Maharashtra News LIVE : इंदापूर तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आज एकाच दिवशी दोन मोर्चे

Maharashtra News LIVE : भाजपचा इंदापूर तहसीलदारांच्या कामकाजाला विरोध तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी तहसीलदारांच्या समर्थनार्थ मैदानात. आज दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे.

Maharashtra News LIVE : इंदापूर तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आज एकाच दिवशी दोन मोर्चे
Maharashtra News
| Updated on: Nov 25, 2026 | 8:07 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Nov 2026 08:20 AM (IST)

    मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली; अनेक भागांत AQI 200 पार…

    मुंबईचा आज AQI १४० च्या घरात नोंदवला गेलाय. काही भागांमध्ये मात्र हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या पुढे गेला आहे. हवा ‘अस्वस्थ’ श्रेणीत आहे.

    हवेतील प्रमुख प्रदूषकांमध्ये PM2.5 आणि PM10 चे प्रमाण अधिक आहे. PM2.5 ची पातळी १०१ मायक्रोग्रॅम, तर PM10 सुमारे १३० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवला गेलाय

    चेंबूरमध्ये AQI १७६, अंधेरी पूर्व १७५, बीकेसी १७८, दादर पश्चिम १८० आणि बोरिवलीत १८२ इतका आहे. वांद्रे पश्चिममध्ये AQI २०२ वर पोहोचला आहे.

    हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    सकाळी लवकर आणि रात्री बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, तसेच अनावश्यक शारीरिक श्रम टाळावेत. असं आवाहन करण्यात येतंय

  • 25 Nov 2026 08:05 AM (IST)

    इंदापूर तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आज एकाच दिवशी दोन मोर्चे..

    इंदापूरच्या तहसील कार्यालयात आता राजकीय संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. इंदापूरच्या तहसीलदारांच्या कामकाजाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे कमी केल्याच्या मुद्द्यावरून त्याच दिवशी प्रतिमोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी एकाच तहसील कार्यालयावर दोन राजकीय पक्ष आमनेसामने येणार आहेत.


इंदापूर तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि विरोधात आज एकाच दिवशी दोन मोर्चे! भाजपचा इंदापूर तहसीलदारांच्या कामकाजाला विरोध; तर अजित पवार गटाची राष्ट्रवादी तहसीलदारांच्या समर्थनार्थ मैदानात. इंदापूरच्या तहसील कार्यालयात आता राजकीय संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. इंदापूरच्या तहसीलदारांच्या कामकाजाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तहसीलदारांच्या समर्थनार्थ आणि एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांची नावे कमी केल्याच्या मुद्द्यावरून त्याच दिवशी प्रतिमोर्चा काढण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 42 वी पुण्यतिथी. पुण्यतिथीनिमित्त कराडमधील प्रीतिसंगम येथील समाधीस्थळी अभिवादन कार्यक्रम. आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी कोर्टात पार पडणार आहे.  यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us