Maharashtra News LIVE : पुणे : सिग्मा कंपनीच्या दोन बसला अचानक भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : मुंबईला आजही उष्णतेचा यलो अलर्ट असून, राज्यात 19 तारखेपर्यंत तीव्र उष्णतेची लाट असेल. 23 जिल्ह्यांमध्ये पारा 44°C पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. देश, विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळतील.

मुंबईत आजही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात दमट तापमान असून हवेतील आर्द्रता वाढली. तर राज्यात 19 तारखेपर्यंत उष्णतेची भीषण लाट असेल असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी, पारा 40-44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतील सायन येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पुलाच्या सांध्यांच्या (जॉइंट) दुरुस्तीचे आणि नव्या पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या पुलावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहासाठी ही दुरुस्ती आणि नवा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशोक खरातला आज व्हीसीद्वारे पुन्हा कोर्टासमोर सादर करण्यात येणार. लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार असून नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
सांगली : वाळवा तालुक्यात अवकाळी पाऊस
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून उन्हाचा चांगला तडका वाढला होता. त्यामुळे तापमान वाढले होते. तालुक्यात आज साडे चार वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
-
सांगली : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार
सरपंच पदाच्या पोटनिवडणूकी दरम्यान उमेदवारावर चक्क भानामतीचा प्रकार करण्याता आला आहे. उमेदवाराच्या फोटोवर काळी बाहुली,लिंबू, केळी,हळद-कुंकू आणि काळ कापड टाकत भानामतीचा प्रकार करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी गावामध्ये हा प्रकार समोर आला आहे.
-
-
पंढरपूर : घरकुलाच्या आमिषाने वृद्ध महिलेला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
घरकुल मंजुरीच्या आमिषाने वृद्ध महिलेला लुटणाऱ्या टोळीचा पंढरपूर तालुका पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. चोरीला गेलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त करत तिघांना अटक केली आहे.पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरी चार महिला आणि एक पुरुष अशा पाच जणांची टोळी पोहोचली. तुम्हाला घरकुल मंजूर करून देतो असे सांगत त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. यातील एका व्यक्तीने महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले, तर इतरांनी घरात प्रवेश करून कपाटातील 12 तोळे सोने, 3 लाख 78 हजारांची रोख रक्कम आणि चांदी असा तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
-
पुणे : सिग्मा कंपनीच्या दोन बसला अचानक भीषण आग
चाकण-तळेगाव महामार्गालगत असलेल्या सिग्मा कंपनीच्या उभ्या दोन बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तीन अग्निशमन दलाकडून आग आटोक्यामध्ये आणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
-
नेस्को ड्रग्स प्रकरणात ८ आरोपींना कोर्टात हजर केले
गोरेगाव नेस्को ड्रग्स प्रकरणात आठ आरोपीना कोर्टात हजर करण्यात आले आहेत. यातील एकाला काल मध्यरात्री केली पोलादपूरहुन अटक केली आहे. त्याचे नाव आयुष्य साहित्य असून पुढच्या तपासासाठी पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागणार आहेत.
-
नाशिक – त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना
नाशिकच्या व्हीआयपी दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी SIT स्थापन झाली असून ती या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. अशोक खरात, म्हाडा घोटाळा, टीसीएसनंतर आता त्र्यंबकेश्वर दर्शन प्रकरणी SIT ची स्थापना झाली आहे.त्र्यंबकेश्वर येथील दर्शन काळाबाजार प्रकरणी शासनाकडून गंभीर दखल घेतली आहे. विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोन्ही पुतणे आणि एक सहकारी या प्रकरणात अटकेत आहेत.
-
बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील एसी बंद
बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एसी बंद असल्याने रुग्णांचे उन्हाळ्याच्या उकाड्याने हाल सुरु असून प्रशासनाच्या दुर्लक्ष होत आहे. पाच दिवसांपासून वातानुकूलन यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी कोर्टात हजर
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी रझा मेमन आणि शफी शेख यांना नाशिकच्या न्यायालयात हजर केले आहे.न्यायमूर्ती आर. सी. नरवडिया यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. ही सुनावणी इन-कॅमेरा होणार आहे.या सुनावणीत काय युक्तीवाद होणार याकडे लक्ष लागले आहे.
-
मोदी मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता वाढवला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात (DA) 2% वाढीस मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने 13000 कोटी रुपयांच्या निधीसह ‘सॉव्हरिन मेरिटाइम फंड’ (Sovereign Maritime Fund) स्थापन करण्यासही मंजुरी दिली.
-
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगाचा स्फोट, अग्निवीर जवान जखमी
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) झालेल्या भूसुरुंग स्फोटात एक जवान जखमी झाला आहे. गस्त घालत असताना ही घटना घडल्याचे वृत्त आहे. जवानावर सध्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर इराणमधून निघाले
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर तीन दिवसांच्या इराण दौऱ्यानंतर शनिवारी रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांची भेट घेतली.
-
पंतप्रधान मोदी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8.30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी कोणत्या विषयांवर बोलणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मोदी महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि गेल्या दोन दिवसांत संसदेत घडलेल्या घटनांवर बोलू शकतात.
-
पश्चिम आशिया संकटावर मंत्रिगटाची बैठक दुपारी 4 वाजता होणार
पश्चिम आशियातील संकट हाताळण्यासाठी मोदी सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिगटाची (जीओएम) आज पुन्हा बैठक होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीत पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली जाईल.
-
ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस सरकारच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे निषेध आंदोलन केले आहे. काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे.
-
ट्रकच्या केबिनमधून मोबाईल चोरी करणारा आरोपी अटकेत
जालना छत्रपती संभाजी नगर महामार्गावरच्या एमआयडीसी भागात जाणाऱ्या चौकात रात्री अपरात्री रोडच्या साईडला उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमधून चालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदनझिरा पोलिसांनी या आरोपीला छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या गंगापूर येथून पाठलाग करत ताब्यात घेतलंय. शिवाय पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्याची चौकशी करत असताना 62 हजार रुपये किमतीचे एकूण तीन मोबाईल फोन जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला,
-
भाजप महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अखिलेश यादव यांच्या विरोधात दहिसरमध्ये भाजप महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इंडिया आघाडीच्या नेत्यांविरुद्ध भाजप आमदार चौधरी यांच्या जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे अखिलेश यादव यांच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केले. मुंबईतील दहिसर येथे भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी, काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी न मिळाल्याच्या निषेधार्थ, भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
राष्ट्रीय महिला आयोगाच पथक नाशिकमध्ये दाखल
TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिक शहरात बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेणार आहे. TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत. चार सदस्यीय असणार हे पथक आज प्रत्यक्ष घटनास्थळाची देखील पाहणी करणार आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकातील निवृत्त पोलीस संचालक बी के सिन्हा नाशिक मध्ये दाखल झाले आहेत.
-
महिला आरक्षणावरून आमदार मनीष चौधरी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार मनीष चौधरी यांनी दहिसर रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन सुरू केले आहे. दहिसर रेल्वे स्टेशनजवळ काँग्रेस,इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. यात आमदार मनीषा चौधरी यांचाही सहभाग आहे. नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, असे चौधरी म्हणाले.
-
निनावी पत्रामुळे बीडची बदनामी ; दोषींवर कारवाईची बीड कृती समितीकडून मागणी
काही दिवसांपूर्वी बीडमधून पाठवण्यात आलेल्या एका निनावी पत्राने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिवाला धोका असल्याचा गंभीर उल्लेख करण्यात आला होता. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असली, तरी हे पत्र नेमके कोणी पाठवले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. निनावी पत्रांची चौकशी करण्यासाठी कायद्यात ठोस तरतूद नसल्याचे बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले होते. मात्र यादरम्यान बीड जिल्ह्याची राज्यात मोठी बदनामी झाली त्यामुळे बीड कृती समिती आक्रमक झाली आहे. निनावी पत्र पाठवून बीड जिल्हा आणि प्रशासनाची बदनामी करणाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कृती समितीने केली आहे
-
विरोधकांच्या एकजुटतेने सरकाराला धक्का
विरोधकांच्या एकजुटतेने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला असा टोला खासदार प्रियंका गांधी यांनी लगावला. सत्तेत राहण्यासाठी हे सरकारचे षडयंत्र होते असा दावा त्यांनी महिला आरक्षण विधेयकावरून केले. १२ वर्षांत देशाची परिस्थिती बदलली आहे असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
-
गोंदियात कडक उन्हाचा तडाखा
गोंदियात दुपारी 12:30 ते 4 पर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद असेल. 43 अंश तापमानामुळे हा निर्णय घेतला. नागरिकांच्या मागणीनंतर सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला. भर उन्हात उभे राहण्यापासून सुटका मिळाली. वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय घेतला. उन्हाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा निर्णय घेतला. त्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.
-
बॅनर फाडल्याने एकच गोंधळ
जळगावच्या शिरसोली मध्ये महापुरुषाचे जयंतीनिमित्त लावलेले बॅनर फाडल्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला. बॅनर फाडणाऱ्याला अटक करण्यासह कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ समाज बांधवांचे 1 तास ठिय्या आंदोलन केले. आरोपीला अटक करून कारवाई करण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व समाजबांधव ग्रामस्थांनी घटनास्थळी तब्बल एक तास ठिय्या आंदोलन केलं.
-
बदनापूरमध्ये पाणीटंचाईची दाहकता
जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. जालना जिल्ह्यात सद्यस्थितीला सर्वाधिक पाणीटंचाईची दाहकता ही बदनापूर तालुक्यात पाहायला मिळत असून प्रशासनाकडून 12 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती.
-
कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग
निफाड तालुक्यातील शिवडी येथे कॅरेटच्या गोडाऊनला भीषण आग. द्राक्ष उत्पादक शेतकरी शिवाजी आव्हाड यांच्या मालकीच्या गोडाऊनला आग. आगीत 700 ते 800 प्लास्टिक कॅरेट जळून खाक झाल्याचा अंदाज. परिसरातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचे ब्लोअर चालू करून आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
-
TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य देणार भेट
TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिक शहरात बैठक घेऊन प्रकरणाची घेणार माहिती. TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य देणार भेट. चार सदस्यीय असणार हे पथक. आज प्रत्यक्ष घटनास्थळाची देखील पाहणी करणार. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक बी के सिन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक यांचा समितीत समावेश असल्याची माहिती.
-
जळगावात 44° अंशावर पोहोचलेलं तापमान 42° अंशावर
जळगावच्या तापमानात दीड ते दोन अंशांनी घट. 44° अंशावर पोहोचलेला तापमानाचा पारा 42° अंशापर्यंत घसरला. जळगाव मध्ये आज सकाळपासूनच वातावरणात बदल झाला असून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या झळा कमी झाल्या असून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.
-
मुंबई मुख्य मनपा इमारतीसमोर नो पार्किंग मध्ये नगरसेवकांच्या गाड्या …
वाहतूक पोलिसांकडून सुमारे १०० वाहनांवर कारवाई. मुंबई महानगरपालिका मुख्यालय परिसरात ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महापालिका सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून विविध समित्यांच्या बैठकींसाठी अनेक नगरसेवक खासगी वाहनातून मुख्यालयात येत आहेत.
-
1 तासाचे 500 याप्रमाणे प्रेमीयुगलांकडून काढत पैसे
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण. ज्या फ्लॅटवर आरोपी अयान तरुणींना नेऊन लैंगिक शोषण करायचा त्याच फ्लॅट वर अनेक प्रेम युगल जात असत. कठोरा नाका रोडवरील त्या फ्लॅटवर आरोपी मानव सुगंधे नावाच्या सोबत पीयूष नावाचा तरुण राहायचा. तो देखील आपले रूम पार्टनर फ्लॅटमध्ये नसताना काही युगुलांना तेथे बोलवायचा. तासाप्रमाणे पैसे आकारायचा. मात्र अन्य जणांनी त्यावर आक्षेप घेतला. पूढे पीयूषने तो फ्लॅट सोडला, मात्र, पीयूषला फ्लॅटबाबत विचारणा व्हायची. त्यावेळी चार पैसे जास्त मिळतात असे म्हणत त्याने मानवला त्यासाठी प्रवृत्त केले अशी माहिती समोर आली आहे. पीयुषच्या अन्य एका मित्राच्या साहाय्याने अयान हा मानव सुगधें याच्या संपर्कात आला मानव हा तासाला 500 रुपये घेऊन युगुलांना फ्लॅट ऐय्याशीसाठी द्यायचा..
-
ठाण्यात रस्त्यांचे वाजले तीनतेरा
ठाणे जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा आहे. पण ठाणे जिल्ह्यात काही भागात रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.
