Maharashtra News LIVE : मुंबईत पावसाचं कमबॅक ; आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Maharashtra News LIVE Updates In Marathi : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

Maharashtra News LIVE : मुंबईत पावसाचं कमबॅक ; आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
Maharashtra News
| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 9:58 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Jul 2026 09:58 AM (IST)

    पनवेल जेएनपीटी मार्गावर गर्डर कोसळला, सुदैवाने कोणी जखमी नाही

    पनवेल जेएनपीटी मार्गावर  एका कारवर कोसळला गर्डर.  उड्डाणपूलाचे काम सुरू असताना हा गर्डर कोसळला अशी माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी नाहीझालं नाही.  जेएनपीटी वरून पनवेल येथे जाणाऱ्या मार्गीकेवरून जात असताना कार वर हा गार्डर कोसळून दुर्घटना झाली.

  • 15 Jul 2026 09:47 AM (IST)

    अहिल्यानगर – हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरण आज शहरात महामोर्चा

    श्रीरामपूर / अहिल्यानगर –  हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणी आज होत असलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बेमुदत शहर बंदचा आजचा चौथा दिवस असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.


  • 15 Jul 2026 09:32 AM (IST)

    सीना नदीत पाणी सोडण्यापूर्वीच माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपाचे नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

    सीना नदीत पाणी सोडण्यापूर्वीच माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील आणि भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे मध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. लोकप्रतिनिधींचे दावे-प्रतिदावे सुरु आहेत, मात्र नदीपात्र अजुनही कोरडेच आहेत.

    सीना नदीला उजनी धरणातून पाणी सुटण्याच्या अगोदरच माढ्यात नेत्यांकडून मात्र श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणी भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे या दोघा नेत्यांकडून सोशल वाॅर करीत आमच्याच पाठपुराव्याला यश आल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.

  • 15 Jul 2026 09:16 AM (IST)

    मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मुंबई –  आज सकाळपासूनच दाट ढगांनी आकाश व्यापले असून शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात.

  • 15 Jul 2026 09:09 AM (IST)

    जळगाव – घरातून एटीएम कार्डचोरून 29 हजारांची रक्कम लंपास

    जळगाव मधील गुरुनानक नगरात घरातून एटीएम कार्डचोरून 29 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.  याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात मनोज चव्हाण उर्फ पापा तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पाय फ्रॅक्चर असलेल्या मनपा कर्मचाऱ्याला बघण्यासाठी आलेल्या शेजारच्या तरुणाने घरातून एटीएम कार्ड चोरून त्यातील पैसे काढून घेतल्याचे उघड झाले


  • 15 Jul 2026 08:55 AM (IST)

    नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिक मधील नगरसेवक आज ठाकरेंच्या भेटीला

    शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक. नाशिक मधील नगरसेवकांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः बोलवली नाशिक मधील 15 नगरसेवकांची बैठक.  बैठकीला नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या 15 नगरसेवकांपैकी किती नगरसेवक उपस्थित राहणार याकडे लक्ष

     

  • 15 Jul 2026 08:50 AM (IST)

    नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे अबू धाबीला जाणारे विमान बुधवारी १५ जुलै पहाटे २:३० वाजता विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा औपचारिक शुभारंभ केला. देशांतर्गत सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर सुमारे २०० दिवसांनी, NMIA जागतिक हवाई नेटवर्कशी जोडले जाईल. एअर इंडिया एक्सप्रेस या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट विमानसेवा चालवेल, ज्यामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना UAE ला प्रवास करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.

  • 15 Jul 2026 08:40 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

    नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून करण्यात आली कठोर कारवाई  जिल्हात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने करण्यात आली कारवाई.  भावफलक , साठाफलक e-POS साठ्यातील अनियमितता, ‘एम’ फॉर्ममधील देयके न देणे, शेतकऱ्यांच्या बिलावर स्वाक्षरी न घेणे यासारख्या आढळून आल्या त्रुटी.  एक एप्रिल पासून तर आत्तापर्यंत खते विक्रीचे 90 परवाने, बियाणे विक्रीचे 10 परवाने, कीटकनाशक विक्रीचे 12 परवाने असे एकूण 112 परवाने केले निलंबित

  • 15 Jul 2026 08:35 AM (IST)

    शहजाद भट्टी समर्थकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

    एटीएसने ताब्यात घेतलेले काही संशयित लॉरेन्स बिश्नोई गँगचेही ‘फॉलोअर’ एटीएसच्या कसून चौकशीनंतर २१ पैकी १५ संशयितांची सुटका. उर्वरित संशयितांच्या डिजिटल डेटाची, तसेच आंतरराष्ट्रीय चॅटिंगची पडताळणी अद्याप सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया खात्यांना समर्थन दिल्याप्रकरणी एटीएस कडून करण्यात आली होती कारवाई

     

  • 15 Jul 2026 08:30 AM (IST)

    परभणी जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, थेट शालेय पोषण आहारात..

    परभणीच्या नऱ्हापूर येथे जिल्हापरिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे,अळ्या आणि जाळे निघाल्याचा प्रकार उघड.हेच अन्न विद्यार्थ्यांना शिजवून दिलं जात असल्याचा शाळा समिती आणि गावाकऱ्यांचा आरोप. मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा गावाकऱ्यांची मागणी..

  • 15 Jul 2026 08:20 AM (IST)

    मुंबई गोवा महामार्गावर अपघात, लांजा रेस्ट हाऊस इथे हा अपघात

    अपघातात तीन जण जागीच ठार. पघातात दोन महिला एक मुलगा यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. मुंबईच्या दिशेने जाणारा क्रेटा कारची डंपर ला मागून धडक. मुंबई आगरी पाडा येथे राहणाऱ्या हे कुटुंब गोव्यातून मुंबईला परत असताना झाला अपघात

  • 15 Jul 2026 08:16 AM (IST)

    बोगस बियाणे देत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल

    बाभुळगांव पोलिस ठाण्यात बुस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल. बनावट व निकृष्ट दर्जाचा सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी बाभुळगांव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी च्या आदेशानंतर बाभुळगांव तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. बाभुळगांव पोलिसात कलम BSN 2023 च्या कलम 318(4) फसवणूक करणे,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 बीज अधिनियम 1966 कलम 6(A) 7(B)19 आणि 21 अन्वये गुन्हा काल रात्री उशिरा दाखल

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यातील काही चेहऱ्यांना थेट संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांचीही बैठक बोलावली. त्यांच्या पक्षातील सुनेत्रा पवार यांना आव्हान मिळाले. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध असल्याचे पत्रात म्हटले. थेट कायद्याचे उल्लंघन करून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे म्हटले. वकिलांमार्फत हे पत्र पाठवण्यात आले. पक्षातील बंडखोरीच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी आज नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक ठेवलीये. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला.

Follow Us