AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना मोठी ऑफर, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी

स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर, करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांना 'स्वराज्य शक्ती सेना' पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची मोठी ऑफर दिली. महाराष्ट्रातील राजकारणात बदल घडवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी हे आवाहन करण्यात आले होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना मोठी ऑफर, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खेळी
Karuna Munde Manoj Jarange
| Updated on: Nov 10, 2025 | 2:13 PM
Share

सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता विविध पक्षांकडून रणनिती आखली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्वराज्य शक्ती सेनेच्या नेत्या करुणा शर्मा मुंडे यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. करुणा मुंडे यांनी मराठा आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांना एक मोठी आफर दिली आहे. ज्यामुळे सध्या त्या चर्चेत आहेत.

मोठ्या घराण्याची सून असताना मलाच पक्ष काढावा लागला

करुणा मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी पक्ष काढण्यामागील कारणही स्पष्ट केले. मी आज एका मोठ्या घराण्याची सून आहे. त्या घराण्याचे नाव संपूर्ण भारतात गाजत आहे. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे अशा मोठ्या घराण्याची मी सून असताना मलाच पक्ष काढावा लागला. मी कोणी लहान नाही. मी ४५ वर्षांची स्त्री आहे. तरीही मला पक्ष काढावा लागला. न्याय भेटत नाही. महिलांना जेलमध्ये टाकत आहेत. ज्या लोकांच्या छातीवर लाथ मारुन हे लोक मंत्री होतात, आमदार, खासदार होतात, त्यांच्या आई-वडिलांनाही जेलमध्ये टाकण्यात आले आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी विनंती 

यानंतर त्यांना तुम्ही मनोज जरांगेंची मदत मागणार का, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी मी मनोज जरांगे यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन घेऊन गेली होती. या निवेदनात मी मनोज जरांगे पाटलांना महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती केली होती, असे सांगितले.

“जरांगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे. आपल्याला महाराष्ट्रात कायतरी बदल घडवायचा आहे, त्यामुळे तुम्ही माझे निवदेन स्वीकारा आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. मला पार्टीचे कोणतेही पद नको, कोणतेही तिकीट नको. हे निवदेन मी सोशल मीडियावर टाकलेले आहे. नवीन लोकांना संधी द्या. महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्या, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे यांच्या या महत्त्वपूर्ण ऑफरवर मनोज जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटलांनी हे निमंत्रण नम्रपणे नाकारले. ते समाजकारणी असल्यामुळे समाजासाठी लढण्यास प्राधान्य देतील. मी एक समाजकारणी माणूस आहे. मी समाजासाठी लढतो. त्यासाठी त्यांनी माझ्या निवेदनाला नकार दिला होता, असा खुलासा करुणा मुंडेंनी केला होता.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!.

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं.

Vaibhav Sooryavanshi: ते चार महिने मी… झिम्बाब्वेविरुद्ध मॅचपूर्वी वैभव सूर्यवंशी भावूक, अखेर मनातंल ते दु:ख बोलून दाखवलं

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली