Maharashtra News LIVE : ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी वसईत सलग दुसऱ्या दिवशी काम बंद
Maharashtra News LIVE: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज चिन्ह वाटप होईल. आज दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
सायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे शिवसेना आणि मनसेकडून कांदिवली रेल्वे स्टेशनवर आंदोलन
सायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे शिवसेना आणि मनसेकडून कांदिवली रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. सायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करण्यात येत असून, याविरोधात शिवसेना आणि मनसे आक्रमक झाल्या आहेत. कांदिवली रेल्वे स्टेशन परिसरात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले असून, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
-
मिरा भाईंदर काशीमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांना २५ हजारांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहात पकडलं
बांगलादेशी महिलेला फ्लॅट भाड्याने दिल्याप्रकरणी रिअल इस्टेट एजंट स्वाती पाटील यांना आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. स्वाती पाटील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक शर्मिला पाटील यांच्या पथकाने आज कारवाई करत शरद खाडे यांना अटक केली.
-
-
देहू गावातील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरन वाजल्याने चोरटे पसार
पिंपरी चिंचवड शहरा जवळ असलेल्या देहू गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न तीन अज्ञात चोरट्यांनी केला.एटीएम मध्ये चोर चोरी करत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी देहू गावातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात प्रवेश केला. मशीनमधील रोकड लंपास करण्यासाठी त्यांनी सोबत आणलेल्या गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचदरम्यान एटीएममधील सुरक्षा सायरन अचानक जोरा – जोरात वाजू लागला. सायरनचा आवाज ऐकून पकडले जाण्याच्या भीतीने तिन्ही चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा पुढील तपासाचा देहू रोड पोलीस करत आहेत.
-
‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी वसईत सलग दुसऱ्या दिवशी काम बंद
‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी आज दुसऱ्या दिवशी ही न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप सुरू आहे. या संपाला वसई वकील संघाने ही पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या बेमुद्दत संपामुळे आज दुसऱ्या दिवशी वसई न्यायालयातील सर्व कामकाज ठप्प आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन मिळाले पाहिजे, उच्च न्यायालयाने पाठविलेला प्रस्ताव शासनाने तात्काळ मंजूर करावा या मागण्यांसाठी हा बेमुद्दत संप सुरू आहे.
-
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो – वैभव नाईक
सोनीया गांधीचे पुस्तक फाडल त्याबद्दल आमचं कुठलही मत नाही. परंतु शिवसेनेचे परप्रांतीय प्रवक्ते शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो असे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. शायना एनसी सारख्या लोकांनी बाळासाहेबांना आयुष्यभर विरोध केला होता. मराठी माणसाला सुद्धा यांनी विरोध केला होता असेही त्यांनी म्हटले आहे.
-
-
पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेवर प्रशासक नियुक्त
पुण्यातील सिंहगड शिक्षण संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यातील ८ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवर प्रशासक आणि सल्लागार समिती नियुक्त झाली आहे. अवमान याचिका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षण संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांच्या प्रस्तावानुसार प्रशासक आणि सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आले आहे.
-
मिरा भाईंदरमधील पोलीस उपनिरीक्षकाला 25 हजारांची लाच घेताना पकडलं
मिरा भाईंदर काशीमीरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद खाडे यांना २५ हजारांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहात पकडले. बांगलादेशी महिलेला फ्लॅट भाड्याने दिल्याप्रकरणी रिअल इस्टेट एजंट स्वाती पाटील यांना आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. स्वाती पाटील यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक शर्मिला पाटील यांच्या पथकाने आज कारवाई करत शरद खाडे यांना अटक केली.
-
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून काँग्रेसचा महायुतीच्या मंत्र्यावर हल्लाबोल
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवरून काँग्रेसचा महायुतीच्या मंत्र्यावर हल्लाबोल
जागावाटपाच्या बैठकीत काँग्रेसने कोणताही संपर्क केला नसताना काँग्रेसचे नाव घेऊन महायुतीच्या नेत्यांनी दिशाभूल केल्याचा काँग्रेसचा आरोप
जिल्हा बँकेत बिनविरोध झालेल्या नेत्यांनाही काँग्रेसचं नाव घ्यावं लागतं, काँग्रेसचा टोला
मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला काँग्रेसचं प्रत्युत्तर
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसकडून जागेची मागणी करण्यात आल्याचे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी म्हटले आहे
-
उपसागरातील चक्रीवादळाचा नाशिकच्या निफाड तालुक्यात परिणाम, ढगाळ वातावरणाची निर्मिती
नाशिक- उपसागरातील चक्रीवादळाचा नाशिकच्या निफाड तालुक्यात परिणाम…
– वातावरणात बदल होत आकाशात ढगाळ वातावरणाची निर्मिती….
– द्राक्षांची पंढरी असलेल्या निफाडमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले….
– सध्या द्राक्षबागा फुलोरा आणि फळधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यात….
– अवकाळी पाऊस झाल्यास द्राक्षबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती…
– ढगाळ वातावरणामुळे मावा, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता….
– रोगराईच्या भीतीने द्राक्षबागांवर अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च वाढणार….
– हवामानातील बदल आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे द्राक्ष उत्पादक दुहेरी संकटात…
-
पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून खून
पुण्यात जुन्या भांडणाच्या वादातून खून
पुण्यात फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना
रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली घटना
चार विधिसंघर्षित बालक ताब्यात पोलिसांच्या ताब्यात
रेल्वे पटरीजवळ.सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहार कडे जाणा-या रोडवर, भोसले व्हिलेज भेकराईनगर या ठिकाणी घडली घटना
करण रविंद्र नागटिळक वय १७ वर्षे खून झालेल्या तरुणाचे नाव
विधिसंघर्षित बालकांनी जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी हत्याराने डोक्यात,चेह-यावर व दोन्ही हातावर मारून केला खून..
या प्रकरणी फुरसुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.
-
शाहांच्या शिंदे सेनेचे भाडोत्री लोक फोटो फाडत आहेत- संजय राऊत
अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..
कारण हे सगळे भाडोत्री आहेत,
बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले!
याना ना कोणता विचार ना नैतिकता,
ना एकच नेता ना निष्ठा..
मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या
चाबकाचे फटके मारले पाहिजेत!
मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!
असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. -
बाळासाहेबांचा अपमान झाला, तरी सभागृहाचं कामकाज सुरू का ठेवलं? विरोधकांचा महापौरांना सवाल
बाळासाहेबांचा अपमान झाला, तरी सभागृहाचं कामकाज सुरू का ठेवलं? विरोधकांचा महापौरांना सवाल
बाळासाहेबांच्या अपमानावरून महापौरांना विरोधकांनी धारेवर धरलं
महापौरांच्या कॅबिनमध्ये विरोधकांकडून जाब विचारण्यास सुरुवात
महापौरांच्या कॅबिनमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा
महापौरांना समर्थन देण्यासाठी भाजप नगरसेवक कॅबिनमध्ये दाखल
भाजप नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक महापौरांच्या कॅबिनमध्ये आमनेसामने
महापौरांच्या कॅबिनमध्ये जोरदार गोंधळ, वातावरण तापलं
-
शरद पवार गटाला वगळून काँग्रेस, ठाकरे गट व शेतकरी संघटनेचे शेतकरी एकता पॅनल
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला वगळून काँग्रेस, ठाकरे गट व शेतकरी संघटनेचे शेतकरी एकता पॅनल
जिल्हा बँक निवडणुकीत महाराष्ट्र शेतकरी संघटनेसोबत काँग्रेस व ठाकरे गटाची हातमिळवणी
शेतकरी एकता पॅनलच्या माध्यमातून काँग्रेस , ठाकरे गट व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सात जागांवर निवडणूक लढवणार
काँग्रेस आणि शेतकरी संघटनेच्या शेतकरी एकता पॅनेलचे महायुतीच्या सहकार पॅनल समोर आव्हान…
-
शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण, आजची सुनावणी संपली
शिवसेना कोणाची, सुप्रीम कोर्टातील आजची सुनावमी संपली
शिवसेना शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण
धवृ मेहता यांच्याकडून जोरदार युक्तिवाद
-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष -उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष -उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध
काँग्रेसचे महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी निवड
तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड
नुतून अध्यक्ष महेंद्र लाड काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गटाचे
तर तानाजी पाटील शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या गटाचे
-
आमदारांवर व्हीप मोडल्याचा आरोप, कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांकडून खंडन केला मोठा दावा
आमदारांनी व्हीप मोड्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला होता. सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता आणि आमदारांनी अध्यक्ष निवडणुकीत व्हिप पाळला नाही असा दावा करण्यात आला होता. परंतु धृव मेहता यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान या दाव्याचं खंडण केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी व्हिप लागू करता येत नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
-
शिवसेना कोणाची? शिंदे गटाच्या वकिलांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
शिवसेना कोणाची? शिंदे गटाच्या वकिलांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता यांच्याकडून भाजप युतीचा दाखला
निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती होती – मेहता
युती निवडणुकीच्या नंतर तोडली, हा मतदारांचा मतांचा अपमान होता- मेहता
यामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले होते, मेहता यांचा न्यायालयात दावा
-
सुभाष देसाई प्रकरणी कोर्टाने महत्त्वाच्या सूचना दिल्या
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदेंचे वकील ध्रुव मेहतांचा युक्तिवाद सुरु आहे. सुभाष देसाई प्रकरणी कोर्टाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. वकील मेहतांकडून बाळासाहेब पाटील प्रकरणाचा दाखला दिला जातोय. कर्नाटकातील 2019चं सरकार कसं स्थापन झाले याचा दाखला दिला जातोय
-
मिरा-भाईंदरच्या हक्काचे पाणी ठाण्याला वळवण्याचा सरनाईक यांचा प्रयत्न- नरेंद्र मेहता
मिरा-भाईंदरच्या हक्काचे पाणी ठाण्याला वळवण्याचा सरनाईक यांचा प्रयत्न असून त्यांच्या हालचाली व प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. आम्ही जिवंत असेपर्यंत पाणी ठाण्याला जाऊ देणार नाही, आमच्या मृत्यूनंतरच पाणी ठाण्याला घेऊन जाऊ शकतात. जीव गेला तरी चालेल मात्र मिरा भाईंदर शहराचे पाणी कोणाला पळवू देणार नाही असे ते म्हणाले.
-
आज ही सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा- सरन्यायाधीश
शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीला सुरुवात होताच सरन्यायाधीश म्हणाले की आज ही सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यावर ध्रुव मेहता (शिंदे गटाच्या वतीने) – माझाही तोच मानस आहे, आज युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असे म्हणाले.
-
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच बेमुदत आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातील संघटनांचा आंदोलनात सहभाग आहे. हायकोर्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन मिळवा अशी मागणी करण्यात आली आहे. सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक रोड दिवाणी न्यायालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे.
-
AIनी सोपं करून टाकलंय पुस्तक लिहणं – गुणरत्न सदावर्ते
सोनिया गांधी यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. आता काही लोकांचा AI मुळे छंद झालाय की काय? कारण आजकाल AI नी फार सोपं करून टाकलय पुस्तक लिहणं. त्या पुस्तकाची credibility आणि त्या पुस्तकाच्या references हे मला असं वाटतंय जर म्हणजे AI शी AI शी जोडून पाहावं लागतील असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
-
आमदार प्रताप अडसड यांच्या मतदारसंघात काँग्रेसने लावला सुरुंग
अमरावती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांच्या मतदारसंघात काँग्रेसने लावला सुरुंग. भाजपच्या अनेक लोकांचा काँग्रेसमध्ये प्रवेशभाजपचे आमदार प्रताप अडसड यांना धक्का. भाजपाचे माजी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती, रामदास निस्ताने यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये घेतला प्रवेश.
-
अच्छे दिन करणाऱ्यांनी आपल्याला चुना लावला- यशोमती ठाकूर
अच्छे दिन करणाऱ्यांनी आपल्याला चुना लावला आहे. ऑक्टोबर महिन्यात 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. भाजप नेत्याच्या बायका मिरवतात किती मॉडेलिंग करतात… आणि ते आम्हाला संस्कृती शिकवतात असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
-
जळगावात दिवाळीनंतर सलग सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच
जळगावात दिवाळीनंतर सलग सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह एक 1 लाख 35 हजार 960 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख 74 हजार 70 रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.
-
साताऱ्यात भाजपला धक्का, शंभूराज देसाईंची मोठी खेळी
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शंभूराज देसाईंची खेळी पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर असून शिवसेनेचे दिपक चव्हाण उपाध्यक्षपदी आहेत.
-
मुंबईत शिंदे सेना आणि भाजपा कार्यालयावर कारवाई
मुंबईत शिंदे सेना आणि भाजपा कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. अँटॉप हिल परिसरात रेल्वे आणि म्हाडाकडून कारवाई करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांच्या पक्ष कार्यालयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
-
जे निर्बुद्ध आहेत, त्यांच्याकडून हीच अपेक्षा; सोनिया गांधींचं पुस्तक फाडण्यावरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींचं पुस्तक वाचलं आहे, त्यातला आशय त्यांना समजला आहे. हे इतरांनी समजून घ्यावं. जे निर्बुद्ध आहेत, त्यांच्याकडून हीच अपेक्षा ठेवू शकणार, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
-
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणं हा निर्लज्जपणाचा कळस- वडेट्टीवार
सोनिया गांधींचं पुस्तक जनतेला आवडलंय. पुस्तक फाडणं हा निर्लज्जपणाचा कळस आहे. पुस्तकातील मजकुरावर आक्षेप असेल तर त्याचं खंडन करा. हिंदुत्ववादी विचारांवर या देशातील सेक्युलर विचारांची लोकं आपले विचार मांडत असतील तर यात गैर काय आहे? धर्मांध शक्ती पुढे आल्याने देशाची अधोगती होतेय. वस्तुस्थितीवर बोलणं आवश्यक आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
-
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडणं, ही घटना नजरचुकीनं किंवा दुर्दैवाने घडली- नवनाथ बन
बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडणं, ही घटना नजरचुकीनं किंवा दुर्दैवाने घडली. याप्रकरणी शायना एनसी निश्चितच माफी मागतील. कारण बाळासाहेबांचा अपमान महाराष्ट्रात कोणी करणार नाही, असं नवनाथ बन म्हणाले.
-
बाळासाहेब भवन इथं मुंबई पोलीस दाखल
बाळासाहेब भवन इथं मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. सोनिया गांधींनी लिहिलेलं पुस्तक प्रवक्ते फाडणार असल्याची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षाकडून सोनिया गांधी यांचं पुस्तक पाडण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन या ठिकाणचं पोलीस सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
-
मणिशंकर अय्यर यांचे फोटो शंभर वेळा आम्ही फाडणार- शायना एनसी
बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललोय. मणिशंकर अय्यर यांचे फोटो शंभर वेळा आम्ही फाडणार. सोनिया गांधींच्या पुस्तकात वीर सावरकरांबद्दल जे लिहिलंय, ते अत्यंत आक्षेपार्ह आहे, असं वक्तव्य शायना एनसी यांनी केलंय.
-
बाळासाहेबांचा फोटो फाडणं अत्यंत संतापजनक- सुषमा अंधारे
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडला. यावर सुषमा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडणं अत्यंत संतापजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
-
बाळासाहेब भवन इथे मुंबई पोलीस दाखल
बाळासाहेब भवन इथे मुंबई पोलीस दाखल. सोनिया गांधींनी लिहिलेलं पुस्तक प्रवक्ते फाडणार असल्याची माहीती मिळताच पोलिस दाखल
-
सोनिया गांधी यांच्या जर्नी आॅफ लव पुस्ताकाची प्रत फाडून शिवसेनाचा निषेध
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद सुरू, सोनिया गांधी यांनी लिहीलेल्या जर्नी आॅफ लव या पुस्ताकाची प्रत फाडून शिवसेनाचा निषेध. शिवसेना ठाकरेंच्या पक्षावरही प्रवक्त्यांचा निषेध. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या पुण्यतिथी निमित्ताने कांग्रेसच्या एकाही नेत्यांने ट्विट न केल्याने शिवसेना आक्रमक. या पुस्तकात सावरकरांच्या बाबत आक्षेपार्ह लेख पण हेत पुस्तक ठाकरेंच्या हातात… सोनियांनी सावरकरांचा केलेला अपमान मान्य आहे का? असा सवाल
-
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर चेअरमन तर शिवसेनेचे दीपक चव्हाण व्हाइसचेअरमन. भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दे धक्का. जिल्हा परिषदेतील वचपा काढल्याची चर्चा. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला बाजूला ठेवत मंत्री जयकुमार गोरे यांना दिला शह. राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर चेअरमन तर शिवसेनेचे दीपक चव्हाण व्हाइसचेअरमन. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरेंना धुळ चारत करून दाखवण्याची जिल्ह्यात चर्चा.
-
पैठण तालुक्यातील नांदर येथे वडिलांनीच दोन चिमुकल्या मुलांना कालव्यात फेकल्याचा आरोप
: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नांदर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी जन्मदात्या वडिलांनीच आपल्या दोन चिमुकल्या मुलांना कालव्यात फेकून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोन्ही भाऊ बेपत्ता झाले होते. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन भावांपैकी आरुष सोमनाथ रोडगे या चिमुकल्याचा मृतदेह इंदेगाव-ब्राह्मणगाव शिवारातील पाण्याच्या कालव्यात आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, दुसरा चिमुकला अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलांना कालव्यात का फेकले, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
-
नागपुरातील तुलसीनगर कॉलनी परिसरात दरोडा
नागपुरातील तुलसीनगर कॉलनी परिसरात दरोडा पडला असून चाकूचा धाक दाखवून पावणे चार कोटी रुपये लुटले आहेत.
-
नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या भेटीला
नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या भेटीला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर राज ठाकरे यांनी विशेषतः विशाखा राऊत यांच्याशी केली होती बातचीत. नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर विशाखा राऊत यांच्या आगामी कायदेशीर भूमिकेबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती
-
जालन्यातील सुंदरनगरमध्ये रात्री 2 गॅस सिलिंडरचा स्फोट,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर भागात रात्री दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दी नियंत्रणात आणली.दरम्यान अग्निशमन दलाने एका तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले होते.
-
हिंगोली-तालुक्यातील दुर्गसावंगी गावात घरकुल योजनेत घोटाळा
हिंगोली-तालुक्यातील दुर्गसावंगी गावात घरकुल योजनेत घोटाळा झाला आहे. ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घातला, 138 घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रोजगार सेवकांने, परस्पर हडप केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरू सुरु आहे. प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत,
-
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषद मटण पार्टी प्रकरण
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी नगरपरिषद मटण पार्टी प्रकरण समोर आलं आहे. ड्रोनद्वारे चित्रण करणाऱ्या रमाकांत गावंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. “माझा संतोष देशमुख करायचा होता”; रमाकांत गावंडे यांचा गंभीर आरोप, अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या मोर्शी शहर बंदच आवाहन करण्यात आलं आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांच आवाहन..
-
कोणतेही सरकार असो, शेतकरी आत्महत्या अयोग्यच – सुप्रिया सुळे
कोणतेही सरकार असो, शेतकरी आत्महत्या अयोग्यच आहे. शेतकऱ्यांकडून वसुली करण्याची ही वेळ नाही. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
-
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांच्या दर्शन रांगेची जय्यत
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांच्या दर्शन रांगेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोपाळपूर रोडलगत उभारण्यात आलेल्या चौदा पत्राशेडमध्ये तब्बल ४० हजार भाविकांची सोय करण्यात आली आहे. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासह पिण्याचे पाणी, आरोग्य, सुरक्षा, चहा-नाष्टा आणि स्क्रीनवरून विठ्ठलाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
“दिल्लीची मर्जी महत्त्वाची की मराठी माणसाचा स्वाभिमान?” उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी एक गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्यावी. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता आणि हिंदुत्वासाठी संघर्ष केला, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी जनतेच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी काल बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी साधी श्रद्धांजलीदेखील अर्पण केली नाही, ही बाब अनेक शिवसैनिकांच्या आणि बाळासाहेबांवर निष्ठेने प्रेम करणाऱ्या मराठी माणसांच्या मनाला निश्चितच खटकणारी आहे. अशा परिस्थितीत उद्धवजी आणि संजय राऊत यांनी हे समजून घेतले पाहिजे की, हा विषय केवळ एका व्यक्तीच्या श्रद्धांजलीपुरता मर्यादित नाही. हा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या मराठी जनतेच्या भावना, स्वाभिमान आणि अस्मितेशी जोडलेला विषय आहे. -
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांच्या दर्शन रांगेची जय्यत तयारी
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात भाविकांच्या दर्शन रांगेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोपाळपूर रोडलगत उभारण्यात आलेल्या चौदा पत्राशेडमध्ये तब्बल ४० हजार भाविकांची सोय करण्यात आली आहे. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षणासह पिण्याचे पाणी, आरोग्य, सुरक्षा, चहा-नाष्टा आणि स्क्रीनवरून विठ्ठलाच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी करण्यात आलेल्या या सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी….
-
नॅशनल पार्क शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वात आदिवासी आणि वनवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी जनआक्रोश धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी, वनवासी तसेच इतर समाजातील नागरिकांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-
दिवा शहरातील आगासन गावात पहाटेच्या वेळेस पडला होता दरोडा
दिवा शहरातील आगासन गावात पहाटेच्या वेळेस पडला होता दरोडा. तुकाराम मुंढे यांच्या घरी पडला दरोडा. दरोड्यात चोरट्यांनी घरातील अडीच तोळे सोने आणि ८० हजार रुपये केले लंपास. काल पहाटे बंगल्यात घुसून 7 ते 8 चोरांनी नोकरदार आणि तुकाराम मुंढे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्याचा प्रयत्न…मुंब्रा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल. नोकराला दरोडेखोरांनी धाक दाखवतानाचा व्हिडिओ cctv मधे कैद… बगल्यामध्ये तुकाराम मुंडे आणि नोकर रात्री झोपले होते इतर मुंडे परिवार देवदर्शनासाठी गेली असताना हल्ल्या पासून बचावली….
-
सोलापूरच्या अक्कलकोटहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली
सोलापूरच्या अक्कलकोटहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. मात्र सुदैवाने बसमधील 50 प्रवाशांचे प्राण वाचले. अक्कलकोट ते पुणे दरम्यान जाणाऱ्या एसटी बसला अचानक आग लागली. अक्कलकोट वरून निघाल्यानंतर मोहोळ येथील चंद्रमौळी जवळ पोहोचल्यानंतर एसटी बस मधून अचानक धूर निघत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट. अक्कलकोट ते पुणे स्वारगेट दरम्यान प्रवास करणारे 50 प्रवासी सुखरूप. एसटी बसला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट. सदरच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
-
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत लष्कर कमांड लतीफ भट ठार
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत लष्कर कमांड लतीफ भट ठार झाला आहे. लतीफ भट हा एका मशिदीत लपून बसला होता. त्याला ठार करण्यात आता यश आले आहे.
-
चंद्रपूरात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने खळबळ,
चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने खळबळ, सौंदर्यीकरणं केलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागच्या भागात आढळले केवळ शीर, पोलीस आणि फॉरेन्सिक पथक पोहोचले घटनास्थळी, श्वानपथकाने माग काढल्यानंतर धड रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जाहिरातींच्या फलकाच्या खांबाखाली आढळले, पोलिसांनी संपूर्ण परिसराची सुरू केली आहे तपासणी, अन्यत्र हत्या करून हे दोन्ही भाग इथे फेकल्याचा प्राथमिक अंदाज, शहराच्या अतिव्यस्त मध्यवर्ती भागातील घटनेने हादरले शहर, मयताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
-
चाकणच्या माणिक चौकात मद्यधुंद युवकाचा गोंधळ; वाहतुकीचा खोळंबा
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण शहरातील गजबजलेल्या माणिक चौकात एका मूकबधिर युवकाने मद्यप्राशन करून चांगलाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत हा युवक थेट रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहनांना अडवू लागला. त्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली, तर चौकात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकातील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. माणिक चौक हा नेहमीच वाहनांच्या वर्दळीचा परिसर असल्याने या घटनेमुळे काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य अनुचित प्रकार टळला.
-
जमीन मोबदला प्रकरणात आयुक्तांच्या खुर्ची, वाहन आणि फर्निचर जप्तीचे आदेश
– जमीन मोबदला प्रकरणात आयुक्तांच्या खुर्ची, वाहन आणि फर्निचर जप्तीचे आदेश
– २४ वर्षांपासून प्रलंबित जमीन मोबदला प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
– जमीन मालक दिलीप शिंदोरे यांना व्याजासह ३ कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश
– रक्कम अदा न केल्यास आयुक्तांची खुर्ची, वाहन आणि फर्निचर जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
– १५ टक्के व्याजासह ३ कोटी ३१ लाखांहून अधिक रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश
– मोबदला देण्यासाठी मनपाकडून तातडीने स्थायी प्रस्ताव ठेवण्याची तयारी -
जालन्यातील सुंदरनगरमध्ये रात्री 2 गॅस सिलिंडरचा स्फोट
जालना शहरातील चंदनझिरा परिसरातील सुंदरनगर भागात रात्री दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दी नियंत्रणात आणली.
-
डॉ. सतीश पाटील यांची माघार
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी माघार घेतली. स्वपक्षीय नेत्यांवर घात केल्याचा आरोप करता माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हक्काची ओबीसी प्रवर्गाची जागा भाजपला देऊन अन्याय केल्याचा डॉ. सतीश पाटील यांनी आरोप केला. पक्षातच माझे विरोधक असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर आरोप केला आहे.
-
गौतमी पाटीलला पाहण्यासाठी गर्दी एवढी की… थेट झाडावर चढून घेतला कार्यक्रमाचा आनंद
शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे नवीन आलिशान गाडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील, जानवी किल्लेकर आणि ओम यादव उपस्थित होते. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला चाहत्यांची तुफान गर्दी झाली. गर्दीतून कार्यक्रम दिसत नसल्याने काही चाहत्यांनी थेट झाडावर चढत गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आनंद घेतला. गौतमीच्या अदाकारीची क्रेझ अशी की… जागा कमी पडली, पण उत्साह मात्र कमी झाला नाही.
-
पिंपरी कावळ येथे दारूचा ट्रक पलटी; गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
जेजुरी मार्गावर नाशिकहून पुण्याच्या दिशेने देशी दारू घेऊन जाणारा ट्रक मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरी कावळ येथे पलटी झाला. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून, गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-
मंत्रिपद न मिळाल्याने रोहित पवार वैफल्यग्रस्त झालेत- भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची उपरोधिक टीका
महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाले, मात्र स्वत:ला मंत्रिपद न मिळाल्याने रोहित पवार वैफल्यग्रस्त झालेत अशी उपरोधीक टीका भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राचे राहुल गांधी आहेत. स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची त्यांची धडपड सुरू आहे. राज्यात विरोधी पक्षाचे नेतृत्व मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून ते कोणावरही टीका सुटलेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सूडबुद्धीने आणि वैयक्तिक द्वेषातून टीका करत आहेत. उद्योजक अदानी आणि अंबानी यांच्यावर सार्वजनिक टीका करायची आणि बारामतीत आल्यावर त्यांची गाडी चालवायची असा दुटप्पीपणाचा रोहित पवारांचा आहे.
-
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची आज निवड
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद कोणाकडे जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून उदयसिंह पाटील उंडाळकर, आ.अतुल भोसले, माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांची नावे चर्चेत तर दुसरीकडे उपाध्यक्ष पदासाठी ज्ञानदेव रांजणे यांचं नाव आघाडीवर आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्ष पदाच्या निर्णय मुख्यमंत्री घेतील यांची प्रतिक्रिया आहे तर मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत यासाठी आग्रही आहेत. या वेळच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुतीतीलच पक्षांची मैत्रीपूर्ण लढतीमुळे अध्यक्षपदासाठी रस्सीखेंच आहे.
-
ताकई गावात दुर्मिळ मांडूळ सापाचा सुरक्षित रेस्क्यू!
खालापूर तालुक्यातील ताकई गावात दुर्मिळ मांडूळ जातीचा साप आढळून आल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे या सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात आले. खालापूर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ताकई गावातील शेतजमिनीजवळ हा मांडूळ साप आढळला. स्थानिक युवक सुमित आणि नयन पाटील यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. त्यानंतर सर्पमित्र दिनेश ओसवाल आणि गुरुनाथ साठेलकर यांनी घटनास्थळी पोहोचून सुरक्षित रेस्क्यू केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राजेश खांडेकर आणि बाळू रोडे यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
-
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा कायम, कारखान्यांकडून 3900 रुपये पहिली उचल जाहीर
सांगली जिल्ह्यातल्या ऊस दराचा तिढा कायम आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊसाला 3900 प्रति टन पहिली उचल देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापूर पॅटर्न प्रमाणेच दर देण्याची मागणी करत साखर कारखानदारांनी जाहीर केलेला दर अमान्य असल्याची भूमिका घेतली आहे. राजारामबापू साखर कारखान्यासह विश्वास व अन्य चार कारखान्यांनी उसाला 3900 पहिली उचल देण्याचं जाहीर केला आहे,मात्र कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे 3900 अधिक 100 आणि 200 अशा पद्धतीचा दर मिळाला पाहिजे, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून घेण्यात आली आहे.ऊस दरासाठी शिराळा तालुक्यातल्या तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बेमुदत उपोषण देखील सुरू करण्यात आले आहे.
-
चीनमध्ये सुयश आडेचा ऐतिहासिक पराक्रम
धाराशिवच्या शिंगोली तांड्याच्या सुयश आडेची जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी. नुकत्याच चीनमध्ये पार पडलेल्या जागतिक ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत भारताला पहिले पदक. १८ वर्षांखालील एकेरी गटात सुयशने पटकावले ऐतिहासिक रौप्यपदक. सामान्य कुटुंबातील सुयशची जागतिक स्तरावर दमदार भरारी. जागतिक पदक विजेता सुयश धाराशिवमध्ये नवोदित खेळाडूंनाही देतोय प्रशिक्षण
-
शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा सिव्हिलमधील शाही पाहुणचार संपला
खोकल्याच्या कारणास्तव उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात विशेष कैदी कक्षाची व्यवस्था केल्याची चर्चा. राजकीय दबावातून वातानुकूलित कक्ष उभारल्याचा आरोप. प्रकरणाची चर्चा सुरू होताच रुग्णालय प्रशासनाची धावपळ. सोमवारी सायंकाळी रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज. रमेश म्हात्रेची पुन्हा आधारवाडी तुरुंगात रवानगी
-
अंबड तालुक्यातल्या रामगव्हाण शिवारात बिबट्याचं दर्शन, ट्रॅक्टर चालकाने टिपला बिबट्याचा फोटो
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रामगव्हाण शिवारात बिबट्याचं दर्शन झाले वडीगोद्री ते रामगव्हाण रस्ता ओलांडताना एका ट्रॅक्टर चालकाने बिबट्या मुक्त संचार करत असलेला फोटो टिपलाय त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय. सध्या वडीगोद्री रामगव्हाण यासह आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे आणि ऊसतोड मजुरांची वर्दळ नेहमी जास्त आहे परंतु अचानक बिबट्याच दर्शन झाल्याने या सर्वच मजुरांमध्ये भीतीच वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून तात्काळ या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी होऊ लागली आहे…
-
ऐन दुष्काळात सोलापूरमध्ये शेतकऱ्याचा 29 एकर ऊस जळून खाक
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ गावातील घटना. शेतकरी पिंटू जाधव यांचा उभा ऊस जळून खाक झालाय. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेय. आग विझवण्यासाठी गावाकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र ऊस वाचवण्यात अपयश आले. या आगीमुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
-
1.77 कोटी रुपयांच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी अटक
दिवंगत अभिनेत्री निम्मीच्या माजी काळजीवाहकाला १.७७ कोटी रुपयांच्या मालमत्ता घोटाळ्याप्रकरणी अटक. सांताक्रूझ पोलिसांनी दिवंगत अभिनेत्री निम्मीचे माजी काळजीवाहक, ६२ वर्षीय असरार इक्बाल शेख यांना अटक केली आहे. त्यांच्यावर निम्मीची बनावट सही करून २०२१ ते २०२३ दरम्यान बँकेतील ठेवींमधून १.७७ कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर इतर मालमत्तेचा अपहार केल्याचाही आरोप आहे. निम्मीच्या कुटुंबीयांनी जुहू येथील दोन वादग्रस्त फ्लॅट्सच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे. तक्रारदार मोहम्मद युनूस सलीम दुर्रानी, जे निम्मी यांचे भाचे आहेत, त्यांच्याकडे निम्मी यांच्या दत्तक मुलाच्या यूके-स्थित कुटुंबासाठी मुखत्यारपत्र आहे.
मुंबईत विधीमंडळ सल्लागार समितीची बैठक होणार आहे. मंत्रालयात दुपारी लिपिकाचं आरसा गेटला आंदोलन असणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज दुपारी सुनावणी आहे. गेल्या काही दिवसांपासून ही सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने युक्तीवाद केला जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीबाबत अपडेट चिन्ह वाटप आणि पॅनल ठरतील. कन्नड आणि गंगापूर तालुक्यातील शेतकरी संघटनांची ऊसदरवाढीच्या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव येथे पनगेश्वर शुगर मिल्स या साखर कारखान्याच्या समोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातील प्रत्येक घडामोडी तुम्हाला tv9 च्या ब्लॉगवर बघायला मिळेल.