AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : मान्सून राज्यात सक्रीय, दोन दिवस राज्यात सर्वत्र पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

IMD Weather forecast : राज्यात मान्सून आता सक्रीय झाला आहे. राज्यात येत्या दोन, तीन दिवस सर्वत्र पावसाचा जोर असणार आहे. राज्यात दीर्घ कालवधीनंतर आता पावसाचा यलो अलर्टबरोबर ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Rain : मान्सून राज्यात सक्रीय, दोन दिवस राज्यात सर्वत्र पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट
8 september alert in maharashtraImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2023 | 7:22 AM
Share

पुणे | 8 सप्टेंबर 2023 : राज्यात अखेर मान्सून सक्रीय झाला आहे. दहिहंडी उत्सवाला राज्यात सर्वत्र पाऊस परतला आहे. आता पावसाचा जोर आणखी दोन, तीन दिवस कायम राहणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर मान्सून परतला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठा चांगला होईल. यामुळे रब्बी हंगाम चांगला होण्याची अपेक्षा आहे. आता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी पावसासंदर्भात चांगली बातमी दिली आहे.

मान्सून सक्रीय होण्यास काय ठरले कारण

मान्सून सक्रीय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात बदललेली परिस्थिती कारण ठरली आहे. बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रवाताच्या परिस्थितीसोबत अरबी समुद्रावरुन पश्चिमी वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. यामुळे रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम पाऊस असणार आहे. परंतु शुक्रवारी धुळे आणि जळगाव जिल्ह्याला शुक्रवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

कुठे पडणार मुसळधार पाऊस

चक्रवाताच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्य प्रदेशात ढगांची गर्दी झाली आहे. तसेच अरबी समुद्रावरुन येणारे पश्चिमी वारे सक्रीय झाले आहे. यामुळे राज्यात मान्सून सर्वत्र सक्रीय झाल्याचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे. पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तासांत मध्य ते मुसळधार पाऊस असणार आहे. सोलापूर आणि सांगली वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून जळगाव, धुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे शहरात दोन दिवस पाऊस

पुणे शहर आणि परिसरात दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. तसेच घाट माथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस ढगांची गर्दी कायम राहणार आहे. पाऊस परतल्यामुळे पुणे शहरातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. यामुळे पुणे शहरावर असलेले पाणी कपातीचे संकट टळणार आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.