Maharashtra News LIVE: दिवाळीदरम्यान ठाणे ATS ची खुप मोठी कारवाई, कुप्रसिद्ध फरार नक्षलवाद्याला अटक
Maharashtra News LIVE: राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
दुष्काळामुळे नागपूरच्या फळ मार्केटमध्ये संत्र्याची आवक ३० टक्के घटली
दुष्काळामुळे नागपूरच्या फळ मार्केटमध्ये संत्र्याची आवक ३० टक्के घटली. आवक घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत संत्र्याला ३०
ते ४० टक्के जास्त दर. चांगल्या दर्ज्याच्या संत्र्याला एक हजार रुपये प्रति शेकडा दर. तर कळमना मार्केटमध्ये चांगल्या संत्र्याला ५० हजार रुपये टन दर. दर चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. दुष्काळामुळे पाणी कमी असल्याने संत्र्याच्या दर्जावर परिणाम -
सोलापूर जिल्ह्यात ऊसदरासाठी राजू शेट्टी आंदोलन करणार
सोलापूर जिल्ह्यात ऊसदरासाठी राजू शेट्टी आंदोलन करणार.३१०० रुपयांच्या दराविरोधात राजू शेट्टी आक्रमक. रविवारी पंढरपुरात आंदोलनाची दिशा ठरणार.
-
-
दुधाच्या टँकरला लटकलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ!
पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगाव मार्गावरील खराबवाडी हद्दीत दुधाच्या टँकरच्या लोखंडी शिडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे घातपात आहे, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे दक्षिण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत तरुणाची ओळख पटविण्यासह मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.आत्महत्या की घातपात? पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे गूढ उलगडणार!
-
महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला
– भाजपचे सहा, शिंदेच्या शिवसेनेचे दोन अर्ज वैध
– ठाकरेंच्या शिवसेनेचेही दोन अर्ज छाननीत वैध
– काँग्रेस नगरसेवक सूफी जीन यांनी दिलेला अर्ज मात्र बाद
– काँग्रेसचा स्वतंत्र गट अस्तित्वात नसल्याने आयुक्तांचा निर्णय
– भाजपचे माजी नगरसेवक सुनील आडके यांच्या नावाने दाखल केला होता अर्ज
– देशात आणि राज्यात परस्परविरोधी पक्ष, नाशकात मात्र वेगळे राजकीय समीकरण?
– सूफी जीन यांनी भाजपच्या आडके यांच्यासाठी अर्ज दाखल केल्याने चर्चेला उधाण
– जीन यांच्याकडे भाजपचा अर्ज पोहोचला कसा, हा प्रश्न अनुत्तरित -
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय
धाराशिव जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी १ टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढील आवर्तनात पाणी सोडण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. घाटणे बॅरेजमार्गे रामदरा, पांगरदरवाडी आणि सिंदफळ या तीन तलावांमध्ये हे पाणी साठवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून प्रत्यक्ष पाणी आणण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात धाराशिवकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे..
-
कोल्हापूर दूध उत्पादक संघ, गोकुळमधील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गोकुळमध्ये चार शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या अध्यादेशाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. गेल्या सात दिवसांत अनेक मुद्यांवर केंद्रीय निवडणूक आयोग सातत्याने बॅकफूटवर येत असल्याचे दिसून येत आहे. ताठर भूमिका सोडत आयोगाने SIR प्रक्रियेत वगळलेल्या नागरिकांना पुन्हा संधी दिली आहे. उजनी धरण परिसरातील एआय सेंटर आणि इतर मुद्यावरून केलेल्या आंदोलनानंतर आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप तुटून पडली आहे. या आंदोलनाचे पडसाद आता उमटत आहेत.
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात मोठी खळबळ उडाली. एका मोठ्या बँकिंग संकटामुळे राजकीय उलटफेर झाले. युएनो (Ueno) या डिजिटल बँकेच्या कोसळण्यानंतर, राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांना आपले पद एका रात्रीत सोडावे लागले. उपुमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री थरार पाहायला मिळाला. शिंदेंच्या बंगल्याजवळ पोलीस एस्कॉर्ट वाहनाला आग लागल्याची घटना घडली. एस्कॉर्ट वाहनाला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामुळे पोलिसांची एकच धावाधाव झाली. हे आणि राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.