Agniveer | दोन एकर जमीन…एकुलता एक मुलगा.. शहीद अग्नीवीर अक्षय याची डोळ्यात अश्रू आणणारी कथा

Agniveer Akshay Laxman | देशातील पहिला अग्नीवीर अक्षय गावटे सियाचीनमध्ये शहीद झाला. 30 डिसेंबर 2022 रोजी तो अग्नीवीर म्हणून सैन्यात दाखल झाला होता. 9 महीने 21 दिवस त्याने देशाची सेवा केली. तो शहीद झाल्यानंतर संपूर्ण गावाला रडू कोसळले.

Agniveer | दोन एकर जमीन...एकुलता एक मुलगा.. शहीद अग्नीवीर अक्षय याची डोळ्यात अश्रू आणणारी कथा
gniveer Gawate Akshay Laxman
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 7:48 AM

पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : जगातील सर्वात उंच भाग म्हणजे सियाचीन. या भागातील ग्लेशियरमध्ये अक्षय लक्ष्मण गावटे (वह 22) हा तैनात होता. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराय या गावामधील अक्षय हा रहिवाशी आहे. सियाचीनमध्ये तैनात असताना तो शहीद झाला. त्याला त्यापूर्वी रुग्णालयात नेण्यात आले. 45 मिनिटांसाठी त्याला सीपीआर दिले. परंतु त्याचे प्राण वाचता आले नाही. त्याचा मृत्यू कशामुळे झाला आहे? हे अजून स्पष्ट झाले नाही. त्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय लष्कराने त्याच्या सर्वोच्च बलिदानास सलाम करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

लष्करात भरती होण्याचे होते स्वप्न

अक्षय याचे वडील लक्ष्मण गावटे यांनी सांगितले की, अक्षय याने बीकॉमची पदवी घेतली. त्याला आधीपासून लष्कराचे आकर्षण होते. मी त्याला लष्करात जाऊ नको, असे सांगतो. परंतु तो आपल्या जिद्दीवर कायम होता. तीन दिवासांपूर्वी त्याच्याशी आमचे बोलणे झाले. त्याने माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आईसंदर्भात विचारणा केली.

अक्षय एकुलता एक मुलगा

अक्षय याच्या परिवारात त्याचे आई-वडील आणि लहान बहिण श्वेता आहे. त्याचे काका सेवानिवृत्त सैनिक आहे. लष्करात दाखल होण्यासाठी त्याने कठोर परिश्रम केले. रात्रंदिवस त्याने अभ्यास केला. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी ठरला, असे गावातील साहेबराव गावटे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

परिवारकडे दोन एकर कोरडवाहू जमीन

अक्षय याचे आई-वडील शेतात मजुरी करतात. त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. त्याची लहान बहिण बारावीत शिकत आहे. तो परिवारात एकमेव कमवता व्यक्ती होता. ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सुटी घेऊन तो घरी आला होता. माजी सरपंच सतीश गावटे यांनी सांगितले की, आमच्या गावांत 20 पेक्षा जास्त सेवानिवृत्त सैनिक आहेत. त्यांच्याकडूनच अक्षय याला सैन्यात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. अक्षय याच्या यशानंतर गावातील इतर युवकही अग्नीवीरची तयारी करत आहेत. अक्षय याचा परिवार अतिसामान्य आहे. त्याचा परिवारातील एकुलता एक कमवता मुलगा गेल्यामुळे त्यांना चांगल्या मदतीची गरज आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.