Maharashtra News LIVE : राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन

Maharashtra News LIVE Updates : अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे गॅसचा टंचाई कायम आहे. त्याचा फटका अनेक छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल चालक यांना बसत आहे. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन
| Edited By: | Updated on: Mar 13, 2026 | 1:20 AM

अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे मुळे निर्यात ठप्प झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्याने भाजी फळे फुलांचा भाव घसरला असून ग्राहक नसल्याने बाजारातच शेतमाल पडून आहे, तो सडण्याची वेळ शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. नाशिकमध्ये आजपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, एआय दालन, जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन यामध्ये करण्यात आलंय. कृषी उद्योग व बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने 12 ते 16 मार्च या कालावधीत ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन पार पडेल. बुलढाणा जिल्ह्यात मुली सह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचा सत्र थांबता थांबत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेलेल्या 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली व एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Mar 2026 08:52 PM (IST)

    राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल तर असे आपोआपसात वाद करून चालणार नाहीत, असं म्हणत ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं.

    सचिन तेंडुलकर पुढे जावा म्हणून ज्याप्रमाणे त्याच्या मोठ्या भावाने (अजित तेंडुलकर) तडजोड केली. त्याप्रमाणे तुम्ही देखील आपला सहकारी पुढे जावा म्हणून तडजोड केली पाहिजे, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

  • 12 Mar 2026 08:49 PM (IST)

    पैशापेक्षा पक्षाचा स्वाभिमान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपा : राज ठाकरे

    पैशापेक्षा पक्षाचा स्वाभिमान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपा, असं मनसेप्रमुख राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी संवाद मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना हा सल्ला दिला आहे. तसेच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपापसातले वाद मिटवण्याच्या‌ सूचनाही दिल्या आहेत.

  • 12 Mar 2026 08:39 PM (IST)

    बीडमध्ये ऊसतोड मजुराला तिघांकडून मारहाण, कारण काय?

    बीडमध्ये ऊसतोड मजुराला तिघांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी शिवारात ऊसाच्या व्हाड्याला कांडी का ठेवलीस? अशी विचारणा करत तिघांनी ऊसतोड मजुराला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 12 Mar 2026 08:25 PM (IST)

    यवतमाळ उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत मोठा निर्णय

    यवतमाळ उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरवण्या येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तापमान 39 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 16 मार्चपासून करण्यात येणार आहे.

  • 12 Mar 2026 07:53 PM (IST)

    जेकेसीए घोटाळा प्रकरण: फारुख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

    श्रीनगर न्यायालयाने जेकेसीए घोटाळा प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

  • 12 Mar 2026 07:34 PM (IST)

    इराणमध्ये अजूनही 9000 भारतीय आहेत: परराष्ट्र मंत्रालय

    ऊर्जा संकटाच्या काळात, परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, गेल्या काही दिवसांत भारतीय परराष्ट्र मंत्री आणि इराणी परराष्ट्र मंत्री यांच्यात तीन वेळा चर्चा झाली आहे. नौकानयन सुरक्षा आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर चर्चा झाली. अधिक भाष्य करणे अकाली ठरेल. नऊ हजार भारतीय अजूनही इराणमध्ये आहेत. त्यापैकी बहुतेक जण शिक्षणासाठी तिथे आहेत.

  • 12 Mar 2026 07:19 PM (IST)

    आजपासून व्यावसायिक गॅस पुरवठा सुरू, हरदीप पुरी यांनी लोकसभेत सांगितले

    केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत सांगितले की, आजपासून व्यावसायिक गॅस पुरवठा पुन्हा सुरू होईल. देशात एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुरी म्हणाले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 20 टक्के वाहतूक प्रभावित झाली आहे.

  • 12 Mar 2026 07:06 PM (IST)

    होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील, आम्ही प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ: मुज्तबा खामेनी

    मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी सांगितले की होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील आणि प्रत्येक मृत्यूचा बदला घेतला जाईल.

  • 12 Mar 2026 05:57 PM (IST)

    विदर्भात पावसाचा इशारा

    हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा इशारा

    अनेक जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा तडाखा

    शेतकऱ्यांची चिंता वाढली

    पावसासोबतच उष्णतेमध्ये देखील वाढ

  • 12 Mar 2026 05:55 PM (IST)

    ठाण्यात काँग्रेसचे गॅस सिलिंडर आंदोलन

    ठाण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात गॅस सिलिंडर तुटवडा आणि दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

  • 12 Mar 2026 05:26 PM (IST)

    बदलापुरातील महानगर गॅसविरोधात धडक मोर्चा

    बदलापुरातील महानगर गॅसविरोधात धडक मोर्चा

    वाढीव बिलांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब

    बिलं दुरूस्त करा, अन्यथा काळं फासू

    अविनाश देशमुख यांचा थेट इशारा

  • 12 Mar 2026 05:24 PM (IST)

    जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक घेतला पेट

    जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक घेतला पेट

    वेळीच घटना लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला, चालक सुरक्षित

    न्यायालयाच्या आवारातील नागरिकांनी मिळवलं आगीवर नियंत्रण

    अपघातातून  चालक थोडक्यात बचावला

     

     

  • 12 Mar 2026 04:57 PM (IST)

    गॅस सिलेंडरच्या टंचाईने इंडक्शन शेगडीच्या मागणीत वाढ

    आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरची टंचाई वाढल्याने इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक शेगडी विकत घेत आहेत. इलेक्ट्रीक शेगडी ( इंडक्शन चुला ) आधी दिवसाला एक किंवा दोन विकल्या जायच्या, त्या आता दिवसाला 25 ते 30 विकल्या जात असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

     

  • 12 Mar 2026 04:48 PM (IST)

    करमाळा पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड

     

    करमाळा पंचायत समिती सभापती पदासाठी भाजपच्या पूजा ढेरे तर उपसभापती पदी राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजित पवार गटाचे ) अजित विघ्ने यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेस ( अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

  • 12 Mar 2026 04:35 PM (IST)

    मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता

    १४ ते १५ मार्च दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवेतील बदलामुळे तापमानामध्ये वाढ झाली आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात १३ मार्च ते १४ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तसेच ढगाळ वातावरण राहील त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.

  • 12 Mar 2026 04:11 PM (IST)

    घरगुती वापराच्या सिलिंडरचा साठा मुबलक, ग्राहकांनी पॅनिक होऊ नये

    इगतपुरीत घरगुती वापराच्या सिलिंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. ग्राहकांनी त्यामुळे घाबरुन गर्दी करु नये. दोन दिवस सर्व्हर डाऊन असल्याने बुकिंगला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे सिलेंडर भेटण्यास उशीर होत होता. अगोदर 24 तासांत सिलिंडर भेटत होते मात्र आता 72 तासात घरपोच मिळेल असेही प्रशासनाने म्हटले आहे.

  • 12 Mar 2026 03:58 PM (IST)

    सांगलीत गॅस दरवाढीबाबत काँग्रेसचे सरकारच्या विरोधात आंदोलन

    गॅस दरवाढी बाबत सांगलीत गांधी पुतळ्या येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात निदर्शन करित घोषणाबाजी करण्यात आली. गली गली मे शोर है”भाजप सरकार चोर हे” या सरकारच करायचं काय खाली टोके वर पाय.अशा घोषणाबाजी देत परिसर दनानून सोडला. यावेळी बॅनर बाजी करत चूल मांडण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्ते आणि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • 12 Mar 2026 03:40 PM (IST)

    PMPMLच्या व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरेंची अखेर बदली

    PMPMLच्या व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरेंची अखेर बदली… PMPMLच्या भरतीत काही कोटींचा घोटाळा झाल्याचा देवरेंवर आरोप….महेश आव्हाड यांच्याकडे व्यवस्थापकिय संचालक पदाची जबाबदारी…

  • 12 Mar 2026 03:30 PM (IST)

    इराणचं नौदल आणि वायूदल उद्ध्वस्त केलं

    इराणचं नौदल आणि वायूदल उद्ध्वस्त केलं…. इराणचे जास्तीत जास्त माईनिंग शिप उद्ध्वस्त केले… पण याहूनही अधिक कडक कारवाई होऊ शकते… डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा…

  • 12 Mar 2026 03:20 PM (IST)

    इराकमधील बसरा बंदराजवळ दोन अमेरिकन तेल टँकरवर हल्ला

    इराकमधील बसरा बंदराजवळ दोन अमेरिकन तेल टँकरवर हल्ला… हल्ल्यानंतर दोन्ही टँकर्सना भीषण आग… इराकी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी टँकरमधील 25 जणांना वाचवलं…. तेल टँकर अमेरिकन कंपनी STS च्या मालकीचं

