AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update: धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं सांगितलं आहे.

Weather Update: धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Rain Update
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई: भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होऊ शकतो, असं सांगितलं आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडटासह आणि ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे आहे.

या जिल्ह्यामध्येही पावसाची शक्यता

रत्नागिरी, नाशिक, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील तीन ते चार तासात पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले

लातूर जिल्ह्यातल्या रेणा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. रेणा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे. रेणा नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या चार दिवसा पूर्वीच रेणा प्रकल्पाचं क्षेत्रात पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. संततधार पावसाने रेणापूरचा रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे . त्यामुळे रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार पाऊस कोसळतो आहे ,त्यामुळे नदी-ओढ्याना पुराची स्थिती आहे. वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने ऊस आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातली मुख्य नदी असलेली मांजरा नदी,पूर्णपणे प्रवाहित झाली आहे .

अहमदनगरला पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळधार पाऊस

अहमदनगरला पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळदार पाऊस पडलाय. शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान तर गावाला जोडणारे दोन ठिकाणचे पूल वाहून गेल्याने नागरिकांची हाल होतेय. पळशी ते वनकुटे दरम्यात पळशी गावाजवळील ओढ्यावरील एक पूल तर वनकुटे ते ढवळपुरीला जोडणाऱ्या काळुनदीवरील पुलच गेला वाहून गेलाय. तरी ढवळपुरी मार्गे जाणाऱ्या सर्व दोन आणि चारचाकी वाहनांनी जाऊ नये सरपंच राहुल झावरे यांनी गावकऱ्यांना अहवान केलाय. तर पारनेर तालुक्यातील तास ओहोळ तलाव 98%भरले असून. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, बाजरी, मुग, वांगी, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय.

गुहागर तालुक्याला पावसाचा फटका

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकणातील गुहागर तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय या पावसाचा फटका गुहागर तालुक्यातील अनेक भागांना बसलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. या मध्ये पालशेत पूल पाण्याखाली 26 गावांचा संपर्क तुटला तर गुहागर-रत्नागिरी मार्ग देखील पाण्याखाली गेले आहेत. गुहागर आरे पुलावरून पाणी त्यामुळे धोपवेकडे जाणारामार्ग बंद तर गुहागर एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचलं आहे.

रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. पण, त्याचवेळी भरतीची वेळ असल्यानं चिंता आणखी वाढली आहे. सध्या समुद्राला उधाण आलं असून लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. चिपळूणला 22 जुलै रोजी आलेल्या पुराला समुद्राला आलेली भरती हे देखील एक कारण पुढं आलं होतं. त्यामुळे पाऊस आणि भरतीची एकच वेळ आल्यानं चिंता काही प्रमाणात का असेना नक्कीच वाढताना दिसून येत आहे.

इतर बातम्या:

Ratnagiri Rain | दापोलीच्या इतिहासातील थैमान घालणारा पाऊस, चिपळूणमध्येही 16 तासापासून मुसळधार, सतर्कतेचा इशारा

Marathwada Weather Update: मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार, ऑरेंज ॲलर्ट जारी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Update IMD predicted rain fall at Madhya Maharashtra and North Maharashtra

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...