Maharashtra News LIVE : पुण्यातील नसरापूर घटनेचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टमध्ये चालणार
Maharashtra News LIVE : पर्वतीत अत्याचारला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा. 62 वर्षे व्यक्तीने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीच्या तोंडावर ओठ आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
31 मे पासून भाविकांसाठी खुले होणार भीमाशंकर मंदिर
मुख्य सभामंडपाच्या पुनर्बांधणीसह विविध सुरक्षा आणि सुविधा विकासकामांसाठी बंद ठेवण्यात आलेले भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.
भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरात गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यापक कामे हाती घेण्यात आली होती. सुरुवातीला 9 जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचे नियोजन होते; मात्र कामांच्या प्रगतीनुसार ही मुदत वाढवून 31 मे पर्यंत करण्यात आली होती.
-
ठाणेकरांना पाणी कपातीचा चटका; दुरुस्तीच्या कामामुळे टँकरसाठी लागल्या रांगा
ठाण्यात भीषण उष्णतेतच आता पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. MIDC च्या दुरुस्ती कामामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी २४ तास पाणी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे साकेतसह अनेक भागांत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. टँकरसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सोसायट्यांमध्ये पाण्याची मागणी वाढल्याने महापालिकेच्या टँकरवर नागरिक अवलंबून आहेत.
-
-
डहाणू–दिवा लोकलमध्ये मराठीला दुय्यम स्थान, गुजराती जाहिरातींचा सुळसुळाट, रेल्वे प्रवासी संतप्त
डहाणू-दिवा लोकल गाड्यांमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या लोकलच्या डब्यांमध्ये सर्वत्र गुजराती भाषेतील जाहिराती आणि फलकांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यामुळे मराठी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गाडीच्या संपूर्ण डब्यात जाहिरातींचे फलक केवळ गुजराती भाषेत आणि गुजराती नावाने लावण्यात आल्याने, ही रेल्वे महाराष्ट्रात चालते की गुजरातमध्ये, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. स्थानिक भाषेत माहिती मिळणे हा प्रवाशांचा अधिकार असताना, रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे मराठीला डावलले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
-
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील शेळगी उड्डाणपुलावर मध्यरात्री १ च्या सुमारास एका भरधाव कंटेनरने चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारमधील दोन प्रवाशांचा जागीच प्राण गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे, मात्र मृतांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
-
पुण्यातील नसरापूर घटनेचा खटला फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्टमध्ये चालणार
नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेले निघृण अत्याचार व हत्ये प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीने फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये विशेष तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली आहे.
-
-
पुण्यात वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा मृत्यू; ४३ टक्के तक्रारींकडे दुर्लक्ष
पुण्यात वर्षभरात १२० पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘माय वॉक माय राइट’ मोहिमेंतर्गत दाखल ३०२ तक्रारींपैकी ४३ टक्के तक्रारींकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप ‘परिसर’ संस्थेने केला आहे. तक्रार निवारण प्रक्रियेत मोठ्या त्रुटी असल्याचे सांगत संस्थेने आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठवून त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
-
नसरापूर घटनेनंतर पोक्सो आरोपींवर पोलिसांची करडी नजर
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पोक्सो कायद्यातील पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून, दोन किंवा अधिक गुन्हे असलेल्या ३७ आरोपींना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १९३ संशयितांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड घेतला जाणार आहे तर गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाणार आहे.
-
अशोक खरात विरोधात दोषारोपपत्र दाखल होणार
अशोक खरात विरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार. पुढील आठवड्यात एसआयटी कडून दोषारोपपत्र सादर होण्याची शक्यता. अशोक खरात विरोधातील एकूण 9 प्रकणाचा एसआयटीकडून करण्यात आलाय तपास. अटकेनंतर दोन महिन्यांत दोषारोपपत्र दाखल करण्याचा एसआयटीचा प्रयत्न. आतापर्यंत करण्यात आलेला तापस, नोंदविण्यात आलेल्या जबाबच्या आधारावर दाखल होणार दोषारोपपत्र.
-
सोलापुरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
सोलापुरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार. आरोपी नराधमाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सोलापुरातील धक्कादायक घटना समोर. सिद्धाराम सलगर असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव. नराधमाने बालकाला स्वतःच्या घरी नेऊन बालकावर अनैसर्गिक कृती केल्याचे समोर.
-
मेळघाटात नऊ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा
मेळघाटात नऊ गावांत टँकरद्वारे सहा हजार नागरिकांना होत आहे पाणीपुरवठा. समाधानकारक पावसाळा होऊनही अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ६ हजार ७६ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागविली जात आहे. मेळघाटातील ९ गावांमध्ये नैसर्गिक पाणीस्रोत आटले असून,विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. चिखलदरा तालुक्यामध्ये नऊ ठिकाणी परिस्थिती सर्वाधिक बिकट असल्याचे दिसून येत आहे.
-
पर्वती अत्याचार, पीडित मुलीच्या ओठासह छातीवर मारहाणीच्या जखमा
पर्वतीत अत्याचारला बळी पडलेल्या मुलीच्या ओठासह छातीवर मोठ्या मारहाणीच्या जखमा. 62 वर्षे व्यक्तीने नऊ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या तोंडावर, ओठ आणि छातीवर जखमा आढळून आल्या आहेत. अत्याचार करतेवेळी नराधम आजोबाने मुलीला नखे मारली असावीत अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
-
बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान, 10 हजार रुपये घ्यायचे
राहाता तालुक्यातील पिंप्रीनिर्मळ येथील बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एका डॉक्टरसह दोन एजंट ताब्यात. प्रकरणाची व्याप्ती वाढली. पिंप्री निर्मळ शिवारात एका निर्जनस्थळी असलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी टाकला होता छापा. फार्महाऊस येथे बेकायदेशीरपणे सुरू होते गर्भलिंगनिदान. अपर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि लोणी पोलिसांची संयुक्त कारवाई. गर्भलिंग निदानासाठी महिलांकडून 10 हजार रुपये घेत असल्याची माहिती.
-
लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
केज तालुक्यातील एका गावातून अकरावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. घरी कोणीही नसताना सकाळी 8 ते रात्री 7 वाजेच्या दरम्यान हे अपहरण झाले. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सागर शंकर गरडे नामक आरोपी विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठवाड्यात दिवसेंदिवस खालावत चाललेली भूजल पातळी चिंतेचा विषय ठरत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या तपासणीत मराठवाड्यातील सरासरी भूजल पातळी भूपृष्ठापासून 7.42. मीटरपर्यंत खाली गेल्याचे समोर आले आहे. विभागातील 76 पैकी 17 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट नोंदवण्यात आली असून मराठवाड्यातील 875 विहिरीद्वारे ही भूजल पातळी मोजण्यात आली आहे. जायकवाडी धरणाची क्षमता घटवणारा तब्बल 20 टीएमसी गाळ उपसण्याच्या हालचालींना वेग आला असून राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 50 वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडीतील साचलेला गाळ काढला जाणार असून यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढून छत्रपती संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्यासह मराठवाड्यातील सिंचनालाही फायदा होणार आहे. नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक तसेच या प्रकरणातील फिर्यादी भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांना देखील गुन्हे शाखेकडून अटक. काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील याला देखील करण्यात आली होती अटक.म्हाडा घोटाळाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली होती स्वतंत्र एसआयटी.