District Bank Election Result 2026 LIVE: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत गोपीचंद पडळकर यांचा विजय
Maharashtra District Bank Election Result 2026 LIVE Updates in Marathi: सातारा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाने महायुतीला बळ दिले. गोपीचंद पडळकर, शंभुराज देसाई. संजयकाका पाटील यांनी विजयाचा झेंडा रोवला. तासगावसह काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले.

LIVE NEWS & UPDATES
-
तासगावमध्ये मोठा उलटफेर
तासगाव सोसायटीकडे सांगली जिल्ह्याचं लक्ष लागले होते. माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात थेट लढत होती. या अटीतटीच्या लढतीत संजयकाका पाटील अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. त्यांना ४० मतं पडली तर सुमनताईंना ३८ मतं पडली.
-
जनावरांच्या चाऱ्याखाली लपवला देशी दारूचा साठा ; आमदार अमोल खताळांची धडक कारवाई
संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील गिऱ्हेवाडी येथील महिलांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्यासमोर अवैध दारू विक्रीची व्यथा मांडल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घारगाव पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले…विशेष म्हणजे, जनावरांच्या कडबा चाऱ्याखाली लपवून ठेवलेला देशी दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी स्वतः आमदार अमोल खताळ आणि तक्रारदार महिला कारवाईच्या ठिकाणी उपस्थित होत्या.दरम्यान, दारू विक्री करणाऱ्या महिलेने साकूर येथील मुख्य दारू विक्रेते शंकर खेमनर यांना हप्ता द्यावा लागत असल्याचा दावा आमदारांसमोर केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.महिलांच्या तक्रारीनंतर झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीचे जाळे उघड झाले असून साकूर पठारावरील दारू विक्रीला कायमचा आळा बसला पाहिजे अशी मागणी महिलांकडून होतेय
-
-
माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे टी व्ही पाटील यांचा पराभव केला. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना 37 मते तर टी व्ही पाटील यांना 33 मते पडली. 4 मतांनी माजी मंत्री अजित घोरपडे यांचा विजय झाला. तर मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी झाले आणि भाजप आमदार सुरेश खाडे याचे समर्थक भाजपाच्या अनिल शेगुनशे यांचा पराभव केला.
-
सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल अपडेट
कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने ट्विस्ट..
सुनील माने ४४ मते (राष्ट्रवादी) आणि सुनील खत्री (भाजप) ४४ मते यांच्यात टाय..
फाटलेली १ चिठ्ठी बाजूला ठेवल्याने ट्विस्टएक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार..
………जावळी सोसायटी मतदारसंघ
१) विठ्ठल गोळे ८ मते राष्ट्रवादी
२) ज्ञानेश्वर रांजणे ३८ मते विजयी भाजप
……..
खंडाळा सोसायटी मतदारसंघ
१) अजय भोसले राष्ट्रवादी २८ मते
२) संजीव गाढवे भाजप २१ मते
३) शामराव गाढवे अपक्ष शून्य मते
……..
महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ
१) रुपाली राजपुरे राष्ट्रवादी ८ मते विजयी
२) संजय मोरे शिवसेना ४ मते
पाटण सोसायटी मतदारसंघ
१)शंभूराज देसाई शिवसेना ५८ मते विजयी
२) सत्यजीत पाटणकर भाजप ४६ मते
मान सोसायटी मतदारसंघ
१) जयकुमार गोरे भाजप ५३ मते
२) मनोज पोळ राष्ट्रवादी १४ मते
३) शेखर गोरे शिवसेना ७ मते
-
समृद्धी महामार्गावर भरदिवसा दरोडा!
समृद्धी महामार्गावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवत सरकारी कार्यकारी अभियंत्याला लुटले असल्याची माहिती समोर आली आहे. ३० हजारांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.
-
-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला आहे. कवठेमंकाळ सोसायटी गटातून त्यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे टी व्ही पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. 4 मतांनी माजी मंत्री अजित घोरपडे यांचा विजय झाला आहे.
-
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत खासदार निलेश लंके विजयी
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत खासदार निलेश लंके विजयी झाले आहेत. पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून त्यांचा विजय झाला आहे. निलेश लंके यांना 104 पैकी 63 मते मिळाली आहेत.
-
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून दिल्लीत अमित शहांची भेट
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार व्यस्त असल्यामुळे भेटीसाठी गेल्याचे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी म्हटले आहे. तसेच
अर्थखातं NCPला मिळायलाच हवं यासाठी अमित शहांची भेट घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. -
तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकतील तासगाव सोसायटी गटातून माजी खासदार संजयकाका पाटलांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत १ मताने संजय काका पाटलांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव झाला आहे.
-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत गोपीचंद पडळकर यांचा विजय
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला आहे. गोपीचंद पडळकर यांना 54 मते पडली. महाविकास आघाडीची विनोद पवार यांना 34 मते पडली. जत सोसायटी गटातून गोपीचंद पडळकर यांचा 20 मतांनी विजयी झाला आहे.
-
चंद्रपुरातून दहा वाघांना हलवण्याच्या हालचाली
चंद्रपूर येथील वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्रात (ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर-टीटीसी) वाढत चाललेल्या वन्यप्राण्यांच्या गर्दीचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर टीटीसीची क्षमता वाढविण्यात येणार असून, त्यासाठी रिलायन्स फाउंडेशन मदत करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रातील सुमारे दहा वाघांना पुण्यासह हैदराबाद आणि बडोदा येथील प्राणिसंग्रहालयांत हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
-
पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी
पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी झाले आहेत. शंभूराज देसाई यांच्या विजयानंतर मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्यांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला आहे.
