Maharashtra News LIVE : गोंदिया : राम मंदिरातील दान चोरी विरोधात काँग्रेसचे भजन दिंडी आंदोलन…
Maharashtra News LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे, तर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे... यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
राम मंदिरात चोरी प्रकरणी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले होते आणि आता ते 27 जुलै रोजी न्यायालयात हजर होतील.
-
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी चार आरोपींची तुरुंगात रवानगी
महाराष्ट्रातील डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीप्रकरणी, कल्याण न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व चार आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-
-
अंकित शर्मा हत्या प्रकरणात ताहीर हुसेन आणि इतर दोषी
दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने 2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन आणि इतरांना दोषी ठरवले.
-
अयोध्या: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली
अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. त्यांची कोठडी मूळतः आज संपणार होती. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अयोध्या जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, पोलिसांच्या विनंतीनुसार न्यायालयाने त्यांच्या कोठडीला मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. आता आरोपी रामशंकर यादव उर्फ टिन्नू आणि सुभाष श्रीवास्तव यांच्या पोलीस कोठडीबाबत उद्या सुनावणी होणार आहे.
-
लातूर : बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसला आहे, कृषी विभागाकडे आता पर्यंत 171 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे पेरणी नंतर उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. बियाणे उगवले नसल्याने आता अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. बोगस बियाणांच्या कंपन्यांवर कार्यवाही करा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
-
-
कोल्हापूर : अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
विवाहिता अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणी पतीसह चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती प्रतिकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर अशा चौघांवर हुंडाबळी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पती, सासू, सासरे या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
-
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट
वारीत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर काही वारकरी जखमी झाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथील अपघातातील जखमींची जेजुरी येथील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली.
-
कोल्हापूर : हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप
कोल्हापुरात हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सात हजार वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल- रखुमाईच्या जयघोषात मंत्री हसन मुश्रीफ तल्लीन झाले होते.
-
गोंदिया : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी विरोधात काँग्रेसचे भजन दिंडी आंदोलन…
अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या दान चोरी निषेधार्थ आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया शहरात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वराळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन दिंडी काढत आणि राम मंदिरामध्ये दर्शन घेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. या आंदोलनाची सुरुवात गोंदिया शहरातील काँग्रेस भवन येथून झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे आणि डोक्यावर गांधी टोपी परिधान करून ‘रघुपती राघव राजाराम’ आणि ‘राम कृष्ण हरी’ चे भजन म्हणत संपूर्ण शहरात दिंडी काढली.
-
राजेवाडी येथे विवाह सोहळ्यात मारहाण
जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे विवाह सोहळ्यात मारहाणीची घटना समोर आली आहे. स्वागतावेळी नाव न पुकारल्याच्या रागातून तलाठ्याने हल्ला केल्याचा आरोप. सूत्रसंचालक अशोक पठाडे यांच्या डोक्यात लोखंडी माईक मारल्याची तक्रार.
-
दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूनंतर सांगली गाव बंद
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात झाला आहे.ट्रक अपघातामध्ये सांगली जिल्ह्यातल्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 3 वारकरी जखमी झाले आहेत. दिंडीतील वारकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनेने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गावं बंद ठेवत वाहिली श्रद्धांजली.
-
मुसळधार पावसाने निवंगन येथे डोंगरावरील जमिनीला गेले तडे
पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ येथे मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने, निवंगन येथे डोंगरावरील जमिनीला गेले तडे. तडे पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. मुसळधार पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी छोट्या -मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असतानाच नीरा देवघर धरणाच्या रिंगरोड मार्गावरील निवंगन गावापासून दोनशे मीटर अंतरावर डोंगराला तडा गेल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
-
सरकोलीत दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा एल्गार
पंढरपूर तालुक्यातील सरकोली गाव दारूमुक्त करावा, या मागणीसाठी गावातील महिला आणि शेतकऱ्यांनी आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गावात वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे कुटुंबांचे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याचा आरोप करत महिलांनी दारूबंदीची आग्रही मागणी केली.
-
अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले
होर्मुझमधून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी इराणवर हल्ला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचा इराणचा दावा
-
ठाण्यात भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यात बॅनर कोसळला
ठाण्यात भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यात बॅनर कोसळला सुदैवाने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
-
शेतकरी कर्जमाफीपोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 611 कोटी अनुदान
शेतकरी कर्जमाफीपोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 611 कोटी अनुदान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
-
मध्य रेल्वेस्टेशनवर एसी ट्रेनमदील एसी 15 मिनिटे बंद
मुलुंड रेल्वे स्टेशनवर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटे बंद राहिल्याने प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला. बंद लोकलमध्ये काही महिला प्रवाशी चक्कर बेशुद्ध पडल्याची माहिती समोर
-
डिलिव्हरी बॉयचे महिलेच्या घरात घुसुन अश्लील चाळे
डिलिव्हरी बॉयचे महिलेच्या घरात घुसुन अश्लील चाळे,बंगळुरुमधील घटनेचे व्हिडिओ जोरदार व्हायरल. लघुशंका करायची म्हणत घरा शिरला आणि महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न केला.
-
दारूच्या नशेत समुद्रात उतरला
अलिबाग समुद्रकिनारी दारूच्या नशेत समुद्रात उतरलेल्या एका पर्यटकाचा जीव जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. जीवरक्षकांचे लक्ष चुकवून समुद्रात पोहण्यासाठी गेलेला पर्यटक काही वेळातच खोल पाण्यात अडकून बुडू लागला. हे लक्षात येताच जीवरक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेत शंभर ते दीडशे मीटर अंतरावर जाऊन त्याला सुखरूप किनाऱ्यावर आणले. -
जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस
जालनाच्या परतूर तालुक्यातल्या आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. इयत्ता ९ वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला ११ वीच्या ७ वरिष्ठ विद्यार्थ्यांनी गाठले. त्याला जबरदस्तीने कपडे धुवायला लावणे,मारहाण करणे आणि धक्काबुक्की केल्याची तक्रार समोर आली आहे.पीडित विद्यार्थ्याने सुरुवातीला भीतीपोटी शाळा प्रशासनाकडे कोणतीही तक्रार केली नव्हती.
-
सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरात एक हजार रुपये तर चांदीच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 46 हजार 260 रुपयांवर आले. चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 28 हजार 660 रुपये.
-
वंचितच्या सम्यक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
TET पेपरफुटी प्रकरणात वंचितच्या सम्यक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. पेपर फुटीनंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी मागील आठवड्यात केले होते आंदोलन. मंत्री भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत केले होते भुसेंच्या घराबाहेर आंदोलन. मागील आठवड्यात आंदोलन करीत मंत्री भुसे यांच्या राजीनाम्याची केली होती मागणी.
-
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पहिली बैठक
नाशिकमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पहिली बैठक. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी बोलावली तातडीची बैठक. बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पहिलीच बैठक असल्याने लक्ष.
-
जेजुरी अपघात, एका वारकऱ्याची प्रकृती गंभीर
आज जेजुरीत वारकऱ्यांचा अपघात झाला. अपघातग्रस्त वारकऱ्यांवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या जेजुरी मधील खासगी रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरू आहेत. एक जण गंभीर जखमी असून त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. जखमींची राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी भेट घेतली.
-
देवा भाऊ, शिंदे भाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड व्हायला लागला का? – रोहिणी खडसे
“काही महिन्यांपूर्वी 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं होतं. सध्या 92 लाखांपर्यंत लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींवरील खर्च हा वाढला असून खर्च 32 कोटींपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे. देवा भाऊ आणि शिंदे भाऊंना हा खर्च जड व्हायला लागला का? माझी सुनेत्रा वहिनींना विनंती आहे की तुम्ही तरी लाडक्या बहिणीच्या पाठीमागे उभे रहा,” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
-
देशात चोहोबाजूंनी रान पेटेल तेव्हा सरकार गुडघे टेकेल- उद्धव ठाकरे
“20 तारखेच्या मोर्चात सर्वांनी जावं असं म्हणत नाही. मी जाईन की नाही हे नंतर बघू. पण तुम्ही जिथे आहात तिथून तरी आंदोलन केलं पाहिजे. देशात चोहोबाजूंनी रान पेटेल तेव्हा सरकार गुडघे टेकेल. पण मला वाटलं तर मी दिल्लीत जाईन. अभिजीत दीपकेंची चळवळ कोणताही झेंडा हातात घेऊन चाललेली नाही. प्रस्थापित राजकारण्यांवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे. पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
देश जागा झाल्याशिवाय बेफिकिर सरकार काही करणार नाही- उद्धव ठाकरे
“सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके कुणासाठी लढत आहेत, आपल्यासाठीच लढत आहेत. देशातील युवकांनी याकडे लक्ष द्यावं. हा राजकारणाचा विषय नाही. देशाचा विषय आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थनार्थ काही तरी आपल्या राज्यात केलं पाहिजे. देश जागा झाल्याशिवाय बेफिकिर सरकार काही करणार नाही,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
-
देशाचं नशिब फुटतंय तिथे सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही- उद्धव ठाकरे
सध्या बोट लावू तिथे भ्रष्टाचार दिसतोय. सोनम वांगचूक यांचं दिल्लीत गेल्या 16 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून ते उषोण करत आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. देशाला त्यांच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. देशाचं नशिब फुटतंय तिथे सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
-
हिंदुत्त्वाच्या नावावर लुटीचा कार्यक्रम सुरू- उद्धव ठाकरे
हिंदुत्त्वाच्या नावावर लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. आता हिंदूंनी झोपून चालणार नाही. त्यांनी जागं झालं पाहिजे. 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन करण्यात येणार असून त्यात मी स्वत: सहभागी होणार आहे. अभिजीत दिपकेंनी उचललेला विषय हा देशाच्या भवितव्याचा असून त्यांनी तरुणांसाठी आवाज उचलला आहे, असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
जुहू चौपाटीवर समुद्राचा कचरा रस्त्यावर, नागरिक संतप्त
मुंबईच्या जुहू चौपाटीवर गेल्या काही दिवसांपासून समुद्राचा कचरा साचलेला असून आता तोच कचरा रस्त्यावर जमा होऊ लागला आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी यापूर्वीच कचऱ्याबत नाराजी व्यक्त केली होती. पण आता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. समुद्राच्या लाटांसोबत आलेला प्लास्टिक, बाटल्या आणि इतर कचरा आता थेट रस्त्यावर जमा झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, बीएमसीकडून वेळेवर स्वच्छता न केल्यामुळेच चौपाटी आणि रस्त्यांची ही अवस्था झाली आहे.
-
सोलापुरात पावसाअभावी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल
सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी केवळ 21 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी दुष्काळाचं सावट आणखी गडद होताना दिसतंय. मागील वर्षी महापुराने शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं होतं, यंदा पावसा अभावी पीक जळून जाण्याची वेळ आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पीकं जळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
-
वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार
पुण्यातील भोरहून कोकणात महाडला जाणाऱ्या वरंध घाटात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या शक्यतेने हा निर्णय घेण्यात आलय.
-
एसी लोकल अचानक बंद पडली; महिला प्रवासी बेशुद्ध
मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकावर एसी लोकल बंद पडली. त्यानंतर लोकलमधील महिला प्रवासी बेशुद्ध झाल्या. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
-
गिरीजा राऊत यांनी 4 वर्षांनंतर गुन्हा दाखल का केला? विनायक राऊत यांचा सवाल
विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांच्या आरोपावर उत्तर दिलं. त्यांनी 4 वर्षांनंतर गुन्हा दाखल का केला? तिने कोट्यवधींची मागणी केली आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले. मला कोर्टातून न्याय मिळेल, असे ते पुढे म्हणाले.
-
ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाढदिवसाचा बॅनर कोसळला
ठाण्यातील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर वाढदिवसाचा बॅनर कोसळल्याची घटना घडली. बॅनर हा खालून जाणाऱ्या वाहनावर पडणार होता. परंतु तितक्याच एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळला.
-
ठाणे – तीन हात नाका परिसरात बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला.
ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला. सुदैवाने दुचाकी वर प्रवास करणारे प्रवासी थोडक्यात बचावले आणि त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. मात्र हा असा फुटओव्हर ब्रीजवर कोणाच्या परवानगीने लावण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
मुलुंड रेल्वेस्टेशनवर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटांपासून बंद, प्रवाशांना त्रास
मुलुंड रेल्वेस्टेशनवर एसी ट्रेनमधील एसी 15 मिनिटांपासून बंद असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. अनेक प्रवाशांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याचंही सांगण्यात येत आहे. इतर प्रवाशांनी त्यांना मदत केली.
-
अमरनाथ यात्रेला बॉम्बची धमकी, मुंबईतील व्यक्तीचा नंबर समोर
अमरनाथ यात्रेला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा व्हॉट्सॲप मेसेज समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या “अमर सेतु” या व्हॉट्सॲप ग्रुपवर “मैं अमरनाथ यात्रा में बॉम्ब रखनेवाला हूँ” असा धमकीचा संदेश पोस्ट करण्यात आला. ही माहिती काश्मीर पोलीस कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाला दिली.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
आमच्या रामरक्षा आंदोलनाला फडणवीसांनी पाठिंबा दिला पाहिजे – संजय राऊत
नागपूरमधीस रामरक्षा आंदोलनासाठी आम्ही परवानगी मागितलेली नाही. ते रामाचे मालक कधीपासून झाले. उलट मी तर म्हणेन फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं, आमच्या आंदोलनाला फडणवीसांनी पाठिंबा दिला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
-
जळगावात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विद्युत डीपीला आग
जळगावात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ विद्युत डीपीला आग लागली. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
वीजपुरवठा बंद करून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं होतं.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच; भुमरे-सत्तार गटात चढाओढ. आमदार अब्दुल सत्तार यांची चिरंजीव समीर सत्तार तर खासदार भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे इच्छुक. भाजपची भूमिका ठरणार निर्णायक; मंत्री अतुल सावेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा.२० जुलैला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक; अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.
-
सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी अडचणीत
धाराशिव जिल्ह्यात ५४ तक्रारी, १२५ एकरांवर दुबार पेरणीचे संकट. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू असतानाच सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे सुरू. जिल्ह्यातील ५ लाख ५४ हजार हेक्टर खरीप क्षेत्रापैकी केवळ २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी
-
घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा
शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे
-
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड मधुन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ
वैष्णवांची वारी आज जेजुरीच्या मल्हारीच्या दारी.. संत सोपान काकांच्या सासवड नगरीतुन पालखी सोहळा मार्गस्थ… आज जेजुरी मध्ये पालखीचा मुक्काम असणार…
-
जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा मोठा अपघात
जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा मोठा अपघात झाल्याचे कळतंय. काही वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतंय.
-
नाशिक जिल्ह्यात गतवर्षी 60 यंदा फक्त 34 टक्के खरीप पेरणी
पावसाचा पुन्हा खंड पडल्याने शेतकरी संकटात. १२ जुलैपर्यंत केवळ दोनच दमदार पावसाच्या सरी. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने नाशिक जिल्ह्यात घेतली विश्रांती. ६.४० लाख हेक्टरपैकी अवघ्या २.८० लाख हेक्टरवर पेरणी
जिल्ह्यात खरीप हंगाम लांबण्याची शक्यता. सोयाबीन, मका, बाजरीसह खरीप पिकांच्या पेरणीला मोठा फटका बसण्याची शक्यता. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पेरणी. मक्याची पेरणी ५२%, सोयाबीन ३२.५०%, बाजरी २७.६३% -
सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली भारतातील ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया
राष्ट्रीय स्पर्धेत 2 पदकांची कमाई करत महाराष्ट्राची मान उंचावली. चेन्नई येथे नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्रासाठी श्रावणीने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक कमावले, तसेच या राष्ट्रीय स्पर्धेत ‘बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च बहुमान पटकावला. या दोन पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातून श्रावणीचे कौतुक होत आहे
-
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला दिंडीचे प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला जाना-या दिंडीचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झाले. संतवाड़ी येथे रेडा समाधी स्थळ असून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला होता..आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणा-या दिंड्यांपैकी पशूच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे.रेडा समाधीस्थळापासून गेल्या १८ वर्षांपासून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करते यंदा १९ वे वर्ष आहे. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे..
