवींद्र वायकरांच्या मुलीचा पराभव
– मुंबई प्रभाग 207 – अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी हरल्या
– नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव. भाजपचे बंडखोर मुकेश शहाणेंनी त्यांना हरवलं. दोन एबी फॉर्म दिल्यानं मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला होता. बडगुजर पिता पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती . मात्र आता त्यांच्या मुलाला पराभत व्हायला लागल्याने हा त्याच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
