Maharashtra News LIVE: मुंबईतील दाऊदच्या घरावर मुंबई महापालिकेचा बुलडोझर

Maharashtra news live updates: राज्य ते देशभरात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या मध्यमनातून एका क्लिकवर घ्या. सर्व अपडेट्स झटपट पाहा.

Maharashtra News LIVE: मुंबईतील दाऊदच्या घरावर मुंबई महापालिकेचा बुलडोझर
breaking news live today on 19 nov 2026
| Updated on: Nov 19, 2026 | 8:38 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 19 Nov 2026 08:38 AM (IST)

    मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले

    शाही पाहुण्यांसाठी रस्त्यांवर स्वच्छता; मुंबईकरांसाठी कचऱ्याचे साम्राज्य उच्च न्यायालयाकडून महापालिकेची खरडपट्टी. मुंबईतील रस्ते केवळ महत्त्वाच्या व्यक्ती किंवा राजघराण्यातील पाहुण्यांच्या (व्हीआयपी) भेटीच्या वेळीच चकाचक केले जात असल्यावरून न्यायालयाने मुंबई उच्च महापालिकेला फटकारले.सामान्य नागरिकांसाठी अशी स्वच्छता अथवा चकाचक रस्ते दररोज का? ‘इच्छा असेल, तर क्षणात परिस्थिती बदलू शकेल’ राज्य सरकार आणि महापालिकेकडे इच्छा असेल, तर ते काही क्षणात परिस्थिती बदलू शकतात. हे मतप्रदर्शन आम्ही अनुभवातून करत आहोत.

  • 19 Nov 2026 08:36 AM (IST)

    बॉलिवूड सेलिब्रिटींना एक्स-कॅटेगरी सुरक्षा मिळण्याची शक्यता

    अभिनेता आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींना एक्स-कॅटेगरी सुरक्षा मिळण्याची शक्यता. अनेक बॉलिवूड कलाकारांनी विशेष सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधल्याची माहिती. त्यांच्या अर्जांची छाननी आणि धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर सुरक्षेचा निर्णय घेतला जाईल. टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित अलीकडील गोळीबाराची घटना आणि चित्रपट कलाकारांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींना असलेल्या कथित धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस काही चित्रपट कलाकारांना एक्स-कॅटेगरी सुरक्षा देण्याचा विचार करत आहे. अभिनेते आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींनी विशेष सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधल्याची माहिती.


  • 19 Nov 2026 08:36 AM (IST)

    तृतीयपंथी समुदायाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी दिल्ली सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    तृतीयपंथी समुदायाला आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या प्रस्तावाला दिल्ली मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आरोग्यमंत्री डॉ. पंकज सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला होता. या निर्णयाचा दिल्लीतील ५,६०० हून अधिक तृतीयपंथी व्यक्तींना लाभ होण्याची अपेक्षा असल्याच आरोग्यमंत्री पंकज सिंह यांनी सांगितल. गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याची वेळ किंवा महागड्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवताना या आरोग्य योजनेमुळे आर्थिक आधार मिळेल

  • 19 Nov 2026 08:35 AM (IST)

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हाय-व्होल्टेज ड्रामा

    मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणीने मोटरमनच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ गोरेगाव रेल्वे स्टेशनवरील असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्कर्ट आणि हाय हिल्स घातलेली, वयाने साधारण वीसच्या आसपास असलेली एक तरुणी मोटरमनच्या केबिनच्या दाराजवळ उभी असल्याचे दिसत आहे. ती दोन्ही हातांनी दाराचे हँडल पकडून मागे झुकत, विचित्र हालचाली करत केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे स्टेशनवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

  • 19 Nov 2026 08:33 AM (IST)

    अमरावती शहरातील डॉक्टर वैशाली भोजने यांनी त्यांच्या नर्सिंग होम मधील बाळ विकल्याचे प्रकरण…

    अमरावती शहरातील डॉक्टर वैशाली भोजने यांनी त्यांच्या नर्सिंग होम मधील बाळ विकल्याचे प्रकरण. अवैध मार्गाने विक्री केलेल्या एक वर्षाच्या बाळासह दांपत्य ताब्यात. वर्षभरापूर्वी व्यवहारात मध्यस्थी करणारा एक व्यक्ती ताब्यात; अमरावती शहरातील बाळ विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढली. वर्धा येथील दाम्पत्यांना मूलबाळ होत नसल्याने त्यांनी डॉक्टर भोजने यांच्यामार्फत घेतले होते बाळ विकत. बाळाची विक्री किती रुपयात झाली याचा तपास पोलिसांकडून सुरू.


मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया इस्टेट येथील मुसाफिरखाना इमारतीवर आज BMC चा हातोडा चालणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, याच इमारतीशी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जुन्या घराचा संबंध आहे. दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांचं हे घर असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मुसाफिरखाना इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, तिच्या भिंती आणि छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीला C-1 श्रेणीतील धोकादायक इमारत घोषित करण्यात आलं आहे. याच्या अपडेट्सकडे लक्ष असेल. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले असून व्हीआयपी दौऱ्यावेळीच रस्ते चकाचक का होतात? असा कोर्टाचा संतप्त सवाल आहे. सामान्य मुंबईकरांसाठी रस्ते दररोज स्वच्छ का नसतात? अशी कोर्टाची विचारणा आहे. ‘इच्छा असेल तर क्षणात परिस्थिती बदलू शकते’ असे उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. केवळ दोन दिवसांचा देखावा न करता कायमस्वरूपी सुधारणा करा असे कोर्टाचे निर्देश दिले आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटींना एक्स-कॅटेगरी सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश करण्याच्या प्रस्तावाला दिल्ली मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासोबतच राज्यातील प्रत्येक घडामोडी तुम्हाला tv9 च्या ब्लॉगवर बघायला मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us