AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या चाणक्यनीतीचा विजय…

Thane district bank news : ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केलंय. त्यानंतर आता अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या चाणक्यनीतीचा विजय…
ravindra chavanImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 30, 2026 | 4:07 PM
Share

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिलेदारांनी जिंकली. या निवडणुकीत ‘परिवर्तन पॅनल’ला पराभव स्वीकारावा लागला. तर ‘सहकार पॅनल’ने वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयानंतर आता बँकेच्या अध्यक्षपदी कोण होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजप की शिंदे गटाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबतचा अंतिम फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. बहुजन विकास आघाडीकडून बँकेतील सत्तेच्या चाव्या महायुतीला यश आलं. या बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’च्या माध्यमातून एकनाथ शिंदेंचे उमेदवार उभे होते. तर काही किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे उमेदवार उभे होते. तर दुसरीकडे ‘परिवर्तन पॅनल’मध्येही भाजपचे ४ आणि एकनाथ शिंदे यांच्या ३ उमेदवार उभे होते.

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे 8 उमेदवार निवडून आले. तर 5 उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत 21 जागांसाठी बहुमतासाठी 11 उमेदवारांची गरज होती. मात्र, महायुतीते 13 उमेदवार विजयी झाले. ठाणे जिल्ह्यांचे लक्ष असलल्या या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची खेळी यशस्वी ठरली. या निवडणुकीच्या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसलाय.

बँकेच्या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यानंतर अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तेबाबतचा पुढील निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची चर्चा आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाव्या महायुती स्वत:कडे ठेवणार की, बहुजन विकास आघाडीकडे सुपूर्द हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच बँकेचं अध्यक्षपद भाजप की शिंदे गटाकडे जाणार याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी
देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोल....
Delhi Toll : देशाच्या राजधानीत प्रवेश करताना आता वेळ वाचणार; दिल्लीच्या टोलनाक्यांवर नवी MLFF प्रणाली सुरू
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात