Maharashtra News LIVE : गॅस सिलिंडरची आज काय स्थिती, जाणून घ्या महाराष्ट्रातील अपडेट्स

Maharashtra News LIVE Updates : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचे परिणाम आता भारतात तीव्रतेने जाणवू लागले आहेत. घरगुती गॅसचं मुख्य संकट निर्माण झालं आहे. युद्धासह देशातील महाराष्ट्रातील अन्य महत्वाच्या राजकीय, क्रीडा, सिनेमा क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra News LIVE : गॅस सिलिंडरची आज काय स्थिती, जाणून घ्या महाराष्ट्रातील अपडेट्स
Breaking news
| Updated on: Mar 14, 2026 | 12:19 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 14 Mar 2026 12:19 PM (IST)

    आर्थिक राजधानी मुंबईतील व्यापाऱ्यांना बसतोय युद्धाचा थेट फटका

    देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील व्यापाऱ्यांना युद्धाचा थेट फटका बसू लागला आहे. एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि टीव्हीची ट्रेडिंग करणाऱ्या लहान उद्योग समूहांना याचा थेट फटका बसलेला आहे.  युद्ध सुरू असल्यामुळे बाजारामध्ये मंदीचं सावट असून व्यापारी चिंतेत आहेत.

  • 14 Mar 2026 12:04 PM (IST)

    शिर्डी – साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा

    शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा बसत आहे. साईभक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद पाकीट मिळणार.  गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.

    दिवसभरात 45 हजार लाडू पाकिटांची विक्री होते, तर दररोज दर्शनरांगेत 50 हजार बुंदी पाकीटांचे भाविकांना मोफत वितरण होत होते. मात्र गॅसटंचाईमुळे साईसंस्थानला आर्थिक फटका बसणार .

  • 14 Mar 2026 12:00 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर दौऱ्यावर

    चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रेटा एलर्जी लिमिटेड आणि न्यू इरा क्लीन टेक या 2 कंपनीचं भूमिपूजन करणार आहेत. काही वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी या प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. ग्रेटा एनर्जी प्रकल्पात कोल गॅसिफिकेशन तंत्राचा वापर करून ग्रीन स्टील तयार करण्यात येणार आहे.

  • 14 Mar 2026 11:55 AM (IST)

    मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक परिसरात नमाज पठण करणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ व्हायरल

    मुंबईतील मालाड रेल्वे स्थानक परिसरात नमाज पठण करणाऱ्या लोकांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, आज भाजप नेते किरीट सोमय्या सायंकाळी ५ वाजता मालाड पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करून कारवाईची मागणी करणार आहेत.

  • 14 Mar 2026 11:40 AM (IST)

    जळगाव मधील आर आर विद्यालयाच्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण

    जळगाव शहरातील आर आर विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून मुख्याध्यापक पदापासून वंचित असून यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाला मोठी अडचण निर्माण होत आहे, तर दुसरीकडे सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाच्या दावेदार असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक पदापासून डावलले जात असून, त्यामुळे सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाचा कार्यभार हा हस्तांतरित करावा या मागणीसाठी शाळेतील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.

  • 14 Mar 2026 11:30 AM (IST)

    नाशिकमध्ये आजपासून डोसा बंद होण्याच्या मार्गावर

    नाशिकमध्ये आजपासून डोसा बंद होण्याच्या मार्गावर आहे.  सर्वाधिक गॅस डोसा बनवण्यासाठी लागत असल्याने मेन्यू कार्डवरून डोसा गायब होणार.  खवय्यांचा सर्वात फेवरेट असलेला डोसा बंद होण्याच्या मार्गावर आहे.  गॅस तुटवड्याचा मोठा फटका शहरातील डोसा बनवणाऱ्यांना  बसला आहे. अनेकांकडे आज दिवसभर डोसा होईल एवढाच गॅस शिल्लक आहे.  साऊथ इंडियन पदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे,

  • 14 Mar 2026 11:20 AM (IST)

    बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी “दामिनी पथका”ची स्थापना

    बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी “दामिनी पथका”ची स्थापना करण्यात आली आहे.  उपनगराध्यक्षांनी दिल्या दामिनी पथकाला दोन दुचाकी दिल्या आहेत.  बदलापूर पोलीस ठाण्यात मुलांसाठी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आलाय…

  • 14 Mar 2026 11:11 AM (IST)

    मुंबईतील शिवडीत सध्या कोळसा ऊत्पादकांची डोकेदुखी वाढलीये

    मुंबईतील शिवडीत सध्या कोळसा ऊत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे.  हाॅटेलला गॅस पुरवठा बंद झाल्याने आता लाकडी कोळश्याची मागणी वाढली आहे.  रोज १० ट्रक भरून कोळसा मुंबईतील विविध भागात रवाना होतेय, केवळ १० दिवस पुरेल इतकाच कोळश्याचासाठा सध्या कोळश्याचा होलसेल व्यापारी करणार्यांकडे ऊपलब्ध आहे. जर १० दिवसांत गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे. कोळस्याच्या विक्रीत प्रत्येक किलोमागे पाच रुपयांची वाढ झालीये… जर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • 14 Mar 2026 10:50 AM (IST)

    भारत गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी रांग

    ठाण्यातील माजीवाडा येथील भारत गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी रांग लागली आहे.. गेल्या तीन ते चार दिवसापासून गॅस सिलेंडर बुक करून देखील गॅस येत नसल्यामुळे थेट एजन्सी कार्यालय गाठले आहे… गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये वाद होताना दिसत आहे…गॅस सिलेंडर वितरण होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी….एकीकडे ठाणे प्रशासन म्हणते गॅस पुरवठा सुरळीत आहे मात्र दुसरीकडे गॅस एज

  • 14 Mar 2026 10:40 AM (IST)

    नाशिकमध्ये पाच दिवस ढगाळ हवामान

    13 ते 17 मार्च पाच दिवसात तुरळक पावसाचा अंदाज. तर 15 व 16 मार्च रोजी गडगटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज. या दिवसात नाशिक शहरात राहणार ढगाळ हवामान. ढगाळ हवामानामुळे उन्हाचे तीव्रता होणार कमी. मात्र पावसाच्या शक्यतेने द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

  • 14 Mar 2026 10:30 AM (IST)

    राज्याचे एमएमआर क्षेत्रात स्वतंत्र पार्किंग धोरण

    एम एम आर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे सध्या सुमारे ११,९३१ पार्किंग लॉट्स नियोजन करण्यात आले आहे. दोन मोठे ट्रक टर्मिनस प्रस्तावित असून 70 ठिकाणी पार्किंग आरक्षण राज्य शासन लवकरच मंजुरी देणार असल्याचे सांगत …एम एम आर क्षेत्रातील स्वतंत्र पार्किंग पॉलीसी तयार करण्याच्या निर्णय शासनाने घेतलेला आहे..

  • 14 Mar 2026 10:20 AM (IST)

    ठाणे महानगरपालिका करणार नव्याने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण..

    महापालिकेकडे या सर्वेक्षणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्यामुळे हे काम ठेकेदारा मार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे… फेरीवाल्यांचे नव्याने बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी तसेच त्यांची नोंदणी ओळखपत्र आणि प्रमाणपत्र तयार करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.. 49.50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे…

  • 14 Mar 2026 10:05 AM (IST)

    ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

    शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक थेट 269 वर पोहोचला आहे. विविध विकास कामामुळे आणि धूळ, धुरांच्या व्यक्तीने शहरात वायु प्रदूषणाचे पातळी प्रचंड वाढली. ठाणे शहराचा जगातील अति प्रदूषित शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे…

  • 14 Mar 2026 09:58 AM (IST)

    LPG Shortage : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

    बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅस वापरला जात आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून 19 पथकं नियुक्त करून हॉटेलवर छापेमारी करत थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र बीड जिल्हा रुग्णालयाची कॅन्टीन चालवणाऱ्या चालकाकडून घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. या संदर्भात पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

  • 14 Mar 2026 09:51 AM (IST)

    LPG Shortage : धाराशिव मध्ये काय स्थिती?

    धाराशिव मध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गॅस साठी लोक रांगेत उभे आहेत.

  • 14 Mar 2026 09:42 AM (IST)

    LPG Shortage : फोर्ट परिसरात छोट्या दुकानदारांनी पेटवली चूल

    मुंबईतील फोर्ट परिसरात छोट्या दुकानदारांनी पेटवली चूल. फोर्ट परिसरात 90 टक्के हॉटेल्स आणि टपरी चालकांकडे गॅसचा पुरवठा बंद. अनेकांनी कोळश्याच्या शेगडीवर सुरू ठेवलाय व्यवसाय. जेवणाचे हाल झाले. गॅस नाही त्यामुळे ऊपासमारीची वेळ आली अशी दुकानदारांची प्रतिक्रिया.

  • 14 Mar 2026 09:22 AM (IST)

    LPG Shortage : ठाणे सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी काय पावलं उचललीत?

    ठाणे सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील गॅस एजन्सींवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.निरीक्षकांकडून दररोज एजन्सींना भेट देऊन सिलिंडरचा साठा आणि विक्रीची पाहणी केली आणार आहे.

  • 14 Mar 2026 09:07 AM (IST)

    LPG Shortage : मुक्ताईनगर ग्रामीण भागात काय स्थिती?

    गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांना मुक्ताईनगर ग्रामीण भागातही फटका. हॉटेलचा किराणा आणला तरीही गॅसचं भेटत नाही तर किराणा आणून काय फायदा?. इराण अमेरिका युद्धाचा थेट परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. हे युद्ध मोदी सरकारने मध्यस्थी करून थांबवावं अशी देखील मागणी हॉटेल व्यवसायिकाकडून केली जात आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असून ग्राहक देखील कमी झालेंत.

  • 14 Mar 2026 09:05 AM (IST)

    LPG Shortage : सोलापुरातील सुप्रसिद्ध सुधा हॉटेलने नोटीस बोर्डवर काय लिहिलं?

    सोलापुरातील सुप्रसिद्ध सुधा हॉटेल बाहेर नोटीस बोर्ड लावत ग्राहकांना आवाहन. ‘इडली सोबत केवळ चटणी मिळेल, सांबर संपले आहे’, अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले. सोलापुरातील हॉटेल चालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने बोर्ड लावण्याची वेळ. इडली चटणी सोबत सांबार ही आमची खासियत आहे. मात्र गॅस संपल्यामुळे आम्ही इडली चटणीसोबत सांबर देऊ शकत नाही. आमच्या ग्राहकांना इडली चटणी सोबत सांबर लागते. त्यामुळे सांबर संपले आहे असा बोर्ड लावण्याची वेळ आमच्यावर आली.

  • 14 Mar 2026 09:04 AM (IST)

    LPG Shortage : मुंबईत खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर खाऊ गल्लीत खवय्यांचे प्रचंड हाल. दुकानदारांकडे कमर्शियल गॅसचा पुरवठाच नसल्याने अखेर काल त्यांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण बनवण्याची आली वेळ. सरकार मुर्ख बनवतेय. आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीये अशी खंत दुकानदार व्यक्त करत आहेत. गॅस नाही त्यामुळे गावी जातोय अशीही प्रतिक्रिया दुकानदार देत आहेत.

  • 14 Mar 2026 09:02 AM (IST)

    LPG Shortage : जळगावात सिलेंडर तुटवड्यावर काय मार्ग शोधला?

    जळगावात गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने म्हशीच्या तसेच गायीच्या शेणापासून तयार होणाऱ्या गवऱ्यांची देखील विक्री वाढली आहे. हॉटेल व्यवसायिक व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने चुलीकडे वळले असून चूल पेटवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी शेणाच्या गवऱ्यांचा वापर केला जात आहे. अनेकांनी चुलीचा पर्याय वापरायला सुरुवात केल्याने लाकडांबरोबरच म्हशीच्या तसेच गायीच्या शेणाच्या गवऱ्यांची देखील विक्री वाढली आहे.

  • 14 Mar 2026 09:01 AM (IST)

    LPG Shortage : इगतपुरी शहरात काय स्थिती?

    इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी सुरू केले चुलीवर जेवण तर इतर हॉटेल व्यवसायिक चुली तयार करत आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी मेनू मध्ये कपात केली. मात्र चुलीवरचे जेवण परवडत नसल्याने काही दिवस हॉटेल बंद करण्याचा घेतला निर्णय. अगोदरच इगतपुरीतील हॉटेल झालीत बंद.

  • 14 Mar 2026 08:59 AM (IST)

    LPG Shortage : वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

    वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड. शिधावाटप विभागाची मोठी कारवाई. निमेश जैनवर गुन्हा दाखल. टेम्पो मालक फरार. मुंबईच्या वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा शिधावाटप विभागाने पर्दाफाश केला आहे. वरळी नाका येथील ‘सूरजी वल्लभदास चाळ’ परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

मध्य पूर्वेत इराण-इस्रायल-अमेरिकेत सुरु असलेल्या युद्धाचे आता भारतात सर्वसामान्यांना परिणाम जाणवू लागले आहेत. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केल्याने परिणामी कच्चं तेल आणि LPG ची या समुद्री मार्गावरुन होणारी वाहतूक जवळपास बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज इराणच्या ताब्यात आहे. भारतात अजून पेट्रोल-डिझेलची समस्या निर्माण झालेली नाही. पण एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गॅस वितरकाच्या ऑफिसबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. एलपीजी संपला तर काय हा लोकांसमोर प्रश्न आहे. लोक तासनतास गॅससाठी रांगते उभे आहेत. हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा तीच स्थिती आहे. काही खाद्य पदार्थ हॉटेलच्या मेन्यूमधून गायब झालेत, तर काही हॉटेल्सच बंद आहेत. एलपीजीच्या कमतरतेमुळे जी स्थिती निर्माण झालीय, त्याचे सर्व अपडेट्स आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Follow Us