-
कांदिवलीतील पोईसर नदीत कचऱ्याचा ढीग, नगरसेविका मनीषा यादव आक्रमक
कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक बातमी. प्रभाग क्रमांक 31 मधील पोईसर नदीत साचलेल्या कचऱ्याचा ढीग पाहून स्थानिक नगरसेविका मनीषा यादव आक्रमक झाल्या आहेत. पोईसर नदी पूर्णपणे कचऱ्याने भरलेली पाहून मनीषा यादव यांनी बीएमसीच्या नाला सफाईच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट सांगितले की, येऊन जागेवर पाहणी करून नाल्याची परिस्थिती बघा.
-
पुणे मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले…
लोणावळा कर्जत दरम्यान बोर घाटात लोहमार्गावर कोसळलेली दरड हटवण्याचा काम अध्यापन सुरू आहे या मार्गावरील केवळ मधली मार्गिका सुरू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे उर्वरित दोन्ही मार्गिका अद्यापही बंदच आहेत.
एकाच मार्गिकेवर ताण येऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकाहून मुंबईला जाणाऱ्या पंचवीस गाड्यांचा मार्ग बदलला आहे 17 जुलैपर्यंत मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या आता दौंड मनमाड मार्गे प्रवास करणार आहेत. -
पीएमपीच्या ताफ्यात आणखी 84 नव्या ई बस, गर्दीच्या मार्गावर 200 अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन….
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताब्यात 84 नवीन दिवस दाखल होत आहेत, यामुळे गर्दीच्या मार्गावर दररोज 200 अतिरिक्त फेऱ्या वाढणार असून सुमारे 15 हजार प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
-
पुण्यातील २०४७ पर्यंतच्या लोकसंख्येनुसार जल आराखडा तयार करणार
झपाट्याने वाढणाऱ्या पुणे महानगर क्षेत्रात भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार 2017 पर्यंतचा सर्वसमावेशक जल आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे भविष्यातील सुमारे तीन कोटी लोकसंख्येसाठी 50 ते 60 अब्ज घनफूट पाण्याची गरज भासणार आहे तसेच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच सिंचनावरील ताण कमी करण्यासाठी पाण्याचे नवीन स्रोत शोधण्यावर भर दिला जाणार आहे.
-
डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत मनसे-भाजप आमनेसामने.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणावरून मनसे, भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधत, “इतकं सगळं झालं तरी तो रवी उगवला, पण आमचा रवी उगवला नाही,” असा टोला लगावला. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, डॉक्टरांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुरवस्थेसाठी चार वेळा आमदार राहिलेल्या नेतृत्वालाच जबाबदार धरत राजू पाटील यांनी सवाल उपस्थित केले.
-
32 वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवरती अत्याचार
रविवार असल्याने मुलगी खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली होती त्याच दरम्यान एका 32 वर्षे नराधमानं तिला एका गोडावनच्या पोट माळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधा शोध सुरू केली त्यावेळेस ती मुलगी तेथील गोडावनच्या पोट माळ्यावरती रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. त्यानंतर त्या नराधमाला तेथील स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या नराधमाविरोधात पॉस्को अंतरगत गुन्हा दाखल केला असून मुलीला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दाखल केले. मुलीची परिस्थिती नाजूक असल्याने तिला तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असून त्या नराधमावरती अजून काही गुन्हे आहेत का याचा पायधुनी पोलीस तपास करत आहेत.
-
मीरा भाईंदर मध्ये अयोध्या राम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरनावरून मिरा-भायंदर काँग्रेस आक्रमक
मीरा भाईंदर मध्ये अयोध्या राम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरनावरून मिरा-भायंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंदिर निधी चोरीच्या चौकशीसाठी मिरा-भायंदर काँग्रेसनें ‘सांकेतिक सत्याग्रह’ आंदोलन अय्यप्पा मंदिर, पूनम सागर रोड, मिरा रोड येथे केले. दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश राजपुरोहितआणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना देखील मागे टाकले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद गटनेते आणि काँग्रेस देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांच्यासह तीन नगरसेवक लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनर 20 फूट खोल खड्यात कोसळला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यातील पारगाव येथे जुन्या टोलनाक्यासमोर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर सरकीने भरलेला कंटेनर पलटी होऊन आपघात झाला आहे. तर पावसाबद्दल देखील मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे येथे जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे तर आणखी पुढील तीन ते चार दिवसात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट जाणून घ्या.