  • 12 Mar 2026 03:10 PM (IST)

    पर्शियन गल्फमध्ये इराणचा तेल टँकर जहाजावर हल्ला

    पर्शियन गल्फमध्ये इराणचा तेल टँकर जहाजावर हल्ला… इराणच्या हल्ल्यानंतर तेल टँकरला आग… अद्याप कोणत्य़ाही जीवितहानीची माहिती नाही…

  • 12 Mar 2026 03:00 PM (IST)

    सांगलीच्या मिरजेमध्ये गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा

    सांगलीच्या मिरजमध्ये घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पहाव्यास मिळत आहे. पूर्वी पंधरा दिवसातून मिळणारे घरगुती गॅस सिलिंडर आता 25 दिवसानंतर मिळत आहे. आखाती देशातील युद्ध आणखीन किती दिवस चालेल याची शाश्वती नाही. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळते. सांगलीच्या मिरज मध्ये घरगुती गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

  • 12 Mar 2026 02:50 PM (IST)

    युद्धजन्य परिस्थितीमुळे कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत

    इराक, इराणला जाणारा धाराशिव मधील कलिंगड शेतामध्ये पडून आहेत. लोकल मार्केटमध्ये कलिंगडची आवक वाढली. शेतात व्यापारी फिरकत नसल्याने शेतकरी स्वतःच कलिंगडची विक्री करत आहेत

  • 12 Mar 2026 02:40 PM (IST)

    कांदिवलीमध्ये गॅससाठी लोकांची लांब रांग

    कांदिवलीमध्ये गॅससाठी लोकांची लांब रांग आहे. कांदिवली महावीर नगर आणि चारकोप इंडस्ट्रियल इस्टेट येथे लोक गॅस सिलिंडर घेऊन पोहोचले आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने लोक संतप्त आहेत.

  • 12 Mar 2026 02:32 PM (IST)

    गोंदियात गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

    गोंदिया शहर काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेसच्या संयुक्त तत्वावधानात वाढत्या गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ गोंदिया येथे आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलेंडर घेऊन केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तात्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • 12 Mar 2026 02:23 PM (IST)

    सिलेंडर दरवाढीविरोधात कल्याण मध्ये काँग्रेसचा अनोखे आंदोलन

    डोक्यावर सिलेंडर उचलत तहसीलदार कार्यालयाबाहेर चूल पेटवून भाकरी थापत सरकारविरोधात घोषणाबाजी करत अनोखा निषेध केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरवाढ कमी न झाल्यास पुढे चक्काजाम आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला.

  • 12 Mar 2026 02:12 PM (IST)

    नाना पटोले राहुल गांधींच्या ट्वीटचा टी शर्ट घालून विधान भवनात

    आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधींच्या ट्वीटचा टी-शर्ट घालून विधान भवनात आलोय. या टी-शर्ट वरती राहुल गांधी यांचा मोदी आणि एपिस्टन फाईलशी संबंधित असलेला उल्लेख करणारा ट्विट आहे. सरकार आपल्या स्थरावर नापास झालंय. जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. गॅस सिलेंडरसाठी वणवण सुरू आहे. विधान सभेत आत आणि बाहेर सरकारला जाब विचारणार असे ते नाना पटोले म्हणाले.

  • 12 Mar 2026 02:00 PM (IST)

    पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

    अहिल्यानगरमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत पोलिस बंदोबस्तात गॅस वाटप सुरू आहे. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली आहे. गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने अनुचित प्रकार टाकण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.

  • 12 Mar 2026 01:58 PM (IST)

    राहुल गांधी काय म्हणाले?

    “देशात इंधन, तेलाची समस्या आणखी वाढू शकते. सरकारने तयारी केली नाही, तर लोकांचं मोठं नुकसान होईल. तेल साठ्यासंदर्भात सरकारने आत्ताच तयारी करायला हवी” असं राहुल गांधी म्हणाले.

  • 12 Mar 2026 01:57 PM (IST)

    कामठीच्या ड्रॅगन पॅलेस रोड वर रस्ता जाम

    नागपूर जिल्ह्यातील कामठीच्या ड्रॅगन पॅलेस रोड वर रस्ता जाम करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी कामठी मध्ये एकाची हत्या झाली होती. त्यातील दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचा विरोध करण्यासाठी रस्ता जाम करण्यात आला. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. मात्र आरोपी वर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रस्ता जाम करण्यात आला. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रस्ता क्लिअर करत आहेत.

  • 12 Mar 2026 01:50 PM (IST)

    विधानभवनाला आलेला धमकीचा मेल बोगस

    विधानभवनाला आलेला धमकीचा मेल बोगस एकनाथ शिंदे यांची माहिती. मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • 12 Mar 2026 01:42 PM (IST)

    हिंगोलीत व्यवसायिकांना गॅस वितरण बंद

    हिंगोलीत व्यवसायिकांना गॅस वितरण बंद. आज जिल्ह्यात घरगूती गॅसची 2 हजार 430 सिलेंडरची मागणी. घरगुती गॅसची कुठली टंचाई नाही. हॉस्पिटल,हॉस्टेल ,इमर्जन्सी कमर्शियल साठा सुरळीत पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची माहिती.

  • 12 Mar 2026 01:27 PM (IST)

    हॉटेलवर धडक तपासणी मोहीम

    युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने आज सर्व हॉटेलवर धडक तपासणी मोहीम राबवली. घरगुती वापराचे सिलेंडर हॉटेलसाठी वापरू नयेत, कमर्शियल सिलेंडरचा वापर व्हावा यासाठी थेट किचनमध्ये जाऊन पथकाने तपासणी केली.

  • 12 Mar 2026 01:12 PM (IST)

    सिलेंडर दरवाढीविरोधात कल्याणमध्ये काँग्रेसचं अनोखं आंदोलन

    डोक्यावर सिलेंडर उचलत तहसीलदार कार्यालयाबाहेर चूल पेटवून भाकरी थापत सरकारविरोधात घोषणाबाजी करत केला अनोखा निषेध. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की गोंधळ. वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरवाढ कमी न झाल्यास पुढे चक्काजाम आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा.

  • 12 Mar 2026 01:06 PM (IST)

    पोलिस बंदोबस्तात गॅस वाटप

    गॅस सिलिंडरसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी. लांबच लांब रांगा, पोलिस बंदोबस्तात गॅस वाटप. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी. गॅस वितरक आणि ग्राहकांमध्ये शाब्दिक चकमक. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची मदत. पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण.

  • 12 Mar 2026 12:58 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 285 रुपयांवर पोहोचलं असून चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 10 रुपयांवर आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे तेलामध्ये गुंतवणूक वाढल्याने परिणामी सोने चांदीचे दर घसरल्याचं सराफ व्यावसायिक  म्हणत आहे.

  • 12 Mar 2026 12:50 PM (IST)

    चाळीसगावात बजाज गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी; ओटीपी न मिळाल्याने गॅस बुकिंगमध्ये अडथळे

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घरगुती एलपीजी गॅस वितरणाबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील बजाज गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर आज सकाळपासून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. एजन्सीकडे गॅसचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग करता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गॅस बुकिंग करताना ओटीपी मिळत नसल्याची समस्या अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. तसेच अनेक ग्राहकांचे केवायसी पूर्ण नसल्यामुळे त्यांना पुन्हा कागदपत्रांची प्रक्रिया करावी लागत असून यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • 12 Mar 2026 12:40 PM (IST)

    आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचा परिणाम शिवभोजन केंद्र चालकांना

    आखाती देशामधील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह शिव भोजन केंद्र चालकही चांगलेच संकटात सापडले आहेत. जालन्यातील शिव भोजन केंद्रावर आजच पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याने उद्यापासून चुलीवर स्वयंपाक करून केंद्र चालवण्याची नामुष्की ओढवते की काय असंच चित्र आहे. गॅस साठा शिल्लक नसल्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांनी आज शिवभोजन थाळीत असलेला वरण हा पदार्थ केलाच नाही. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सर्व शिवभजन केंद्र चालकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर वेळेवर मिळावं असं पत्र देऊन देखील शिव भोजन केंद्र चालकांना गॅस पुरवठा होत नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

  • 12 Mar 2026 12:28 PM (IST)

    सांगली – गॅस दरवाढीबाबत काँग्रेसचं सरकारच्या विरोधात आंदोलन

    गॅस दरवाढीबाबत सांगलीत गांधी पुतळा इथं काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपच्या विरोधात निदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आली. “गली गली मे शोर है भाजप सरकार चोर हे”, “या सरकारचं करायचं काय, खाली डोके वर पाय”, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत प्रतिकात्मक चूल पेटवली.

