17 हजार 471 जागांची भरती, पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टरही उमेदवार, मग अभियंते, वकील, एमबीए पदवीधर का नाही बनणार पोलीस

Maharashtra Police Bharti 2024: अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 जणांचे अर्ज आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

17 हजार 471 जागांची भरती, पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टरही उमेदवार, मग अभियंते, वकील, एमबीए पदवीधर का नाही बनणार पोलीस
पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर यांचे अर्ज
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:57 AM

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17 हजार 471 पदांसाठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया 5 मार्चपासून सुरु झाली होती. 15 एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले. मग या भरतीसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांचे अर्ज आले आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. परंतु त्यात डॉक्टरही आहेत. इंजिनिअर अन् एमबीए म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतलेले आहेत. वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांनाही सरकारी नोकरी हवी आहे. उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पोलीस भरतीसाठी अर्जांची संख्या आणि उच्च शिक्षित उमेदवार पाहिल्यावर बेरोजगारीचे वास्तव्य समोर येत आहे.

उच्चशिक्षितांचे अर्ज का

राज्यातील पोलीस दलात जेल वॉर्डन, सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी 29 फेब्रुवारी 2024 रोजी जाहिरात काढण्यात आली. पोलीस भरतीसाठी बारावी उतीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. 15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. या अर्जांची छननी झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्याला सरकारी नोकरीचे आकर्षण हे कारण असले तरी बेरोजगारीही कारण आहे.

अशी होणार प्रक्रिया

राज्यात 36 हून अधिक जिल्हा पोलिस तुकड्या पसरल्या आहे. देशातील सर्वात मोठ्या पोलिस दलांपैकी एक महाराष्ट्र पोलीस दल आहे. पोलीस दलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना विविध पातळीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात लेखी चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन पोलीस दलात सहभागी होत येणार आहे.

हे सुद्धा वाचा

अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी सांगितले की, 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 जणांचे अर्ज आले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.