Maharashtra News LIVE : कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजीचा धडाका!

राज ठाकरेंच्या दौऱ्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तर, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजीचा धडाका लावला आहे, तर दुसरीकडे मुक्ताईनगर येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. नारपूर याठिकाणी रामटेक तालुक्यात 11 वर्षीय मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजीचा धडाका!
| Updated on: Nov 29, 2026 | 10:01 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Nov 2026 10:01 AM (IST)

    रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील आमने सामने

    जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर मतदान केंद्रावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमने सामने आले. मतदान केंद्रावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रोटोकॉलवर आमदार चंद्रकांत पाटलांनी आक्षेप घेतला. प्रोटोकॉल च्या माध्यमातून मतदारांवर दबाव टाकण्याचा आमदार चंद्रकांत पाटलांनी व्यक्त संशय केला. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे तीन ठिकाणी मतदान असल्याचाही आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप केला.तर प्रोटोकॉल आम्हाला शासनाकडून मिळालेला सुरक्षेसाठी प्रोटोकॉल हा माझ्यासोबतच त्यात गैर काय रक्षा खडसे यांनी सवाल उपस्थित केला.

  • 29 Nov 2026 09:50 AM (IST)

    वसई-विरार महापालिकेच्या वतीने वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी ‘बीच क्लीन ड्राइव्ह’ स्वच्छता मोहीम

    वसई-विरार महापालिकेच्या वतीने वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी ‘बीच क्लीन ड्राइव्ह’ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पालिकेचे आयुक्त प्रथ्वीराज बी पी सह महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, तसेच वसई तालुक्यातील विविध स्वायत्त संस्था, शाळा आणि सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला असून समुद्रकिनारी नवीन सुरूच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच समुद्रकिनारी प्लास्टिक प्रदूषणमुक्त करण्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


  • 29 Nov 2026 09:40 AM (IST)

    विहिरीत टँकरसह ट्रॅक्टर कोसळून तरुणाचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातल्या कायगाव येथील घटना

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक हृदय द्रावक घटना समोर आली, सिल्लोड तालुक्यातल्या कायगाव मध्ये टँकरसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झालाय. शेतात वाळून चाललेलं अद्रक पीक वाचविण्यासाठी विकतचे पाणी घेऊन स्वतःच्या विहिरीत टाकताना अंदाज हुकल्यामुळे टँकरसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळलाय.आकाश भोकरे असं कायगाव येथील मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे, सध्या दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने अनेक शेतकरी आपली पिकं वाचविण्यासाठी विकत पाणी आणून सोडत आहे, आकाश सुदाम भोकरे यांच्या शेतात दीड एकर क्षेत्रावर अद्रक पीक असून त्यांनी गावातल्या एका व्यक्तीच्या विहिरीवरून विकत पाणी घेतले होते मात्र स्वतःच्या शेतातील पीक वाचवताना आकाशचा मृत्यू झालाय, दरम्यान या घटनेमुळे परिसरावर मोठी शोककळा पसरली

  • 29 Nov 2026 09:30 AM (IST)

    जळगावात जलपरीचा कार्यक्रम पाहायला आलेल्या ११ वर्षीय मुलाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण

    जळगावात जलपरीचा कार्यक्रम पाहायला आलेल्या ११ वर्षीय मुलाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण करण्यात आली. खानदेश सेंट्रल मॉल परिसरातील कार्यक्रम पाहण्या साठी आलेल्या मुलाच्या डोळ्यावर सुरक्षा रक्षकाने ठोसा मारला. पालकांची जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांनी मागितली माफी, कारवाईसाठी सहकार्याचे आश्वासन ! देण्यात आलं. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात मुलाच्या पालकांसह नातेवाईकांची गर्दी जमली होती.

  • 29 Nov 2026 09:23 AM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेतील खासदारांना व्हीप जारी

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेतील खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.  २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक आहे. सर्व लोकसभा खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे अनिवार्य आदेश देण्यात आले.  १३२ वी घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होणार. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. दोन्ही विधेयकांबाबत पक्षाची भूमिका आणि रणनीती ठरणार आहेत, बैठकीला अनुपस्थित राहण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला. मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्याकडून तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.


  • 29 Nov 2026 09:19 AM (IST)

    उमरग्यात पवनचक्की कंपनीच्या वाहनांची तोडफोड; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात पवनचक्की कंपनीच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या कामासाठी लावण्यात आलेल्या तब्बल १४ वाहनांची लाकडी दांडे, हॉकी स्टिक, क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने तोडफोड करण्यात आली होती. खंडणीची मागणी करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे. या घटनेत कंपनीचे अंदाजे ५ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. २५ नोव्हेंबर रोजी रात्री उमरगा शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी एकूण दहा जणांविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 29 Nov 2026 09:18 AM (IST)

    प्रोटोकॉल असताना राजकीय नेते मतदान केंद्रावर का?

    प्रोटोकॉल असताना राजकीय नेते मतदान केंद्रावर का? केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीच्या नेते रोहिणी खडसे ह्या मतदान केंद्रावर थांबून आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संदर्भात पोलीस अधीक्षकांना फोन केला आहे.  मतदारांवर दबाव यामुळे पडतो असं त्यांनी म्हटल आहे

मराठी हृदयसम्राट ‘तुम्ही राजा होता, आहात अन् राजाच राहणार’, तर ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याची कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मुक्ताईनगर येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे. केंद्रीय मंत्री रक्षा तर्फे आणि राष्ट्रवादीच्या नेते रोहिणी खडसे ह्या मतदान केंद्रावर थांबून आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित करत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी संदर्भात पोलीस अधीक्षकांना फोन केला आहे. एक धक्कादायक घटना देखील समोर येत आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोरील तरघर रेल्वे स्थानकाजवळील पुलावर शनिवारी मध्यरात्री एक मोठा कंटेनर अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाला.

या घटनेमुळे विमानतळ मार्गासह उलवे परिसरातील रस्त्यांवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर, नारपूर याठिकाणी रामटेक तालुक्यात 11 वर्षीय मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. मुलाच्या आजीने दगड आणि विटा मारून बिबट्याला हकलून लावलं, ज्यामुळे मुलाचा जीव वाचला. भिलेवाडा येथील चौकसे यांच्या वीटभट्टीवर खेळत असताना बिबट्याने मुलावर झडपघातली. परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us