-
अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे..
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेल्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर. हाय-हॅलो नको थेट तो प्रश्न विचार.. आप वही हो ना जो वहा मिले थें..?? लव्ह गुरुच्या अयानला टिप्स आणि मुली अडकायच्या अयान अहमदच्या जाळ्यात..अशा पद्धतीने चॅटिंग करून मुलींना तो बोलायला भाग पाडायचा..अयानला टिप्स देणारा त्याचा लव्ह गुरु कोण होता असा सवाल..??
-
केज तालुक्यातील मस्साजोग येथे 9 लाखांचा गुटखा जप्त
बीडच्या केज विभागाचे ASP IPS व्यंकटराम यांनी मस्साजोग येथील चोरी प्रकरणानंतर एक विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने पहिली कारवाई मस्साजोगमध्ये केली आहे. एका व्यक्तीने शेडमध्ये ठेवलेल्या गुटख्याचा तब्बल 9 लाख रुपयांचा साठा जप्त केला असुन आरोपीला ताब्यात घेत केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक
मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वनराई पोलिसांनी नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात नवव्या आरोपीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीची अमली पदार्थांच्या प्रकरणात महत्त्वाची भूमिका आहे. ज्याचा तपास वनराई पोलीस करत आहेत. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
-
ठाण्याच्या रस्त्यावरती येत्या पंधरा दिवसात धावणार डबल डेकर बस..
ठाण्याच्या रस्त्यावरती येत्या पंधरा दिवसात डबल डेकर बस धावणार आहे. पुढील आठवड्यात डबल डेकर बसची चाचणी घेणार असून रस्त्यावरती 10 बसेस धावतील अशी माहिती परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिली.
तीन हात नाका ते थेट घोडबंदर गायमुख पहिला मार्ग तर दुसरा मार्ग शिळफाटा दत्त मंदिर ते डोंबिवली चा एन्ट्री पॉईंट आणि तिसरा मार्ग पारसिक नगर मुंब्रा वळण रस्ता ते कळवा शिवाजीनगर हा निश्चित करण्यात आला आहे .
-
अमरावती – मुख्य आरोपी अयान अमरावती मधील ज्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये मुलींना आणायचा तो कॅफे वादग्रस्त
अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरणात मोठी अपडेट. मुख्य आरोपी अयान अमरावती मधील ज्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये मुलींना आणायचा तो कॅफे वादग्रस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वीही पोलिसांनी या द कॅफे रॉयल वर धाड टाकून मुला-मुलींना ताब्यात घेतलं होतं. या भागात असलेल्या अनेक कॅफेंवर मुला मुलींचे अश्लील चाळे चालत असल्याचं समोर आलं आहे.
-
पुणे विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांची गैरसोय…
पुणे विमानतळावरील विमान वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली, अनेक प्रवासी रात्रभर पुणे विमानतळ ठिकाणी ताटकळत बसले.
रात्री साडेदहापासून विमान वाहतूक ठप्प झाल्याने आम्हाला रात्रभर विमानतळावरती काढावी लागली. अद्यापही पुणे विमानतळ प्रशासनाकडून विमान सेवा कधी सुरू होणार हे सांगण्यात येत नाही यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली.
-
चारधाम यात्रा आजपासून सुरू
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा आजपासून सुरू झाली आहे. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यमुनोत्री व गंगोत्री धामसाठी 10 बस रवाना करतील. हे यात्रेकरू 19 एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडताना उपस्थित राहतील. चारधामसाठी आतापर्यंत 18.25 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी 23 लाख भाविकांनी नोंदणी केली होती.
-
पुण्यात हवाईदलाच्या विमानाला अपघात झाल्यानं वाहतूक विस्कळीत, अनेक विमानं रद्द
पुण्यात हवाईदलाच्या विमानाचे हार्ड लँडिग झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली असून इंडिगोची येणारी 31 आणि जाणारी 34 अशी एकूण 65 विमाने रद्द झाली. तर एअर इंडियाची येणारी 3 आणि जाणारी 3 विमानं रद्द तर स्पाईस जेटचीही येणारी2 दोन आणि जाणारी 3 विमाने रद्द. एयर इंडिया एक्सप्रेसचीही 10 विमाने रद्द झाली आहेत.