Video: धोक्याची चाहुल, ‘ज्युली’ खवळली, नागाचा मुडदा पाडला, लेकराचा जीव वाचवला, पाहा हा अफलातून व्हिडीओ

मालकासाठी अनेक ठिकाणी श्वानाने आपल्या प्राणाची बाजी लावल्याचा घटना घडल्या आहेत. dog fight with cobra

Video: धोक्याची चाहुल, 'ज्युली' खवळली, नागाचा मुडदा पाडला, लेकराचा जीव वाचवला, पाहा हा अफलातून व्हिडीओ
Nashik Dog Cobra Fight


नाशिक: प्राण्यामध्ये सर्वात जास्त विश्वासू म्हणून श्वानाची ओळख आहे. मालकासाठी अनेक ठिकाणी श्वानाने आपल्या प्राणाची बाजी लावल्याचा घटना घडल्या आहेत.अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या मोराणे सांडस येथे समोर आली.बागलाणमध्ये श्वानानं नागाशी झुंज दिल्यानं लहान मुलांचा जीव वाचला.  नागाशी झालेल्या झटापटीनंतर ज्यूलीनं जीव सोडला मात्र मुलांचा जीव वाचवला. सचिन मोकासरे यांनी ज्यूलीच्या मृत्य झाल्यानं  तीन दिवसांचा दुखवटा पाळला आहे.  (Maharashtra Nashik Baglan dog fight with cobra and save life of children)

नेमकी घटना काय?

सचिन मोकासरे यांना श्वानाचे एक पिल्लू जखमी अवस्थेत सापडले होते. त्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याचे पालनपोषण करत त्याला ज्युली नाव दिले. सोमवारी सचिन मोकासरे यांच्या घरातील लहान मुले बाहेर खेळत होती. तिथेच असणाऱ्या झुडपात एक कोब्रा नाग दबा धरून बसला होता.

मुलांचा जीव धोक्यात असल्याची चाहूल, कोब्रा नागावर झडप

मालकाच्या मुलांना साप चावा घेईल याची चाहूल ज्यूलीला लागताच तिने क्षणाचा ही विलंब न करता कोब्रावर झडप घातली. कोब्रा आणि ज्यूली यांच्यात तब्बल अर्धातास पेक्षा जास्त झटपट झाली. ज्यूलीने कोब्राचा मुडदा पाडला. मात्र, झटापट होत असतांना कोब्राने ही ज्युलीला अनेक ठिकाणी दंश मारला होता. त्यामुळे काही वेळा नंतर ज्यूलीने देखील प्राण त्याग केला, अशी माहिती सचिन मोकासरे यांनी दिली.

पाहा व्हिडीओ

श्वान हा माणसाचा मित्र पुन्हा स्पष्ट

मालकाच्या मुलांवर आलेले संकट या श्वानाने केवळ आपल्या अंगावरच घेतले नाही. तर, त्यांच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन श्वान हा माणसाचा खरा मित्र असल्याचे पुन्हा सिद्ध केले.

कुटुंबीयांकडून दुखवटा

ज्यूलीच्या मृत्यूमुळे मोकासरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोकासरे यांनी धार्मिक विधी नुसार ज्युलीचा अंत्यविधी करत 3 दिवसाचा दुखवटा पाळला आहे, असल्याचं सचिन मोकासरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Rudra | ओटीटीवर धमाका करण्यासाठी अजय देवगण तयार, सीरीजमध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत!

Jalna | पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या विहिरीत पडला, बचावकार्य सुरु

(Maharashtra Nashik Baglan dog fight with cobra and save life of children)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI