Maharashtra News LIVE : जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
Maharashtra News LIVE Updates : इराण अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. यादरम्यान मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. युद्ध थांबवण्याकरिता बैठकांचे आयोजन केले जात आहे. राज्यात अजूनही एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भोंदू अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरात प्रकरणात नवा खुलासा
शिर्डीतील चार एकर जमीन खरेदी व्यवहारासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांचा वापर. अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या नावे खाती. संबंधित दोन बँक खात्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू. खात्यांमधून तब्बल 17 कोटींचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती.कल्पना खरात अद्याप फरार. पोलिसांकडून शोध सुरू. या प्रकरणी दोन आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात.
-
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ
गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात ही 4 हजार रुपयांची वाढ. सोने जीएसटी सह 1 लाख 57 हजार 590 रुपयांवर. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 63 हजार 680 रुपयांवर. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात दिलासा.
-
-
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार, हवामान विभागाकडून पुण्यातही येलो अलर्ट
गेली दोन दिवसापासून राज्यात तापमानाचा पारा चांगला वाढला आहे. विदर्भासह पुण्यातही चाळीशी पार तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवसात राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
-
हिंगोली- आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही
हिंगोली- आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. मंत्री म्हणजे एका विधानसभे पुरता मर्यादित नाही, बाकीच्या मतदारसंघात/ जिल्ह्यात काय चाललंय त्या पद्धतीने त्या मंत्र्यांनि काम करायला पाहिजेत. आमदार संतोष बांगर यांचा रोष नेमका कोणत्या मंत्र्यावर..?
-
रूपाली चाकणकर ला कायदा कळत नाही संविधान कळत नाही वागण्याच्या रीती रिवाज कळत नाही – रुपाली ठोंबरे पाटील यांचाहल्लाबोल
दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्ट वरती तुम्ही आहात. तुमच्या माध्यमातून महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले. तुम्हाला अटक झाली पाहिजे का अटक होत नाही…? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी विचारला आहे.
रूपाली चाकणकरला कायदा कळत नाही, संविधान कळत नाही, वागण्याच्या रीती रिवाज कळत नाही. ज्यांना महिला आयोगाच्या पदाची गरिमा कळली नाही त्यांनी 28 दिवसांनी बोलू द्या किंवा 280 दिवसांनी बोलू द्या त्यांच्याकडे बोलायला काही नाही अशी टीकाही त्यांनी केली.
-
-
रुपाली चाकणकर तुमचं काम नव्हतं, तर फोन करणाऱ्यात दुसऱ्या नंबरवर कशा? अंजली दमानिया
टॉप १० फोन नंबर समोर आहे, जे जास्तवेळ खरातांशी बोलले. त्यात खरातची मुलगी पहिल्या नंबरवर आहे. समजू शकते. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहे. 33 हजार 727 सेकंद त्या बोलल्या. रुपाली चाकणकर तुमचं काम नव्हतं, फक्त संस्थेचं काम पाहत होत्या. तर तुम्ही फोन करणाऱ्यात दुसऱ्या नंबरवर कशा? अंजली दमानिया यांचा सवाल
-
फोन बंद होईपर्यंत चाकणकर खरातशी बोलायच्या, एकेदिवशी त्या 22 मिनिटं बोलत होत्या- दमानिया
“ही यादी रुपाली चाकणकरांच्या फोनची आहे. मी ही यादी मीडिया ग्रुपवर टाकते. 177 कॉल्स आहेत. इनकमिंग कॉल 119, आऊटगोईंग 58 आहेत. 1 एप्रिल ते 17 मार्चचा हा डेटा होता. फोन बंद होईपर्यंत त्या खरातशी बोलायच्या. एकेदिवशी त्या 22 मिनिटं बोलत होत्या. त्यांना वाटत असेल चूक केलं नाही तर परमेश्वरच जाणो. मी यादी काढली चौकशीची मागणी केली,” असं दमानिया म्हणाल्या.
-
धनंजय मुंडेंप्रमाणेच रुपाली चाकणकर गायब का? अंजली दमानिया यांचा सवाल
रुपाली चाकरणकर यांनी समोर येऊन भूमिका मांडावी. धनंजय मुंडेसारख्याच चाकणकर गायब आहेत का? खरातचा मोबाइल बंद होईपर्यंत चाकणकरांचा त्यांना कॉल होता. चाकणकर कुटुंबातील अनेकजण भोंदूच्या संपर्कात होते, असा आरोप दमानिया यांनी केला.
-
राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मोठं केलं- अंजली दमानिया
राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी अशोक खरातला मोठं केलं. दीपक केसरकरांचे खरातसोबत 19 कॉल होते. पोपटराव पवार, भुसेंचे पीए खरातकडे गेले होते. जयंत पाटलांचेदेखील खरातसोबत फोन कॉल्स आहेत, असा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी केला.
-
अमरावतीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी MIM चा पदाधिकारी?
अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. यावर आता एमआयएम पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अचलपूर नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी त्याला सोशल मीडिया प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं, असं एमआयएमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद आदिल शेख यांनी स्पष्ट केलं. पूर्ण निवडणुकी काळात त्याने पक्षासाठी कोणताही काम केलं नाही, त्यामुळे त्याला पक्षातून काढण्यात आलं होतं, त्यामुळे एमआयएम पक्षाचा आणि त्याचा कोणताही संबंध नाही, असंही ते म्हणाले,
-
अमरावतीत मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीचं घर बुलडोझरने पाडणार?
अमरावतीच्या परतवाडामधील मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरचं घर अचलपूर नगरपरिषद बुलडोझरने पाडण्याची शक्यता आहे. आरोपीच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नगरपरिषदेच्या सीईओ यांनी घराची पाहणी केली. नगरपरिषदेच्या वतीने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आली.
-
दहिसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
दहिसर नवागाव इथल्या शास्त्रीनगर शिवमंदिरासमोर घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामुळे महिला सुरक्षा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित आरोपीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
-
अमरावतीच्या परतवाडा मधील मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण..
मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरच्या घराचे अतिक्रमण अचलपूर नगरपरिषद बुलडोझरने पाडण्याची आज शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे आरोपीच्या घराजवळ ही पोलिसांचा बंदोबस्त आहे. नगरपरिषदेच्या वतीने आरोपीच्या परिवाराला अतिक्रमण संदर्भात नोटीस दिल्याची ही सूत्रांनी माहिती दिली आहे, मुख्य आरोपीने घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचा नगरपरिषदला संशय आहे.
-
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या मुख्य उपस्थितीत एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थां )च्या द्वितीय दीक्षांत समारंभ सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णू देव वर्मा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित आहेत.
-
बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरा
बीडच्या पारगाव शिरस गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने अक्षरशः थरार उभा केला. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी वेग, ताकद आणि कौशल्याचा संगम दाखवत मैदान गाजवलं. या रोमांचक लढतीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगावच्या ‘आदत किंग लक्ष्य’ने बाजी मारत तब्बल एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर बुलढाण्यातील ‘हिंदकेसरी लक्ष्य’ दुसऱ्या क्रमांकावर. ड्रोनच्या खास दृश्यांमधून या शर्यतीचा थरार आणखी उठावदार झाला. पारंपारिक क्रीडेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
मुंबईच्या बोरिवलीमध्ये आलेली जलपरी आकर्षणाचे केंद्र
मुंबईच्या बोरिवलीमध्ये आलेली जलपरी आकर्षणाचे केंद्र बनली असून, तिला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येत आहेत. मुंबईतील बोरिवली कोरा केंद्र मैदानावर एका जत्रेचे आयोजन करण्यात आले असून, तिथे जलपरीचा शो आयोजित करण्यात आला आहे. मत्स्यकन्येचा पोशाख घातलेल्या दोन मुली पाण्याखाली लोकांचे मनोरंजन करत आहेत, मुलांना या मत्स्यकन्या खूप आवडत आहेत. ही जलपरी मुलांसोबत खेळते आणि पाण्यात पोहते, जे मुलांना खूप आवडते.
-
दादासाहेब खिंडकरच्या सांगण्यावरूनच मारहाण केली, भाऊ समाधान खिंडकरकडून मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण
एका तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात 13 महिने जेलमध्ये राहिलेल्या दादासाहेब खिंडकरच्या भावाने मोठा दावा केला आहे. दादासाहेब खिंडकर बाहेर आल्यानंतर हॉकीस्टिकने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आपण जामिनावर आहोत आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असे सांगत ही मारहाण ग्रामपंचायत निवडणूक काळात दादासाहेब खिंडकर याच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा दादासाहेब खिंडकरचा सख्खा भाऊ समाधान खिंडकर याने केला आहे.
-
शिवसेना ठाकरे गटात होणार मोठे फेरबदल, आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?
शिवसेना ठाकरे गटात आगामी काळात मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जून महिन्यात होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची चर्चा आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून घोषित करण्याचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.
