AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मविआच्या भैताड वांग्यांना…, जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि शरद पवार…’ भाजप नेत्याची जळजळीत टीका

ओबीसी मंत्रालय हे महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपा हा ओबीसी आणि ओबीसी हा भाजपा आहे. ओबीसींच्या योजना ओबीसीपर्यंत पोहोचल्या तर भाजपचे मतदान वाढेल ही भीती कॉंग्रेसला आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील जनगणना होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'मविआच्या भैताड वांग्यांना..., जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि शरद पवार...' भाजप नेत्याची जळजळीत टीका
SHARAD PAWAR, RAHUL GANDHI, MANOJ JARNAGE PATILImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Oct 09, 2023 | 9:24 PM
Share

अमरावती : 9 ऑक्टोबर 2023 |  भाजपची ओबीसी जागर यात्रा अमरावतीमध्ये पोहोचली आहे. भाजप नेते आशिष देशमुख आणि खासदार अनिल बोंडे या जागर यात्रेचे नेतृत्व करत आहेत. या जागर यात्रेत बोलताना या दोन्ही नेत्यांनी कॉंग्रेसवर टीका केली. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मोठा आरोप केलाय. अमरावती तिवसा मतदारसंघाच्या कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा 2024 मध्ये आम्ही एकत्र मिळून करेकट कार्यक्रम करू. तुम्हाला आम्ही घरी बसवू असा इशारा दिलाय. याठिकाणी भाजपचा आमदार निवडून येईल असेही ते म्हणालेत.

ओबीसी ताकद या जागर यात्रेतून दाखवण्याची गरज आहे. ओबीसी मंत्रालय हे महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपा हा ओबीसी आणि ओबीसी हा भाजपा आहे. ओबीसीचा उद्धार करण्याचा भाजपचा निर्धार आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. ओबीसींच्या पाठीशी भाजप आहे. मूळ जनसमुदाय हा भाजपसोबत आहे, असे माजी आमदार आणि भाजप नेते आशिष देशमुख यावेळी म्हणाले.

शरद पवार पोळी भाजत आहे

राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागितली नाही म्हणून त्यांची खासदारकी केली, असा टोला त्यांनी लगावला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शरद पवार आपली पोळी भाजत आहे. त्यांचा पक्ष संपलेला आहे. राज्यातील सुव्यवस्था बिघडावी यासाठी शरद पवार मराठा समाजाला भडकवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अनिल बोंडें यांची यशोमती ठाकुर यांच्यावर टीका

काँग्रेस पक्ष आपल्या डोळ्यात धूळ फेकत आहे. त्यामुळे ओबीसीला जागे करण्यासाठी ही यात्रा आहे. काही जणांनी ओबीसी जनगणनाचे बॅनर लावले. यांनी इंग्रजांची चाकरी केली म्हणून ठाकुरांची पदवी मिळाली अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली.

काँगेसचा डीएनचा महात्मा गांधीचा नाही

कॉंग्रेसने कधी ओबीसीचा पंतप्रधान बनवला नाही. शरद पवार पंतप्रधान पदासाठी खूप दिवसापासून वेटींगवर होते. पण, काँग्रेसने त्यांना पंतप्रधान केलं नाही. काँगेसचा डीएनचा महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधीचा आहे.

मविआच्या भैताड वांग्यांना

किती वेळा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा ओबीसी जनगणना का केली नाही. मी फडणवीस आणि बावनकुळेंना पत्र लिहिलं. आम्ही मराठांच्या विरोधात नाही. फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं पण. मविआच्या भैताड वांग्यांना ते टिकवता आलं नाही. सगळ्या मराठ्यांना कुणब्यांना प्रमाणपत्र देता येत नाही, असेही अनिल बोंडे म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.