  • 12 Mar 2026 12:18 PM (IST)

    नियमांपेक्षा कोणीच मोठं नाही- ओम बिर्ला

    नियमांपेक्षा कोणीच मोठं नाही. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. सदनाची मर्यादा पाळण्यासाठी कठोर निर्णय घेतले. विरोधकांनीही नियम पाळले पाहिजेत, असं वक्तव्य लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे.

  • 12 Mar 2026 12:05 PM (IST)

    ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

    ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी  त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. “विरोधी पक्षाने नियमानुसार बोललं पाहिजे. पंतप्रधान मोदीसुद्धा नियमानुसार बोलतात. सदनात विरोधकांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला”, असं ते म्हणाले.

  • 12 Mar 2026 11:55 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा गेल्या चार दिवसांपासून ठप्प

    नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा गेल्या चार दिवसांपासून ठप्प झाला आहे. गॅस कंपन्यांकडून पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. लग्नसमारंभासाठी नेमलेल्या केटरिंग व्यावसायिकांनाही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. यामुळे आगामी लग्नकार्यांच्या तयारीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था करणेही कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावाचा अप्रत्यक्ष परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याची चर्चा आहे. गॅसचा पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी हॉटेल व केटरिंग व्यावसायिकांकडून केली जात आहे.

  • 12 Mar 2026 11:40 AM (IST)

    अमरावती मध्ये पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचे वितरण….

    गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात होत असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत आहे. सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकांची गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहे, सिलेंडर साठी आता मोठ्या प्रमाणात झुंबड उडत असल्याने गॅस एजन्सी चालकांना पोलिसांचा सहारा घ्यावा लागत आहे. अमरावतीच्या अंबादेवी रोडवरील देशमुख गॅस एजन्सी मध्ये चार ते पाच पोलिसांच्या बंदोबस्तात गॅस सिलेंडरचा वितरण सुरू आहे.

  • 12 Mar 2026 11:30 AM (IST)

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

    नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या सह अन्यनेते  उपस्थित राहणार आहेत.  लोकप्रतिनिधी कार्यशाळेमध्ये लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेचे त्र्यंबकेश्वर मध्ये आयोजन करण्यात आलं आहे.

  • 12 Mar 2026 11:20 AM (IST)

    गोंदिया : लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात

    गोंदिया : लग्न लावून परत येत असलेला वराती बसला अपघात झाला आहे. सगळे वराती बसमध्ये साखर झोपेत असताना  अपघात झाला. अपघातात एकाच्या मृत्यू तर 9 लोक गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तर चालक बस सोडून पसार झालाय..

  • 12 Mar 2026 11:03 AM (IST)

    अमरावती मध्ये भारत गॅस कंपनी कडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना….

    अमरावतीमध्ये भारत गॅस कंपनी कडून घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.  मात्र व्हाट्सअप वर बुकिंग करणे किचकट असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सिलेंडरसाठी ग्राहक एजन्सीमध्ये  पोहचले आहेत.

  • 12 Mar 2026 10:56 AM (IST)

    नाशिकमध्ये गॅस टंचाईचे तीव्र पडसाद; छोटे हॉटेल बंद होण्याच्या मार्गांवर

    नाशिकमधील छोट्या हॉटेल व्यावसायिकांवर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, अनेकांकडे केवळ ४ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. नवीन सिलेंडरसाठी प्रचंड वेटिंग असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले असून, नातेवाईक आणि मित्रांकडून सिलेंडरची जुळवाजुळव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. गॅसअभावी व्यवसाय कसा चालवायचा, या संभ्रमात असलेल्या या छोट्या व्यावसायिकांनी शासनाकडे गॅस पुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा शेकडो कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • 12 Mar 2026 10:46 AM (IST)

    सोलापुरातील हॉटेल व्यवसायावर गॅस टंचाईचे सावट; केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक

    सोलापूरमधील अनेक सुप्रसिद्ध हॉटेल्सकडे व्यावसायिक गॅसचा केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक असल्याने हॉटेल मालकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसअभावी आता चूल पेटवून स्वयंपाक करण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. यामुळे व्यवसायावर आणि पर्यायाने रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. हॉटेल बंद झाल्यास कामगारांच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत हॉटेल व्यावसायिकांनी सरकारला विनंती केली आहे की, व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णपणे बंद न करता, दररोज किमान २ ते ३ सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून बेरोजगारीचे संकट टळेल.

