AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : दिवाळीतही रेनकोट घालावा लागणार? राज्यात पाऊस कधीपर्यंत सक्रीय ? हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती

Rain Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. हवामान खात्याने दिवाळीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. यलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. सणांच्या काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

Rain Update : दिवाळीतही रेनकोट घालावा लागणार? राज्यात पाऊस कधीपर्यंत सक्रीय ? हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती
| Edited By: | Updated on: Sep 16, 2025 | 1:57 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून उघडलेल्या पावसाने कालपासून राज्यभरात पुन्हा धूमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून आणखी काही दिवस हे चित्र असंच राहणार असल्याचं दिसतंय. आर्थिक राजधानी मुंबईत आजही ढगाळच वातावरण असून ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसायला सुरूवात पुन्हा झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची मात्र चांगलची त्रेधातिरपीट उडाली आहे. गणपती विसर्जनानंतर काही दिवस पाऊस उघडला होता, वातावरणातही गरमी जाणवू लागली होती.

दिवाळीतही पडणार पाऊस ?

मात्र आता राज्यभरात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला असून महाराष्ट्रात मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी यांसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका बसल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसलं. त्यातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे लोकांची डोकेदुखी वाढू शकते. खरंतर बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यातच हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे की यंदा नवरात्र, दसरा दिवाळीपर्यंत पाऊस होऊ शकतो. यामुळे नागरिक धास्तावले असून सणांच्या काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास सगळंच विस्कळीत होऊ शकतं.

यलो अलर्ट, रेड अलर्ट कुठे ?

दरम्यान मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना आज हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये काही भागांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत महत्वाचं काम असेल, गरज असेल तरच बाहेर पडा असंही नागरिकांना सांगण्यात आलं आहे.

ऑरेंज अलर्ट – रायगड, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर घाटमाथा, या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहमदनगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती. नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.