Maharashtra News LIVE : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत घडामोडिंना वेग, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना निरोप पोहोचला
Maharashtra News LIVE : मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. ढगाळ वातावरण आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात हलका पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

LIVE NEWS & UPDATES
-
अंबरनाथ रेल्वे स्थानकात अल्पवयीन मोबाईल चोराला अटक
अंबरनाथ रेल्वे स्थानकात अल्पवयीन मोबाईल चोराला अटक
महिला प्रवाशाचा मोबाईल चोरून पळत होता चोर
प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं
पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती
-
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये घडामोडींना वेग
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये घडामोडींना वेग
महायुतीतील नेते उदय सामंतांच्या भेटीला
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उदयकुमार आहेर मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला
नाशिकच्या एका खासगी हॉटेलमध्ये भेट घेण्यासाठी दाखल
राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांनी भरला आहे उमेदवारी अर्ज
-
-
नंदुरबार जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी-नाले पुन्हा प्रवाहित
पावसामुळे विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना मिळाला आधार
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना मोठा दिलासा
उकाड्याने त्रस्त नागरिकांना गारव्याचा अनुभव
शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण, खरीप हंगामाच्या तयारीला वेग
आगामी मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण
-
कांदिवली डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकावर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक
मुंबई : कांदिवली डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकावर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कांदिवली दहानुकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
-
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाले आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी-नाले पुन्हा प्रवाहित झाले आहेत. पावसामुळे विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना आधार मिलाला आहे. या पावसामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
-
डोळ्यात मिरची पावडर फेकून तलवारीने वार, अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथमध्ये भंगार व्यावसायिकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डोळ्यात मिरची पावडर फेकून तलवारीने वार करण्यात आले आहेत.
-
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत घडामोडिंना वेग, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना निरोप पोहोचला
नाशिक : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत घडामोडिंना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना भेटीसाठी उदय सामंत यांचा फोनवरुन निरोप पोहोचला आहे. गोकुळ गीते उदय सामंत यांची 8 वाजता भेट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोकुळ गीते यांचं शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे मोठे आव्हान दिले आहे. गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी मंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. गोकुळ गिते आणि गणेश गिते दोघेही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
कन्नड तालुक्यातील मक्रणपूर आणि रेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय जोंधळे यांना 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे कन्नड तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
-
कल्याण : काळा तलाव परिसरात व्यावसायिक वादातून जीवघेणा हल्ला
कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात व्यावसायिक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास काळा तलाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
-
मिरा भाईंदर : टोमॅटो कॅरेटच्या वादातून फेरीवाल्याचा मृत्यू
मीरा भाईंदर पूर्वेकडील नवघर परिसरात टोमॅटोच्या कॅरेटवरून दोन फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाच्या डोक्याला गंभीर मुका मार लागला. यानंतर उपचारादरम्यान चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
-
मुंबई : उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून नाल्यांची पाहणी
मुंबईमध्ये आज पावसाने हजेरी लावली, मात्र अजून ही मुंबईत नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही. उपमहापौर संजय घाडी यांनी आज कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी इत्यादी भागातील महत्वाच्या नाल्यांची पाहणी केली. या सफाई दौऱ्यात उपमहापौरांनी नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याने अधिकारी आणि कंत्राटदार यांना धारेवर धरले.
-
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी थेट ट्रकच्या मागच्या टायरखाली आल्याने 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे.
राजू गुप्ता आणि पवन गुप्ता अशी मृतांची नावं आहेत. तरुणांचा अपघात पहाटे 4 वाजता मित्राला भेटण्यासाठी वरपकडे जात असताना दुर्घटना घडली. दरम्यान टिटवाळा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. -
संभाजीनगरची जागा आमच्यासाठी सुटली नाही हे दुर्देव : संजय शिरसाट
संभाजीनगरची जागा आमच्यासाठी सुटली नाही हे दुर्देव आहे. शिवसेनेसाठी जागा सुटावी अशी आमची इच्छा होती. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री थोडा नाराज असतो, असं संजय शिरसाट म्हणाले.
तसेच भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाहीय. तसेच नाराजी दाखवायची लिमिट असते, असं म्हणत शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन प्रतिक्रिया दिली. भाजप शिवसेनेला संपवत असल्याचं सत्तार म्हणाले होते.
-
डी के शिवकुमार कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदी, पद आणि गोपनियतेची शपथ
डी के शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. डी के शिवकुमार यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. बंगळुरुतील लोकभवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला.
-
नंदुरबारमधील अक्कलकुवा परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे स्थानिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच कृषी विभागाकडून जोपर्यंत 100 मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे.
-
जळगावच्या धानोरामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड
जळगावच्या धानोरामध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तीन ते चार वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वाळू चोरीच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी 14 ते 15 डंपर अडवले. घटनेमुळे धानोरा गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
आमच्यात कुठेच बंडखोरी होणार नाही – गिरीश महाजन
गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्याशी संवाद साधणार आहे. गणेश गीते यांना अर्ज मागे घ्यायला सांगणार आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. बंडखोरी होणार नाही आणि चर्चेतून मार्ग काढू असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
-
नाशिकचे महायुतीचे बंडखोर उमेदवार गणेश गीते निवडणूक लढण्यावर ठाम
नाशिकचे महायुतीचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आपल्या उमेदवारी ठाम आहेत. त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महाजनांनी चर्चेसाठी बोलवलं आहे आणि चर्चेनंतर निर्णय घेईल, असं गणेश गीते यांनी सांगितलं.
-
सुनेत्रा पवार यांच्याकडून सुनील टिंगरे यांची नाराजी दूर
विधानपरिषद निवडणुकीदरम्यान नाराजीनाट्य सुरू आहे. पुण्यात सुनील टिंगरे हे नाराज झाले होते. त्यांची नाराजी सुनेत्रा पवार यांनी दूर केली आहे. सुनील टिंगरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांचा आदेश मान्य असल्याचं टिंगेरे यांनी सांगितलं.
-
माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत कपात
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष सौरव गांगुली यांची सुरक्षा ‘झेड श्रेणी’वरून ‘वाय श्रेणी’त कमी करण्यात आली आहे.
-
ठाण्यातील मुंब्रा परिसरात नालेसफाई अर्धवट
ठाणे महानगरपालिकेचा नालेसफाई संदर्भात बोजवारा उडाला आहे. महापालिकेला नालेसफाई संदर्भात जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेविका पल्लवी जगताप चक्क नाल्यात उतरवून नाले सफाई करणार आहे.
-
भावकीच्या वादात बहिणीला मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल
घरकुलाच्या बांधकामावरून सुरू झालेला दोन भावांमधील वाद विकोपाला गेल्याची घटना खेड तालुक्यातील वाळद येथे घडली आहे. विशेष म्हणजे हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच भाऊ आणि त्यांच्या मुलांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी एका ट्रॅक्टर चालकावरही कोयत्याने हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी खेड पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्ट छेडछाड प्रकरणी आरोपीला अटक
कांदिवलीच्या डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीशी छेडछाड करणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर गावी पळून जात असताना पोलिसांनी त्याला छत्तीसगडमधील रायपूर जंक्शन रेल्वे स्थानकावरून पकडलं. घटना घडल्यानंतर आरोपी ट्रेनने गावी पळून जात होता. माहिती मिळताच कांदिवली पोलिसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला छत्तीसगडमधील रायपूर जंक्शन रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
-
दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये आग
दिल्लीच्या मालवीय नगरमधील रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
विरोधकांकडे पुरेसं संख्याबळच नाही- तटकरे
एनडीए देशात आणि राज्यात मजबूत राहिली पाहिजे. विरोधकांकडे पुरेसं संख्याबळच नाही. सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. अर्ज मागे घेणाऱ्यांचा येत्या काळात विचार करू. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे.
-
बंडखोरांनी आपले अर्ज मागे घ्यावेत- रवींद्र चव्हाण
“विधान परिषदेच्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होणार. बंडखोरांना माझी नम्र विनंती आहे की, वरिष्ठांनी बोलून त्यांनी अर्ज मागे घ्यावेत. महायुतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात एकत्र निर्णय घेतला आहे”, असं रवींद्र चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची पत्रकार परिषद
विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. “जागांचं वाटप सर्व नेतेमंडळींनी बसून अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची तारीख 4 जून आहे. बऱ्याच ठिकाणी अर्ज मागे घेतल्या जातील, अशी परिस्थिती आहे. काल फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत नेत्यांची बैठक झाली. महायुतीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी त्यानुसार प्रमुख नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत”, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
-
खासदार संजय राऊत नाशिकच्या रामकुंडावर दाखल
खासदार संजय राऊत नाशिकच्या रामकुंडावर दाखल झाले आहेत. रिंगरोड आणि एमआयडीसी भूसंपादन विरोधातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी संजय राऊत याठिकाणी पोहोचले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून रामकुंड इथं आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलकांची आमदार रोहित पवार यांनी देखील भेट घेतली होती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.
-
महायुतीत एक पक्ष दुसरा पक्ष संपवतोय, फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार- अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्यात साडेतीन तास बैठक झाली. अर्ज मागे घ्या, युती धर्म पाळा अशा सूचना शिंदेंनी सत्तारांना दिल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, “महायुतीत एक पक्ष दुसरा पक्ष संपवतोय. मी फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. पक्ष संपू नये, पक्षाचं नुकसान होऊ नये, अशी माझी भूमिका आहे. आमच्याकडून मोठा भाऊ सत्ता हिसकावून घेतोय. स्थानिक पातळीवर परिस्थिती बदलतेय.”
-
अमेरिका भारतासह 60 देशांवर नवे टॅरिफ लावण्याच्या तयारीत
अमेरिका भारतासह 60 देशांवर नवे टॅरिफ लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘सक्तीचे श्रम’ रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही लावण्यात आला आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कॅनडा, मेक्सिको, तैवान, युके आणि इतर देशांवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. सक्तीच्या मजुरीने बनवलेल्या वस्तूंच्या आयातीवरील बंदीची या देशांनी योग्य अंमलबजावली केली नसल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
-
दिल्लीत मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला आग, 10 जणांचा मृत्यू
दिल्लीत मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटला आग लागली आहे. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेलं नाही.
-
हिंजवडी, पुणे – थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या . आयटी पार्क हिंजवडी येथील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांच्या जवळपास 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक करून रातोरात बाडबिस्तारा गुंडाळला होता.
-
सुरत येथील भीषण बस अपघातातील मयत बस चालकावर मूळ गावी अंत्यसंस्कार
सुरत येथील बारडोली गावात बसच्या भीषण अपघातातील मयत बस चालकाचा मृतदेह, कुऱ्हा पानाचे या मूळ गावी गावी दाखल झाला. घनश्याम राघो बरकले असे मयत 42 वर्षीय मयत बस चालकाचे नाव आहे.
सुरत येथे भीषण अपघातात जळून खाक झालेली बस ही जळगावच्या जामनेर बस आगाराची होती यात बस चालकाचा मृत्यू झाला. आज सकाळीच मयत चालक घनश्याम बरकले यांचा मृतदेह त्यांच्या गावी दाखल झाला, त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली
-
रोहित पवार , जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या आंदोलनादरम्यानरोहित पवार , जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून या सरकारचं करायचं काय, खाली डोक वर पाय, अशा घोषणा महिला कार्यकर्त्यांकडून आक्रमकपणे देण्यात येत आहे.
-
नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीविरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. रोहित पवार , शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तसेच अनेक आंदोलकही पोलिसांच्या ताब्यात.
-
चांदवड सरकारी केंद्रावर १७ दिवसांत एक किलोही कांदा खरेदी नाही; शेतकऱ्यांची पाठ
नाशिक जिल्ह्यातील चांदवड शासकीय कांदा खरेदी केंद्रावर गेल्या १७ दिवसांत एक किलोही कांद्याची खरेदी झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने कांद्यासाठी १५ रुपये ८० पैसे प्रतिकिलोचा दर जाहीर केला असला, तरी सध्या खुल्या बाजार समित्यांमध्ये यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रांकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. कडक अटी-शर्ती आणि मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे आता शासकीय कांदा खरेदी प्रक्रियेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील १९ पैकी १८ केंद्रांवर मिळून केवळ ४८ मेट्रिक टन कांद्याची खरेदी झाली असून, त्यातील २० टन कांदा साठवून ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या उदासीनतेमुळे शासनाचे २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-
भाजप मित्रपक्षासारखा वागत नाही, आमदारांची धुसफूस; शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर आक्रमक
शिवसेना नेते अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांच्यानंतर आता भंडार्याचे शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांनीही भाजपवर थेट निशाणा साधल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सत्तार आणि गायकवाड जे बोलले ते अगदी सत्य असून, भंडारा जिल्ह्यातही हीच परिस्थिती असल्याचा दावा बोंडेकर यांनी केला आहे. भाजप मित्रपक्षासारखा वागत नसून शिवसेना आमदारांमध्ये सर्वत्र तीव्र धुसफूस असल्याचे सांगत, त्यांनी भाजप नेते परिणय फुके आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही उठाव केला कारण भाजप मित्रपक्षासारखा राहील, पण आमचा अपमान होत असेल आणि आमच्या नगरसेवकांना निधी दिला जात नसेल तर काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आली की १० फोन करणारे भाजप नेते माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत, या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी असली तरी ते महायुतीला मदत करणार असल्याचेही बोंडेकर यांनी स्पष्ट केले.
-
वेंगुर्ल्याच्या समुद्रात गडहिंग्लजचा पर्यटक बुडाला; लाटांचा अंदाज न आल्याने दुर्घटना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील प्रसिद्ध शिरोडा-वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक जण खोल पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव देवमाने असे समुद्रात वाहून गेलेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. कोल्हापूरहून पर्यटनासाठी आलेले हे तरुण सायंकाळच्या सुमारास समुद्रात आंघोळीचा आनंद घेत असताना, पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. यातील एकाने शर्थीचे प्रयत्न करत पोहून किनारा गाठल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला, मात्र प्रणव हा पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला. सध्या शिरोडा पोलीस, स्थानिक जीवरक्षक आणि मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात त्याचा कसून शोध घेतला जात असून, पर्यटकांनी समुद्रात उतरताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-
दौंडमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचे मोठे रॅकेट उघड; केडगाव परिसरात ५० हजारात तपासणी, व्हिडिओ व्हायरल
पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणारे एक संशयास्पद रॅकेट उघडकीस आले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका कथित डॉक्टरकडून अत्यंत गुप्तपणे ही तपासणी केली जात असून, यासाठी ३५ ते ५० हजार रुपये उकळले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हे संघटित रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, संबंधितांना राजकीय आश्रय असल्यामुळेच प्रशासन कारवाई करत नसल्याचा थेट संशय व्यक्त होत आहे. यात अनेक दलाल आणि डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता असून, PCPNDT कायद्यांतर्गत या गंभीर गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
-
ऐतिहासिक कपालेश्वर मंदिराजवळील जुना वाडा कोसळला; एक भाविक जखमी
नाशिक येथील ऐतिहासिक कपालेश्वर मंदिरालगत असलेला एक जुना वाडा अचानक कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत मंदिरात दर्शनासाठी आलेला एक भाविक जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने वेळेवर हा धोकादायक वाडा पाडला नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा थेट आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे कपालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक जुन्या आणि धोकादायक वाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-
दारूकांडापेक्षा मोठी दुर्घटना प्रदूषित पाण्यामुळे घडेल, खासदार श्रीरंग बारणे यांचा पिंपरी-चिंचवड प्रशासनाला इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातील विषारी दारूकांडात १२ जणांचा बळी गेला असतानाच, शहरातील पाणीपुरवठ्याबाबत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी एक अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. पवना नदीच्या पात्रात मैलामिश्रित आणि केमिकलचे पाणी थेट सोडले जात असल्याने, हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणी अहवालातून महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी ‘विषापेक्षाही भयंकर’ असल्याचे स्पष्ट झाले असून, स्वतःलाही हे पाणी पिण्याची भीती वाटत असल्याचे बारणे यांनी म्हटले आहे. महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने या प्रदूषित पाणीपुरवठ्याबाबत वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर नागरिकांना आपल्या जीवावर बेतणारी मोठी किंमत चुकवावी लागेल, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
-
वाळू वाहतूक करणाऱ्या 6 डंपरची तोडफोड
जळगाव तालुक्यातील धानोरा शिवारात संतप्त ग्रामस्थांकडून वाळू वाहतूक करणाऱ्या 6 डंपरची तोडफोड. घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार यांच्या वाहनावर देखील संतप्त ग्रामस्थांकडून दगडफेक. गावातील एका तरुणाला वाळूची वाहतूक करणाऱ्याने कट मारल्याने संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री वाळूची डंपर अडवून त्यांची तोडफोड केल्याची माहिती. वाळूमाफीयांनी रात्री वाळूची वाहन घेऊन जाऊ नये म्हणून रात्रीपासून महसूल कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
-
गावगुंडांकडून एका तरुणावर कोयत्याच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला
पुण्याच्या खेड तालुक्यातील मरकळ परिसरात गावगुंडांकडून एका तरुणावर कोयत्याच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वर उर्फ बबलू पाचपुते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
-
पत्नीने दारू पिण्यास मनाई केली म्हणून पतीची आत्महत्या
पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे आहे. पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याने संतापलेल्या एका पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे.अरविंद लोहार असे मृत व्यक्तीचे नाव आहे
-
सूरत बस अपघातात बस चालकाचा दुर्देवी मृत्यू
सूरत बस अपघातात कु-हा पानाच्या बस चालकाचा दुर्देवी मृत्यू. घटनेची माहिती मिळतात गावावर शोककळा पसरली. बसचालकाच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळी गावकरी यांची गर्दी. 2013 पासून बस चालक मध्ये घनश्याम बर्कले हा एसटी महामंडळ मध्ये कार्यरत होता. चालकाच्या पश्चात एक मुलगी पत्नी, आई वडील असं कुटुंब आहे.
-
मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या
विषारी दारुकांडात सीआयडीने मोठी कारवाई केलीये. योगेश व्हानखेडेला मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्यात. रेक्स इंटरनॅशनल कंपनीत हे दोघे कामाला होते. कंपनीला अंधारात ठेऊन या दोघांनी मिथेनॉलची विक्री केल्याचं तपासात निष्पन्न झालं. बनावट जीएसटी नंबर आणि प्रदीप शर्माच्या नावाचे बनावट आधार कार्ड घेऊन, 17 हजार 500 रुपयांचे 210 लिटर मिथेनॉल दिलं होतं. हेचं मिथेनॉल दारुत मिक्स केल्यानं 25 जणांचा जीव गेलाय.
-
संभाजीनगर विषयी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात ठाण्यातील महापौर निवासस्थानी पार पडली बैठक
बैठकीला एकनाथ शिंदे,खासदार सांदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संभाजीनगर मध्ये झालेल्या बंडखोरी आणि जिल्हा बँक निवडणुकीबद्दल चर्चा झाली.अब्दुल सत्तर महायुतीचा नियम पाळतील असे एकनाथ शिंदे म्हणाले, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेणार एस सत्तार म्हणाले
-
दादर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांची गर्दी. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल. दिवसभरात गर्दी अधिक वाढू शकते.
-
डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीशी छेडछाड
डहाणूकरवाडी मेट्रो लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीशी छेडछाड. कांदिवली पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात. मनसे-ठाकरे शिवसेनेचा निषेध,मेट्रो लिफ्टमध्ये सीसीटीव्ही-सुरक्षारक्षकाची मागणी
-
तुळजाभवानी मंदिरातील प्रवेश व्यवस्थेत बदल; आजपासून नवे नियम लागू
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या संवर्धन व विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील भाविकांच्या प्रवेश व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आज पहाटे 4 वाजल्यापासून हा नियम लागू करण्यात आला आहे.राज्य संरक्षित स्मारक असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामांना 1 जून पासून प्रारंभ झाला आहे मंदिर परिसरात विविध विकासकामेही सुरू आहेत. त्यामुळे भाविकांचे दर्शन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुरळी
-
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी गोपीनाथ गडावर अत्यंत साधेपणाने साजरी
3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. धार्मिक कार्यक्रम भजन महाप्रसाद असे कार्यक्रम असतील. मुंडे साहेबाला आवडेल असाच मी आज एक संकल्प करणार. सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी पंकजा मुंडे प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर दाखल होतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये पंकजा मुंडे प्रीतम मुंडे सहभागी होतील त्यानंतर माध्यमांशी संवासातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल चा कमी वापर करा अशी आव्हान केल्यानंतर पंकजा मुंडे देखील यांनी देखील मुंडे प्रेमींना आवाहन केले गडावर न येता आपल्या वाड्यामध्ये आपल्या गावामध्ये मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करा
-
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरूवात…
मॉन्सून अजून केरळमध्ये दाखल झाला नाही त्यापूर्वीच मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस सुरू झाला. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-
परभणीच्या सोनपेठमध्ये कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी आक्रमक
परभणीच्या सोनपेठमध्ये कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी आक्रमक
सरकारने काढलेल्या कर्ज माफिच्या अध्यादेशात अटी शर्ती घातल्याने शेतकरी आक्रमक
गाढवाला हार टोपी घालून सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी
कर्जमाफीच्या आध्यादेशाची होळी करत केलं शेतकऱ्यांनी आंदोलन.
मॉन्सून उद्या केरळमध्ये दाखल होणार आहे. पण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला. अनेक भागात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. पुण्यातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या मुद्द्यात सुप्रिया सुळे यांनी पोलिसांवर टीका केली. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आहेत. विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमधे दाखल झालेत. विधान परिषदेत महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या व्यतिरिक्त 8 जणांनी दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने उदय सामंत यांच्या नाशिक दौऱ्याला महत्व आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.