Maharashtra Temperature Today : राज्यावर दुहेरी संकट, मोठा इशारा, 24 तासात..
Maharashtra Temperature Today 3th May 2026 : मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला.

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात मे महिन्यात पाऊस अधिक असेल. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याचेही संकेत आहेत. काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. आजही विदर्भ आणि कोकणात उष्णता अधिक असेल. नागरिकांनी शक्यतो अतिमहत्वाच्या कामाशिवाय दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. सध्याच्या घडीला राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याची उष्णता. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.
उष्णता वाढत असल्याने उष्णघाताच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. दुपारीच्या वेळी उष्णता अधिक आहे. त्यामध्येच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला हवामान विभागाकडून दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून नागरिक हैराण झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमान तब्बल 44 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. या तीव्र उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर पशुपालकांसमोरही मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. पाणीटंचाई आणि उन्हाच्या तडाख्यामुळे जनावरांना दिवसाच्या वेळेत बाहेर काढणं कठीण झालं आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तापमानात सध्या दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी तापमानाने 43 अंशांचा उच्चांक गाठला होता, त्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता तापमान घसरून 40 अंशांवर आल्याने सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मे महिना सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.