Maharashtra News LIVE : पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय
Maharashtra News LIVE : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीचा घेणार आढावा. मालेगाव तालुक्यातील दही, वाशिम तालुक्यातील पांडव उमरा येथे शेतशिवार पाहणी करून शेतकऱ्यांशी साधणार संवाद.

LIVE NEWS & UPDATES
-
अभिनेता इम्रान खानकडे भारत सोडून जाण्याची नोटीस
अभिनेता इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने भारत सोडून जाण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडायचे आदेश देण्यात आले आहे. कारण भारतीय नागरिक नसूनही आंदोलनात सामील झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीवर संजय राऊत काय म्हणाले?
राहुल गांधीसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याचिका दाखल केलेली, इंडिया आघाडीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आयोगाविरोधात एकूण ११ याचिका दाखल केले, आम्ही आशावादी आहोत की कोर्ट आमचे म्हणणे ऐकून घेईल, संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
-
नांदेड – कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड – कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, हिमायतनगर तालुक्यातील वटफळी येथील घटना. गळफास घेऊन संतोष मारोती वंटेवाड (44) यांनी संपविले जीवन. मुलीच्या लग्नाचा बोजा,ग्रामीण बँकेचे ,खाजगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून जीवन संपविल्याची नातेवाईकांची. घरचा कुटुंब प्रमुख गेल्याने कुटुंब अडचणीत. कुटुंबाची अत्यन्त नाजूक आर्थिक परिस्थिती. लहान भाऊ,आई, पत्नी, मुलगी आणि दोन लहान मुले मयताच्या पश्चात
-
डोंबिवलीत बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून बेदम मारहाण!
डोंबिवलीत बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून बेदम मारहाण! शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश म्हात्रे आणि मुलाचे नाव समोर; CCTV व्हिडिओ व्हायरल. डोंबिवली सागांव परिसरात टायर आणि बॅटरी विक्रेत्याला दुकानात घुसून लाठी-काठ्यांसह हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण. मारहाणीचा संपूर्ण प्रकार दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्या मुलाचे केली मारहाण. दुकानातील व्यक्तीने शिवीगाळ करत आपल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याने संतापल्याची प्रकाश म्हात्रे यांची माहिती. संबंधित व्यक्ती नशेत वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याचा म्हात्रेंचा दावा. राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे मारहाण होणे कितपत योग्य, यावर चर्चा सुरू; प्रकरणात पोलिसांची भूमिका महत्त्वाची.
-
राज्यातील शिक्षण पदवीधर निवडणूकीचा पेच सुटेना
शिवसेनेकडून पुण्याची जबाबदारी देण्यात आलेले मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ११.३० वाजता भेट घेणार असल्याची माहिती दिली. अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठींबा देण्याबाबत शिवसेनेत कुजबूज ऐकू येत आहे. एकनाथ शिंदेंकडून युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षक पदवीधर निवडणूकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा आहे.
-
-
श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा व गरुड वाहनावर छबीना मिरवणूक
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात चौथ्या माळेनिमित्त छबिना मिरवणूक भक्तिभावात पार पडली. यावेळी देवीची गरुड वाहनावर छबिना मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी अभिषेक आणि पूजाविधी झाल्यानंतर देवीची चांदीची मूर्ती छबिना वाहनावर विराजमान करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. दरम्यान आज पाचव्या माळे दिवशीपासून तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा असणार आहे
-
बेशुद्ध चिमुकलीला रुग्णवाहिकेतून उतरवल्याचे प्रकरण डॉक्टरच्या अंगलट
बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्रात बेशुद्ध अवस्थेतील 11 वर्षांच्या चिमुकलीला डिझेलचे पैसे न दिल्याने शासकीय रुग्णवाहिकेतून खाली उतरवल्याचा आणि पैसे नाहीत तर लेकरं कशाला पैदा केले असे अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. डॉ. निलेश ढाकणे यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार तात्काळ काढून घेण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथकाने दिंद्रूडमध्ये दाखल होत कुटुंबियांसह कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.आता डॉ. ढाकणेवर निलंबनाची कारवाई होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
-
सरकारच्या मदतीवर कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांची टीका
सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाच हजारांची मदत केली, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांच्या दिवाळीचा किराणाही होत नाही. फळं, भाजीपाला आणि कपडेही शेतकरी खरेदी करु शकत नाही. त्यामुळे पाच हजारांची मदत ही थट्टा आहे, शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांची मदत करावी. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचं सातव्या वेतन आयोगाचं वेतन बंद करावं, सहाव्या वेतनानुसार त्यांना वेतन द्या आणि विचारा त्यांना दिलासा आहे का? अशी टीका कृषी तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी केली.
-
इंद्रायणी तांदूळ महागण्याची शक्यता
निसर्गाचा लहरीपणा आणि एल निनो चे सावट त्याचा फटका भात शेतीला बसला असून मावळ हा इंद्रायणी भाताचा आगार आहे. पण यंदा मावळच्या याच इंद्रायणी भातावर दुष्काळाचं संकट ओढवलंय. ज्या शेतात हिरवीगार भाताची रोपं डोलायला हवी होती, तिथंच आज जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यात,पाण्याअभावी भाताची रोपं खुंटलीत तर काही ठिकाणी उभं पीक अक्षरशः करपून गेलंय. पावसाने ओढ दिल्यानं मावळच्या भातशेतीची ही दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी साडेबारा हजार हेक्टर पैकी 65 ते 70 टक्के क्षेत्रावर याचा परिणाम झालाय. त्यामुळे यंदा उत्पादनात घट होणार आहे. एरव्ही 500 ते 550 टन भाताचं उत्पादन होतं, पण यंदा केवळ 150 ते 200 टन उत्पादन होणार आहे. परिणामी प्रति किलो 20 रुपयांनी इंद्रायणी तांदूळ महागण्याची शक्यता व्यक्य करण्यात येत आहे
-
पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चलानच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ला खीळ,80 सीसीटीव्ही कॅमरे बंद
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर नजर ठेवणारी ई-चलान यंत्रणाच आता कमकुवत झाली आहे. शहरातील 249 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 80 कॅमेरे बंद आहेत. म्हणजेच प्रत्येक तीनपैकी जवळपास एक कॅमेरा निष्क्रिय आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात मर्यादा येत आहेत. बंद कॅमेऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन कॅमेरे बसविण्याची मागणी होत असताना, महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय पावले उचलली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
-
धाराशिवमध्ये भूजल पातळीत ८.८० मीटरची घट; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाच आता भूजल पातळीतही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर महिन्यात भूजल पातळी तब्बल ८.८० मीटरने खालावल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील ४१ पाणलोट क्षेत्रांमधील ११४ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. लोहारा, उमरगा, धाराशिव आणि तुळजापूर या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वाधिक खालावल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यासमोर आता भूजल पातळीतील घसरणीमुळे लवकरच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
-
मुंबईत पाणीटंचाईचे संकट
परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मुंबईत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून आतापासूनच पाणी कपात सुरू झाली आहे. बदललेल्या वातावरणाचा फटका सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांना बसत असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.पावसाअभावी दुष्काळाचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासही सुरुवात केली आहे.
-
शिवसेना शिंदे गटाच्या सोशल सैनिक महासंघटन आणि संवाद मेळावा पार पडला
शिवसेना शिंदे गटाच्या सोशल सैनिक महासंघटन आणि संवाद मेळावा पार पडला. सोशल मीडिया सेलची जिल्हा आढावा बैठक पार पडली. शिवसेनेची विचारधारा, जनहिताची भूमिका आणि पक्षाचे कार्य समाजमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या तब्बल 261 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया उपराज्यप्रमुख माननीय प्रतीक शर्मा यांच्या नेतृत्वात हा मेळावा पार पडला.
-
डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण, नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना ओळखलं
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणाची कल्याण न्यायालयात सुनावणी. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात डॉ. वैभव साळुंखे यांची साक्ष. नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम आणि साधना कारंडे यांना ओळखलं. विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या उपस्थितीत आरोपींची ओळख पटवली. डॉ. साळुंखे यांनी आपल्यासह डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण झाल्याचा घटनाक्रम सांगितला.
-
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय
पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून,या निर्णयामुळे पुणेकरांना पाणी नियोजन करावे लागणार आहे. कमी पर्जन्यमान आणि भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांची संख्या 265 वरून 305 केली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचा देखील दुष्काळग्रस्त मध्ये समावेश. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या 8 वरून 10. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचा समावेश. जुन्नर आणि आंबेगाव मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार.दोन्ही तालुक्यांना दुष्काळी निकष होणार लागू. आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. पाण्याचा वापर गरजेपुरता वापर करावा, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळावा. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून आवाहन. राज्यात फार मोठे दुष्काळाचे सावट, पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे. येणाऱ्या काळात पाण्याची अधिक तीव्रता वाढत जाणार. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा. पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून,या निर्णयामुळे पुणेकरांना पाणी नियोजन करावे लागणार आहे.