AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Bomb Blast Case : मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार नुकसान भरपाई द्या, विशेष कोर्टाचे आदेश

मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घटना घडली आहे. १७ वर्षांनंतर, NIA विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सात आरोपींना पुराव्यांच्या अभावामुळे निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Malegaon Bomb Blast Case : मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार नुकसान भरपाई द्या, विशेष कोर्टाचे आदेश
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजार द्या, विशेष कोर्टाचे आदेश
| Updated on: Jul 31, 2025 | 12:15 PM
Share

2008 साली मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासा झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली असून तब्बल 17 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे. या खटल्यातील सर्व (7) आरोपींची NIA विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांअभावी या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच या बॉम्बस्फोटात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून 2 लाख तर जे जखमी झाले त्यांना 50 हाडर रुपये देण्यात यावेत असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

एक हजारपेक्षा अधिक पानांचे हे निकालपत्र असून न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून या निकालाचे वाचन करण्यात आले.

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता. आज मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला.  साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी अशा सात जणांवर आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती, मात्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

आमचा पुनर्जन्म झाला, समीर कुलकर्णींना अश्रू अनावर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी समीर कुलकर्णी हे देखील आरोपी आहोत.  बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केली, असा आरोप त्यांच्यावर होता. मात्र त्यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. कोर्टाचा निकाला ऐकल्यावर समीर कुलकर्णी यांच्या अश्रूचा बांध फुटला. 17 वर्षं आम्ही पिडीत होतो, आज आमचा पुनर्जन्म झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कोर्टाचीे निरीक्षणं काय ?

  • साध्वी प्रज्ञाचीच गाडी बॉम्बस्फोटासाठी वापरली हे यंत्रणांना सिद्ध करू शकली नाही.
  • कुठल्याही कट रचण्यासाठी कट रचला हेही सिध्द करू शकले नाहीत.
  • आरडीएक्स सुधाकर द्विवेदी यांच्या घरी ठेवलं होत हेही सिद्ध होऊ शकल नाही , असं कोर्टाने नमूद केलं.
  •  प्रसाद पुरोहित यांनी काश्मीर दौऱ्यावर असताना आरडीएक्स आणल आणि रेकी केली बॉम्बची गाडी भिक्खू चौकात पार्क केली याचाही पुरावा नाही असंही कोर्टाने नमूद केलं.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.