-
ठाणेकरांची तहान भागवण्यासाठी धावपळ, मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या शटडाऊनमुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत ठाणे महापालिकेच्या वतीने साकेत परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, या टँकरसाठी ७०० ते १००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचे समोर आले आहे. शटडाऊनच्या निर्णयामुळे शहरातील अनेक गृहसंकुलांमधील नळांना पाणी येणे बंद झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी संपल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने टँकरची संख्या वाढवावी आणि नागरिकांना जास्तीत जास्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-
भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या, सिमेंट ब्लॉकने ठेचून खून, येवला हादरले
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एका ३८ वर्षीय तरुणाचा सिमेंट ब्लॉकने डोक्यात प्रहार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृताची ओळख एकनाथ गायकवाड (रा. सुरेगाव) अशी पटली आहे. अज्ञात हल्लेखोराने एकनाथ गायकवाड यांच्या डोक्यावर सिमेंट ब्लॉकने जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एकनाथ यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
सोलापुरात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून यलो अलर्ट जारी
सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून, काल जिल्ह्यात तापमानाचा आकडा ४३.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढत्या तापमानाचा विचार करता, नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाढत्या उष्माघाताच्या धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळणे हिताचे ठरेल.
-
अमरावतीच्या परतवाड्यात तरुणींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, 4 आरोपी गजाआड
अमरावतीच्या परतवाडा शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. परतवाडा पोलिसांनी या गंभीर प्रकरणात आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर, तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रात्री आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर, उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक अशी आरोपींची नावे आहेत.
-
बीकेसी मेट्रो साइटवर भीषण अपघात, गर्डर उचलत असताना क्रेन उलटली
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे बुधवारी पहाटे मेट्रोच्या कामादरम्यान एक गंभीर अपघात घडला. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मेट्रो साइटवर गर्डर उचलण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. पिलरवर गर्डर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अचानक तोल गेल्याने बीम खाली कोसळला आणि तो उचलणाऱ्या क्रेनचीही पलटी झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या क्रेन हटवण्याचे आणि परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
-
नाशिक म्हाडा घोटाळा बाबत आज SIT ची पहिली बैठक
राज्य शासनाकडून या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची झाली आहे स्थापना. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली SIT काम करणार. SIT ची पहिली बैठक आज होणार
संबंधित यंत्रणांकडून आधी सर्व माहिती मागवली जाणार. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात होणार. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांमध्ये नियमभंग करत बड्या बिल्डरांनी केली शासनाची फसवणूक -
गोव्यात पकडलेल्या भोंदूबाबावर दोन गुन्हे
काळी जादू झाल्याची भीती दाखवत ठाण्यातील एका महिलेकडून सुमारे अडीच कोटी रुपये आणि सोन्याचे दागिने उकळणाऱ्या कर्नाटकातील भोंदूबाबा मंजुनाथ सुंदर शेट्टी उर्फ दिक्षीत बाबा (वय ३५) याच्याविरुद्ध आधीपासूनच गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्कार आणि वर्तकनगर ठाण्यात विनयभंग आणि फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.
-
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला गती
मुंबई, कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा आता प्रत्यक्ष हालचालींच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुमारे २६३ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
-
कल्याणमध्ये ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत मोठी लूट
कल्याणमध्ये ‘पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अरेस्ट’च्या करत ७३.३० लाखांची लूट. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक म्हणत आजींना घाबरवले ‘तपास अधिकारी’ बनून पाच सायबर भामट्यांची सुनियोजित केली आजींची फसवणूक. पाच दिवस सतत फोन करून मानसिक दबाव वाढवत‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचून बँक व्यवहार तपासणीचा केला बहाणाय RTGS व ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे ७३.३० लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले. कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
-
नाट्यगृह भाडेवाढीच्या स्थगितीस मुंबई महापालिकेचा नकार
अखिल भारतीय मराठी परिषदेसी मागणी अमान्य. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहाचे भाडे शुल्क चार हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आले. दरवर्षी पाच टक्केने होणार वाढ. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नाट्य निर्मात्यांवर आर्थिक भार येणार. भाडेवाढीला स्थगिती देण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महापालिका. मात्र यामध्ये कोणताही बदल होणार नाही असं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं
-
मोठी अपडेट! उद्या पुण्यात पाणीपुरवठा बंद
पुणे महापालिकेच्या दुरुस्ती व देखभाल कामांमुळे उद्या शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. आज मध्यरात्रीपासून ते उद्या मध्यरात्रीपर्यंत हा बंद लागू असेल. शुक्रवारी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. नागरिकांनी पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केली. भारतात अजूनही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी बंद केली. आता युद्ध संपण्याचे संकेत आहेत. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. यादरम्यान रूपाली चाकणकर यांच्या बहिणीची तब्बल आठ तास चाैकशी करण्यात आली. राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. उष्णतेमध्ये मोठी वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 42 च्या पार जात आहे. नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतरचा गारवा संपला. राजकीय घडामोडींना वेग आला. भारतीय हवामान विभागाने दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला.