AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : कुठे रिप रिप, तर कुठे मुसळधार; अवकाळी पावसाने महाराष्ट्र ओलचिंब…

Maharashtra Rain Update : मे महिन्यातच महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसंच आजही काही ठिकाणी पाऊस कोसळला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. आज कोणत्या भागात पाऊस झाला? वाचा सविस्तर माहिती...

Maharashtra Weather Update : कुठे रिप रिप, तर कुठे मुसळधार; अवकाळी पावसाने महाराष्ट्र ओलचिंब...
Updated on: May 14, 2024 | 7:20 PM
Share

मे महिन्याच्या मध्यात असतानाच महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून सुटका होत असली तरी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मुसळधार पावसाचे आगमन झालं आहे. उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरासह जिल्हाभरात पावसामुळे दिलासा मिळालाय. पाण्याअभावी अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गांवर होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. मागील महिनाभरात उन्हाचा पारा सातत्याने वाढलेला पाहायला मिळाला होता. त्यातच 44 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झालेली होती. मात्र आज झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.

येवल्यात दमदार पावसाची हजेरी

नाशिकच्या येवल्यातही पाऊस झाला. येवला शहरासह परिसरात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकाडाटासह 10 ते 15 मिनिटे पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. येवल्यात आठवडे बाजार असल्याने अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

शिरूरमध्ये पावसामुळे नुकसान

शिरूरमधल्या मांडवगण फराटा इथं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मांडवगण फराट्यातील शेतकरी राजेंद्र मारूती घाडगे यांची अवकाळी पावसाने तीन एकर केळी भूईसुपाट झाली आहे . एकूण ३ हजार पाचशे केळीची झाडे होती केळीला फळे लागली होती. शेतकऱ्यांचे केळीच्या बागाचे 13 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. तरी शासनाने नुकसान भरपाई लवकर द्यावी . केळी, ऊस, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागामध्ये शासनाने पंचनामा सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे

सातारा पाटण चाफळसह विभागाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढलं. तर चाफळ इथल्या समर्थनगरमध्ये अशोक पांडुरंग साळुंखे यांच्या घराशेजारील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने उभे झाड पेटलं.

गोंदियात नुकसानीची चिन्हे

गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात पाऊस झाला. अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. या अवकाळी धान पिकाला फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील या पावसाने धान पीक असला नुकसान होण्याची पुन्हा चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.