AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक आमदार, एक मंत्री थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पटेलांची एन्ट्री; राष्ट्रवादीत दोन मोठे निर्णय होणार? घडामोडींना वेग

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला आमदार नाईकवाडी आणि मंत्री झिरवळ आल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल पटेलही उपस्थित असल्याने नाईकवाडींचा राजीनामा आणि झिरवळ यांच्या मंत्रिपदाबाबत मोठे निर्णय अपेक्षित आहेत.

एक आमदार, एक मंत्री थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पटेलांची एन्ट्री; राष्ट्रवादीत दोन मोठे निर्णय होणार? घडामोडींना वेग
राष्ट्रवादीत दोन मोठे निर्णय होणार?
| Updated on: Jun 09, 2026 | 11:02 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी प्रचंड चर्चेत आला आहे. राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीतील पेच काही संपता संपत नव्हता. छगन भुजबळ यांनी या राज्यसभेवर जाण्यासाठी होकार दिला. पण समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद देण्याची अट घातली. आधी समीरचा मंत्रिपदाचा शपथविधी होऊ द्या, मगच मी दिल्लीत जातो, असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीत पेच निर्माण झाला होता. अखेर राजेंद्र जैन यांना राज्यसभा देऊन राष्ट्रवादीने हा पेच सोडवला. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एक आमदार आणि एक मंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. प्रफुल्ल पटेलही तातडीने देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत आज दोन मोठे निर्णय होणार काय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमदार इद्रीस नाईकवाडी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी निवासस्थानी भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. इद्रीस नायकवडी यांना मधल्या काळात खासदार पार्थ पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितले होते. त्यावेळी नायकवडी यांनी राजीनामा द्यायला नकार दिला होता. तसेच मुंबईत आल्यानंतर सुनेत्रा पवारांची भेट घेऊ असं सांगण्यात आलं होतं. आजच्या भेटीत नायकवाडी यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नायकवाडींचा राजीनामा?

नायकवाडी देवगिरी बंगल्यावर आल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे पटेल यांच्या उपस्थितीतच नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नायकवाडी यांचा राजीनामा घ्यायचा नसता तर पटेल बंगल्यावर आलेच नसते, असंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे नायकवाडी आपली काय बाजू मांडतात आणि काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

झिरवळांचं मंत्रिपद जाणार?

दुसरीकडे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रफुल्ल पटेलही देवगिरीवर असल्याने झिरवळ यांच्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे आज राष्ट्रवादीत नायकवाडी आणि झिरवळ यांच्याबाबतचे दोन मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनडीएच्या बैठकीबाबत चर्चा

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आज सुनेत्रा पवार यांच्यासोबत एनडीएच्या बैठकीबाबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. एनडीएच्या बैठकीला जाण्यापूर्वी होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्त्व आलं आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचे एक मंत्रिपद सध्या खाली तर केंद्रात देखील राष्ट्रवादीच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त आहे, त्यावरही राष्ट्रवादीत निर्णय होणार आहे. एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून विनंती करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी