Maharashtra News : सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ, अत्याधुनिक शस्त्रांसह जवान तैनात..
Maharashtra News : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. टायगर श्रॉफ प्रकरणानंतर मोठी माहिती पुढे येत आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान यांच्याही घराची रेकी हल्लेखोरांकडून करण्यात आली होती.

LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकच्या कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक
नाशिकच्या कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. रामकुंड आणि गोदा घाटावरील काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि नाशिकच्या महापौर आज राष्ट्रपतींना निमंत्रण देणार आहेत. नाशिक आणि त्रंबकेश्वर मधील ध्वजारोहण सोहळ्याचे दिल्लीत जाऊन निमंत्रण देणार आहेत.
-
ठाकरे शिवसेनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष चा शिंदे शिवसेनेत प्रवेश
धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शिवसेनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती.
-
-
दर्शनाच्या बहाण्याने दिड किलो चांदीच्या वस्तू पळविल्या, CCTV मध्ये अनोळखी महिला कैद
नांदेड शहरातील मगनपुरा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बुधवारी दुपारच्या सुमारास चोरीची घटना घडलीय. चोरट्नीया महिलेने केंद्रातून एक किलो वजनाचा चांदीचा तांब्या आणि दोन ग्लास असा एकूण दीड किलो चांदीचा ऐवज लंपास केल्याचे सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी संशयित महिलेचा शोध सुरु आहे. भाविकांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल तपास करण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी आता जोर धरत आहे.
-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शक्तीपीठ मार्गाविरोधात रावण दहन आंदोलन
सांगलीच्या नागेवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दसऱ्याच्या निमित्ताने शक्तिपीठाच्या विरोधात रावण दहन आंदोलन करण्यात आले आहे.माजी खासदार राजू शेट्टींच्या हस्ते शक्तीपीठरुपी करण्यात रावणाच्या प्रतीकृतीचे दहन करण्यात आले आहे.शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला असणारा विरोध दर्शवण्यासाठी शक्तीपीठरुपी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.कोणत्याही परिस्थिती खानापूर तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही,असा निर्धार यावेळी करण्यात आला.
-
विट्यात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला पालखी शर्यत सोहळा
विजयीदशमी निमित्ताने सांगलीच्या विटा येथे ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दीडशे वर्षांची मोठी प्रदीर्घ परंपरा असणारया पालखी शर्यत सोहळ्यात विट्याचा श्री रेवणसिध्द देव व मूळस्थान येथील श्री रेवणसिध्द देव या दोन देवांच्या पालख्यामध्ये शर्यत झाली.ज्यामध्ये मूळस्थानच्या पालखीने निर्णायक क्षणी आघाडी घेत पालखी शर्यत जिंकली. रेवणसिध्दाच्या नावानं चांगभलं”च्या गजराने अवघी विटा नगरी यावेळी दुमदुमून गेली होती,या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित होते.पालखी शर्यत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त विटा शहरात आणि पालखी मार्गावर तैनात करण्यात आला होता.
-
-
मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन मतदारांना पदवीधर उमेदवाराचे हमी पत्र
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहीन दिलीप घुगे यांनी लिहिले मतदारांना हमी पत्र. मराठवाडा पदवीधर निवडणूकीचे महावीकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमदेवार दिलीप घुगे ह्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहीन म्हणत मतदारांना लिहले हमी पत्र. मतदारांना लिहिलेले हमीपत्र सोशल मीडियावर व्हायरल. माझ्या विरोधात मोठ्या पक्ष्याचे उभे असलेले उमदेवार कुणीही एका पक्ष्याचा नाही. सगळे पक्ष बदलून आले,हे आता पडतील आणि 2029 च्या विधानसभेला दुसऱ्याच पक्ष्याकडून उभे राहितील..
-
आमदार रोहित पवार आज बोरगाव येथील जीवन संपवल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले
बोरगाव तेलंग येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी शंकर क्षीरसागर यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांच्याकडून सात्वनपर भेट. शंकर क्षीरसागर यांची भक्ती आणि शिवानी या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ टाकून शेतकरी शंकर क्षीरसागर यांनी केली दोन दिवसांपूर्वी जीवन संपवले होते. तीन वेळ कर्ज माफी होऊन ही मला कर्जमाफिचा लाभ मिळाला नाही. माझ्या मुलींना शैक्षणिक फी माफ झाली म्हणतं जीवन संपवण्यापूर्वी केला होता शेतकऱ्याने व्हिडिओ
-
कराडच्या युनिक उड्डाणपुलावर रात्री भरधाव स्कॉर्पिओचा भीषण अपघात
कराडच्या युनिक उड्डाण पुलावरील रात्री कोल्हापूर ते सातारा लेनवर भरधाव स्कॉर्पिओने पाठीमागून ट्रकला जोराने धडक दिली यामुळे स्कॉर्पिओ जागेवर फिरून तिचे तोंड पाठीमागे झाले व स्कॉर्पिओनी पाठीमागून येणाऱ्या छोट्या हत्तीला धडक दिली या अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला असून स्कॉर्पिओ मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले
-
टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सलमान खान यांच्या सुरक्षेत मोठी वाढ
सलमान खान यांच्या घराची आरोपींकडून रेकी केल्याची माहिती. सलमान खान यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रूफ काचांचे संरक्षण. अभिनेता सलमान खान यांच्या घराच्या सुरक्षेत मोठी वाढ. सलमान खान यांच्या घराला बुलेटप्रूफ काचांचे सुरक्षा कवच. सीसीटीव्हीत देखील वाढ करण्यात आली आहे
-
सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. अत्याधुनिक शस्त्र असलेले जवान त्याच्या घराबाहेर तैनात करण्यात आलीत.
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठे खुलासे होत आहे. त्यातच अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान आणि सलमान खान यांच्या घराची रेकी हल्लेखोरांकडून करण्यात आल्याची माहिती पुढे आली. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांनी आपला प्लान चेंज केला. आरोपींची चाैकशी सुरू आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक निवडणूक मतदान 23 ऑक्टोबर रोजी पार पडत आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तयारी अंतिम टप्प्यात. रामकुंड आणि गोदाघाट परिसराची महापालिका आयुक्त करणार पाहणी. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ उद्या कन्नड येथे (सकाळी 10) जाहीर सभा तर सिल्लोड येथे (दुपारी 1) जाहीर सभा मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.