AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे तीन एक्के मैदानात, उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर, वाचा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे तीन एक्के मैदानात उतरवले आहेत. भाजपने उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. वाचा यादी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे तीन एक्के मैदानात, उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर, वाचा
bjp news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 2:57 PM
Share

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. महाराष्ट्रातील 5 जागांवर विधानपरिषद निवडणूक होणार आहे. त्यातील तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. त्यातील तीन जागांवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाने 4 ऑक्टोबर रोजी तिघांच्या नावाला मंजुरी दिली. भाजपने पुण्यातील पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकार विठ्ठलराव कोहळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर या मतदारसंघातून इतर राजकीय संघटनांकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुक मुरलीधर गावडे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून महायुतीत बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा देखील भाजपच्या पदरात पडली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने मंजुरी दिल्यानंतर तिन्ही उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. या विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख मंगळवार, 6 ऑक्टोबर आहे. तर 7 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 9 ऑक्टोबर असणार आहे. तर महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 23 रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, विधानपरिषदेच्या निवडणुका या 31 ऑक्टोबरपूर्वी घ्यावा लागणार आहेत.

तत्पूर्वी, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गटाच्या मंगेश चिवटे यांनीही प्रयत्न केले होते. परंतु ही जागा भाजपच्या वाट्याला आली. महायुतीमधील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतील, असा त्यांना विश्वास होता. परंतु शेवटच्या क्षणी महायुतीमधून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी मिळाली. तर उमेदवारी मिळाल्यानंतर नागपूरचे सुधाकर कोहळे म्हणाले, ‘गेल्या 35 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे, एक एक वर्षाआधी नोंदणी प्रमुख म्हणून मला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जबाबदारी दिली होती. वर्षभरापासून सातत्याने फिरत होतो. मला खात्री आहे की ही जागा आम्ही जिंकणार. मी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मला एक वर्षांपासून अलर्ट केले होते. अपेक्षित नोंदणी झाली आहे, त्यामुळे विजयाबद्दल माझ्या मनात शंका नाही,गेल्यावेळी ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या दूर केल्या. माजी आमदार अनिल सोले माझे गुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात मी काम करतोय. त्यांची कुठलीही नाराजी नाही’.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी