Maharashtra News LIVE : दिवाळी संपली, मध्यरात्री CNG आणि PNG महागले, महागाई दर सहा टक्क्यांवर
Maharashtra News LIVE : दिवाळी संपल्यानंतर मध्यरात्री पुणेकरांच्या खिशाला कात्री लागली. CNG आणि PNG महागले. सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांवर पोहचला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावात मुक्कामी आहेत...

LIVE NEWS & UPDATES
-
सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून आमदारांना फोन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी त्यांचं मत जाणून घेण्यात आल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
-
अप्पर वर्धा धरणात केवळ 41 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ 41 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी होता 100 टक्के जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत अप्पर वर्धा धरणात 60 टक्के जलसाठा मध्ये घट आली. सिंचन विभागाच्या वतीने ऑगस्ट 2017 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये पाणी वाटपात कपात होण्याची शक्यता आहे. यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळणं अशक्य आहे.
-
-
चारा डेपो मागणीसाठी सामूहिक निवेदन देण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी शेतातील ओला चारा संपुष्टात आल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत सामूहिक निवेदन तयार करून संबंधित तहसील कार्यालयात द्यावे, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.इतकेच नाही तर लोकसभा मतदारसंघातील सर्व तहसीलदारांना शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारून जनावरांच्या चारा आणि पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे
-
हेल्मेट व सीटबेल्टशिवाय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळणार नाही
नागपूर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवन येथे नागपूर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक माजी न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर अनिवार्य करण्यासाठी सर्व शासकीय विभाग, उद्योग समूह आणि शैक्षणिक संस्थांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
दिवाळी संपल्यानंतर सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा बसत आहे. नाशिक, पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये CNG आणि PNG महागले. सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांवर पोहचला आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. किरकोळ महागाई दर सहा टक्क्यांवर आला आहे. दोन वर्षांतील महागाईचा उच्चांक दिसून आला. कांदा, लसूण आणि आलंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किचनचं बजेट कोलमडलं आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर ६.०१ टक्क्यांवर पोहचला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने पुन्हा थंडबस्त्यात बसल्या. गेल्या सात दिवसांपासून विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. पण अजितदादा ज्यादिवशी गेले, त्यानंतर हा विषय संपल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्र आल्यातर माझ्या इतका आनंदी कोणी नसेल, असे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावात मुक्कामी आहेत. त्यांना भेटण्यासाठी काही नेतेही दरेगावात पोहचले आहे.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. तीन मद्यधुंद तरूणांनी बॉटल फेकून मारल्या. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पालकमंत्र्यांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला. तर कोस्टल रोडवर पाच ते सहा गाड्या मध्यरात्री एकमेकांवर आदळून अपघात झाला. अग्निशमन दलाने धाव घेत कारला लागलेली आग विझवली. यासह राज्यातील आणि देशातील विविध बातम्यांचा आढावा, अपडेट्स इथं वाचा.