  • 12 Mar 2026 10:36 AM (IST)

    गॅस टंचाईचा मोठा फटका, ठाण्यातील प्रसिद्ध शिवम हॉटेल बंद

    ठाणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या कोपरी परिसरातील प्रसिद्ध ‘शिवम हॉटेल’ गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे पूर्णतः बंद करण्यात आले आहे. गॅसअभावी हॉटेलमधील चहा, पोहे आणि नियमित जेवण बनवणे अशक्य झाल्याने ग्राहकांना केवळ इलेक्ट्रिक शेगडीवर तयार होणारे सँडविच आणि पिझ्झा यांसारख्या पदार्थांवर समाधान मानावे लागत आहे. हॉटेलचे कामकाज ठप्प झाल्याने येथील कामगारांनी आता आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 12 Mar 2026 10:26 AM (IST)

    उदय सामंत यांची अंबरनाथ MIDC मधील केमिकल कंपनीत मध्यरात्री धाड; अधिकाऱ्यांची धरपकड

    आंबरनाथ MIDC मधील ज्या केमिकल कंपनीत दोन दिवसांपूर्वी भीषण स्फोट झाला होता, त्या कंपनीला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रात्री एक वाजता अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांना घटनेबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे समोर आल्याने सामंत यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. या पार्श्वभूमीवर, त्यांनी सर्व केमिकल कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ आणि ‘फायर ऑडिट’ झाले आहेत की नाही, याची कसून तपासणी करण्याचे कडक आदेश दिले आहेत. ज्या कंपन्यांचे ऑडिट प्रलंबित असेल, त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  • 12 Mar 2026 10:16 AM (IST)

    जळगावात १५ दिवस पुरेल इतका घरगुती गॅस साठा उपलब्ध

    जळगाव जिल्ह्यातील घरगुती गॅस पुरवठ्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांकडे जिल्ह्यात पुढील १५ दिवस पुरेल इतका घरगुती गॅस सिलेंडर्सचा साठा उपलब्ध आहे. मात्र, दुसरीकडे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तूर्तास थांबवण्यात आले असून, त्यावर योग्य ती कार्यवाही प्रलंबित आहे. गॅसचा काळाबाजार आणि जादा दराने होणारी विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कडक कारवाई केली जात आहे.

  • 12 Mar 2026 10:06 AM (IST)

    अमरावती मनपाचा दणका, १ लाखावरील थकबाकीदारांच्या ९६७ मालमत्ता रडारवर; ४ मालमत्ता सील

    अमरावती शहरात मालमत्ता कराची तब्बल ८४ कोटी रुपयांची थकबाकी साचल्याने महानगरपालिका आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या कडक आदेशानंतर वसुली मोहिमेला वेग आला असून, १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर प्रलंबित असलेल्या ९६७ मालमत्ता प्रशासनाच्या रडारवर आहेत. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने गुरुवारी मोठी कारवाई करत हॉटेल, दुग्धसंस्था आणि कमर्शियल हॉलसह ४ मालमत्ता सील केल्या आहेत. यामध्ये ७ लाख रुपयांचा कर थकीत असलेल्या हॉटेल लॉर्डवर करण्यात आलेल्या कारवाईने मोठ्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या इतर मालमत्तांवरही आता जप्तीची टांगती तलवार असल्याने मालमत्ता धारकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • 12 Mar 2026 09:50 AM (IST)

    गॅस तुटवड्याचा परिणाम! युद्धाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक शेगड्यांची अचानक वाढली मागणी

    अमेरिका–इस्रायल–इराण युद्धमुळे गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणामगॅस मिळत नसल्याने गृहिणींचा इलेक्ट्रिक शेगड्यांकडे वाढता कल. कल्याण डोंबिवली परिसरात दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी गर्दी

  • 12 Mar 2026 09:40 AM (IST)

    विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती

    मेट्रोचे महासंचालक श्रावण हर्डीकर हे होते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सध्या प्रभारी आयुक्त. मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिकेला विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून पूर्णवेळ आयुक्त मिळाला

  • 12 Mar 2026 09:30 AM (IST)

    त्या तीन वर्षातील प्रस्ताव ठाणे महापालिका महासभेत मांडणार

    ठाणे महापालिकेचे १८ मार्चला होणाऱ्या दुसऱ्या महासभेत मागील तीन वर्षातील कामांचे प्रस्ताव स्थायी समिती गठित न झाल्याने अवलोकनार्थ ठेवण्यात आले आहेत. त्यात तब्बल 171 विषयांचे समावेश असल्याची माहिती समोर आली आहे..मागे महासभेत गदारोळ झाला होता दहा मिनिटांमध्ये पटवारी सर्वच विषय मंजूर करण्यात आले होते..

     

  • 12 Mar 2026 09:20 AM (IST)

    ईमेल करून विधानभवनाला उडवण्याची धमकी

    अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच थेट विधानभवनाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ईमेल करून ही धमकी देण्यात आली.

  • 12 Mar 2026 09:06 AM (IST)

    पोलिसांकडून विधानभवनात सर्च ऑपरेशन सुरू

    सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

  • 12 Mar 2026 09:01 AM (IST)

    विधान भवन बॉम्बने उडवण्याची धमकी

    विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू  असून याच काळात अशी धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी नेमकी कोणी, का दिली, याचा तपास केला जात आहे.

  • 12 Mar 2026 08:45 AM (IST)

    वसई – एलपीजी गॅस तुटवड्या बाबत हॉटेल व्यवसायिकांनी घेतली तहसीलदारांची भेट

    वसई विरारमधील एलपीजी गॅस तुटवड्याबाबत हॉटेल व्यवसायिकांनी तहसीलदारांची भेट घेतली.  अमेरिका इराण युद्धाचा फटका वसई विरार मधील एलपीजी गॅस वितारणावर बसला असून, एलपीजी गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक चिंतेत आहेत.

    वसईचे तहसीलदार दीपक गायकवाड यांनी गॅस वितारकांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी मार्फत तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं. वसई तालुक्यातील सर्व हॉटेल व्यवसायिकांची आज दुपारी पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांच्यासमोर बैठक होणार आहे.

  • 12 Mar 2026 08:33 AM (IST)

    गॅस सिलेंडरचा काळाबाजार कराल तर खबरदार – ठाण्यात प्रशासनाचा इशारा

    गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनिक कडक पावले उचलले आहेत.  जिल्ह्यातील गॅस एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी शिधावाटप विभागाकडून 72निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून दोषींवर तुरुंगवासाची कारवाई होऊ शकते.

  • 12 Mar 2026 08:26 AM (IST)

    धाराशिव मध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला, पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर

    धाराशिव मध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला, घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पुरवठा विभागाकडून निरीक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत.

    धाराशिव जिल्ह्यात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. धाराशिव मधील 200 हॉटेल्सचा व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण मात्र नियमित सुरू ठेवण्यात आले आहे.

  • 12 Mar 2026 08:25 AM (IST)

    चाकण औद्योगिक वसाहतीत उमटले युद्धाचे पडसाद

    आशिया खंडातील सर्वात मोठे ऑटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीत युद्धाचे पडसाद उमटत आहेत.या औद्योगिक वसाहती मधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्याने सुमारे 30 टक्के कंपन्याचे कामकाज ठप्प झाले आहे.  तर ऑनलाईन गॅस असल्याने  उर्वरित 70 टक्के कंपन्याचे सध्या तरी कामकाज सुरळीत सुरू आहे

  • 12 Mar 2026 08:16 AM (IST)

    सोलापूर – छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात

    सोलापुरात छोटे हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल बंद ठेवायला सुरुवात झाली आहे. गॅस अभावी सोलापुरातील छोट्या व्यावसायिकांनी हॉटेल बंद केलं आहे. अनेक हॉटेल्समध्ये फक्त एक ते दोन दिवसांचा गॅस शिल्लक राहिला आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

    दोन दिवसांनी गॅस संपल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न भेडसावत आहे असे सांगत सरकारने याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती व्यावसायिकांनी केली आहे.

Follow Us