AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता धर्मेंद्र यांच्या घराजवळ मोठी दुर्घटना टळली, वादळी पावसात अचानक… नेमकं काय झालं?

राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, मुंबईसह अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दरड कोसळणे, पाणी साचणे आणि झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड पडल्याची घटना ताजी असतानाच, आता जुहूमध्ये धर्मेंद्र यांच्या घराजवळ झाडाची फांदी कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, बीएमसीच्या दिरंगाईवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अभिनेता धर्मेंद्र यांच्या घराजवळ मोठी दुर्घटना टळली, वादळी पावसात अचानक… नेमकं काय झालं?
अभिनेता धर्मेंद्र यांच्या घराजवळ टळली मोठी दुर्घटना Image Credit source: social media
| Updated on: Jul 06, 2026 | 9:59 AM
Share

राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला असून गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या धारा अविरत कोसळत आहे. यामुळे अनेक भागांत पाणी साचलं असून मुंबईलाही जोरदार पावसाचा बराच फटका बसला आहे. एकीकडे सततच्या पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने रस्ते मार्ग ठप्प झाला तर रेल्वे मार्गावरही दरड आल्याने मुंबई-पुणे रेल्वे सेवाही ठप्प झाली. तसेच मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे कर्जत–खोपोली दरम्यानच्या रेल्वेमार्गावरील खडीचा थर वाहून गेसल्याने तेथील रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे. तिन्ही बाजूनही पावसाच फटाक बसत असतानाच मुंबई आणि उपनगारमत पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडताना दिसत आहेत. कित्येक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या, झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून अनेक विद्यार्थी जखमी झाले तर एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. त्याची धास्ती अजून लोकामच्या मनात कायम असतानाच आता आता जुहू येथेही मोठी दुर्घटना होता होता टळली.

काल रात्रीपासून मुंबईत झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे जुहूमध्ये एक मोठा अपघात टळला आहे. जुहूतील एनएस रोडवर अभिनेता धर्मेंद्र यांच्या घराजवळ एका झाडाची मोठी फांदी अचानक कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही फांदी काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे तुटून पडली होती. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ज्या ठिकाणी ही फांदी पडली, त्या ठिकाणापासून अवघ्या थोड्याच अंतरावर अभिनेते धर्मेंद्र आणि अजय देवगन यांचे घर आहे. ही फांदी कोसळली ,मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाले नाही वा कोणी जखमीही झालं नाही. मात्र असं असलं तरी फांदी कोसळून बराच काळ झाला असल तरी, ही फांदी हटवण्यासाठी बीएमसीचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून लवकरचा लवकर ती फांदी हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

ठाण्यात 24 तासांत 186 तक्रारी

दुसरीकडे मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाण्यात गेल्या 24 तासांमध्ये 186 तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाल्या. यामध्ये 110 झाडें पडली होती, तर 38 झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या तक्रारी होत्या. यातील 14 झाडे ही धोकादायक परिस्थिती आहेत. गेल्या काही दिवसामध्ये झाडं अंगावर पडून तीन जण जखमी झाले. तसेच दोन ठिकाणी कंपाउंड वॉल पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नाशिक – वृंदावन कॉलनीत कोसळलं झाड

दरम्यान नाशिकमध्ये सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झली आहे. नाशिकमध्येही झाड कोसळण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. इंदिरानगरच्या वृंदावन कॉलनीत जून झाड कोसळल्याची माहिती समोर आली असून अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असूनन झाड हटवण्याचे काम सुरू आहे. यात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.

Follow Us
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर
प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर पंचवटी एक्सप्रेस... मोठी अपडेट समोर
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण