वीज बिल भरण्यासाठी पानटपरी चालकाने आणली 12 हजारांची चिल्लर; अधिकाऱ्याने तीनेवळा परत पाठवलं

प्रवीण चुकेवार असे या ग्राहकाचे नाव असून तो पान टपरी चालवतो. | Electricity bills

वीज बिल भरण्यासाठी पानटपरी चालकाने आणली 12 हजारांची चिल्लर; अधिकाऱ्याने तीनेवळा परत पाठवलं
व्यवसायामुळे चिल्लर जमा होणार हे स्वाभाविक आहे. यांना एकूण 14 हजार रुपये विजेचे बिल आले. मात्र रिडींग जास्त घेण्यात आल्याने त्यांचे दोन हजार कमी झाले.
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 4:05 PM

वर्धा: वीज बिल भरण्याचा आग्रह करणाऱ्या महावितरणच्या बिल भरणा केंद्रावर बिल (Electricity bill) स्वीकारत नसल्याचा प्रत्यय वर्ध्यातील एका ग्राहकाला सातत्याने येत आहे. याला कारणही तसेच आहे. पिशवीत आणलेली चिल्लर नाणी मोजायला त्रास होत असल्याने वीज भरणा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी या ग्राहकाला तीनवेळा परत पाठवले आहे. (man bought 12000 coins to pay electricity bill in Wardha Maharashtra)

प्रवीण चुकेवार असे या ग्राहकाचे नाव असून तो पान टपरी चालवतो. तो आपले 14 हजारांचे बिल भरण्यासाठी वर्ध्यातील राम नगरच्या बिल भरणा केंद्रावर 10 रुपयांच्या नाण्याची चिल्लर घेऊन आला होता. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी त्याला तीनवेळा परत पाठवले आहे.

प्रवीण चुकेवर हे वर्ध्याच्या सिंधी (मेघे) परिसरात वास्तव्याला आहेत. याठिकाणी त्यांचा पान टपरीचा व्यवसाय आहे. व्यवसायामुळे चिल्लर जमा होणार हे स्वाभाविक आहे. यांना एकूण 14 हजार रुपये विजेचे बिल आले. मात्र रिडींग जास्त घेण्यात आल्याने त्यांचे दोन हजार कमी झाले. आता त्यापैकी 12 हजार रुपये त्यांना भरायचे आहेत. 12 हजार रुपये बिल भरतांना चुकेवार यांनी 4 हजार रुपयांचे दहाची नाणी आणि 7 हजार रुपयांच्या10 रुपयांच्या नोटा असे एकूण 12 हजार रुपये घेऊन वीज बिल भरणा केंद्र गाठले. पण केंद्रावर काउंटरवर पोहचलेल्या चुकेवार यांच्या पदरी निराशाच आली. बिल भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चिल्लर घेण्यास नकार दिला.

‘तीन खेपा घालूनही वीजबिल घेण्यास नकार’

पहिल्यांदा गर्दी असल्याने आपल्याला परत केले असेल असा समज झालेल्या चुकेवार यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बिल भरण्याचा प्रयत्न केला. पण आपण चिल्लर स्वीकारणारच नाही असे ठामपणे सांगून चिल्लर स्वीकारलीच नाही. महावितरणच्या अतिरिक्त अभियंते नरेश पारधी यांच्याकडे ग्राहकाने धाव घेतली पण नरेश यांच्याकडून निराशाच पदरी पडली. अखेर सदर नाणी स्वीकारण्याचे आश्वासन देण्यात आले. अखेर ही नाणी का घेण्यात येत नव्हती याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एसबीआय बँकेच्या काउंटरवर ही नाणी स्वीकारली जात असल्याचे उत्तर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी दिले.

(man bought 12000 coins to pay electricity bill in Wardha Maharashtra)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.