-
सांगोला येथील प्रताप करचे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण
सांगोला येथील प्रताप करचे यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण. मृत करचे यांच्या कुटुंबियांच्या मागणीनंतर तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी. पोलीस अधीक्षकांनी कुटुंबीयांच्या मागणीनंतर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग केला. मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. यावेळी शकडो ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. प्रताप करचे यांची त्यांच्याच गाडीत पाठीमागे बसलेल्या मित्रांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर आरोपीना अटक करण्यात आली होती.
-
कल्याण रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना!
कल्याण रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना! परफ्युम खरेदी न केल्याने फेरीवाल्यांची तरुणी आणि तिच्या मित्राला भररस्त्यात बेदम मारहाण. तरुणीचा टी-शर्ट फाडून अश्लील शिवीगाळ, ..स्टेशन परिसरात फेरीवाल्याची दहशत ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण! महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत पुढील तपास केला सुरू
-
पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर
पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर, महापालिकेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार पाणी टंचाई संदर्भात घेणार बैठक. तर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई आढावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पार पडणार बैठक. जिल्ह्यातील टँकर संख्या, चारा उपलब्धता,प्रकल्पातील पाणी साठा त्याच बरोबर पीक नुकसान माहिती यासह आदी विषयांवर होणार चर्चा
-
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली नंतर महापिंजऱ्याचा प्रयोग सिंदेवाहीतही
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली नंतर महापिंजऱ्याचा प्रयोग सिंदेवाहीतही; वाघासाठी ९०० चौरस फुटांचा पिंजरा. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट, भेंडाळा आणि धूमनखेडा येथे अवघ्या एका आठवड्यात तिघांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता कंबर कसली आहे. वाघाला पकडण्यासाठी नेहमीच्या पिंजऱ्यांपेक्षा वेगळा प्रयोग करत तब्बल ३० बाय ३० फुटांचा भव्य ‘महा-पिंजरा’ उभारण्यात आला आहे. सुमारे ९०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या या पिंजऱ्यामुळे वनविभागाच्या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
-
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या दहा जागेंचा आज निकाल…99.27 टक्के मतदान
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या दहा जागेंचा आज निकाल…99.27 टक्के मतदान. २१ पैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध…३ हजार ८३७ मतदार, विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलविरोधात निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचा सामना… पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष… जिल्हा बँकेच्या सत्तेसोबतच राजकीय प्रतिष्ठेचीही लढाई…
-
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण वाढले
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण वाढले. मोहोळ तालुक्यातील बेगमपूरच्या 8 वर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू. डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतरही गावात दुर्गंधीवर कुठल्याही प्रकारची फवारणी नाही. डेंग्यूचे रुग्ण आढळत असूनही ग्रामीण भागातील आरोग्य विभाग सुस्त. बेगमपूर येथील दुसरीमध्ये शिकणारा इजहार असिफ पठाण या चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू. मात्र आरोग्य विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याच्या ग्रामस्थांचे मत
-
राज ठाकरे यांच्या हस्ते आज दिनदर्शिका २०२७ चे प्रकाशन
राज ठाकरे यांच्या हस्ते आज दिनदर्शिका २०२७ चे प्रकाशन. पु ल देशपांडे यांच्या दिनदर्शिकेच प्रकाशन सोहळा. राज ठाकरे राहणार उपस्थित. रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात रंगणार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा. राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
-
आज माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे लोकार्पण; उद्यापासून प्रवासी सेवा सुरू
आज माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे लोकार्पण;उद्यापासून प्रवासी सेवा सुरू. हिंजवडी मधील आयटी पार्क मधील बहुप्रतीक्षित मेट्रो अर्थात माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण होणार असून, उद्यापासून सकाळी 6 वाजता प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू होईल. 23.203 किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील 23 पैकी 17 स्थानके पहिल्या टप्प्यात प्रवाशांसाठी खुली होणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. उर्वरित सहा स्थानके टप्प्याटप्प्याने जानेवारी 2027 पर्यंत सुरू केली जाणार आहेत. या मेट्रोचा पहिला प्रवास माण ते जिल्हा न्यायालय असा असणार आहे.
-
विवाहितेचा छळ करण्याचा प्रकार
नविन दुकान टाकण्यासाठी माहेरवरून 2लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणी साठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथील घटना. विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्याने विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास करत घराबाहेर काढल्याचा विवाहितेचा आरोप. या प्रकरणी आरोपी पती सह पाच जणांविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
-
रांजणगाव गणपतीत रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
रांजणगाव गणपतीत रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रिक्षा थांबविली नसल्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, या वादाचे रूपांतर काही वेळातच तुफान हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांना मारहाण केल्याची माहिती समोर येत असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सातारा, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाने महायुतीला बळ दिले. गोपीचंद पडळकर, शंभुराज देसाई. संजयकाका पाटील यांनी विजयाचा झेंडा रोवला. तासगावसह काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत कवठेमंकाळ सोसायटी गटातून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे टी व्ही पाटील यांचा पराभव केला. मिरज सोसायटी गटातून खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे विजयी झाले आणि भाजप आमदार सुरेश खाडे याचे समर्थक भाजपाच्या अनिल शेगुनशे यांचा पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या भेटीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मनातील खदखद पुढे आली. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र, नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे नेते पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर आणि एकतर्फी निर्णयांवर पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि बॉलिवूड अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याची सायबर फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्य ठाकरे याच्या बँक खात्यातून एकदा, दोनदा नाहीतर, तब्बल सहा वेळा फसवणुकीचे व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सहा ट्रान्झॅक्शन्समधून एकूण 19 हजार 15 पैसे डेबिट झाले. 30 ऑक्टोबर रोजी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान, ऐश्वर्य ठाकरे याच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होईल.. सातारा जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठीची मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे.