2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?

केशर आंब्याची गोडी अनेकांना तृप्त करते (Mango lover will taste Khudsu Keshar Mango this year)

2021 म्हणजे खरंच आनंद! खुडूसचा केशर आंबा कधी चाखायला मिळणार?
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 3:47 PM

सोलापूर : गेल्या हंगामात हवामान बदलामुळे राज्यात आंबा उत्पादनात घट झाली होती. तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांना आंब्याची गोडी चाखता आली नाही. पण यंदा सोलापूर जिल्ह्यातील खुडूस येथील शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी योग्य व्यवस्थापन आणि बागेची काळजी घेतल्याने केशर आंबा पोटभरून खायला मिळणार आहे. कारण या बागेतील आंब्याच्या झाडांना आताच मोठा मोहर आला आहे (Mango lover will taste Khudsu Keshar Mango this year).

कोकणाचा हापूस जसा प्रसिद्ध आहे त्याच पध्दतीने महाराष्ट्रातील इतर भागात केशर आंब्याची गोडी अनेकांना तृप्त करते. माळशिरस तालुक्यात माळरान भाग असल्याने अनेक ठिकाणी केशर आंब्याच्या बागांची लागवड केली जाते. खुडूसमध्ये सरगर कुटुंबाने सुध्दा अशाच एका शासकीय योजनेतून केशर आंबा बागेची लागवड केली. मागील वर्षी त्यांना हवामान बदलाचा फटका बसला आणि आंब्याचा हंगाम वाया गेला. यंदा अतिवृष्टीमुळे त्यांच्या बागेत पाणी साठले होते. त्यामुळे यंदाही आंबा हंगाम वाया जाणार, अशी भीती डॉक्टर केशव सरगर यांना होती.

केशर आंबा बाग जपण्यासाठी संपूर्ण सरगर कुटुंब आंबा तयार होईपर्यंत झटत असतात. यंदाचा हंगाम वाया जाऊ न देण्यासाठी सरगर कुटुंबाने काम सुरू केले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहर येण्यास सुरूवात झाली. केशर आंबा बागेतील आंबा झाडाची प्रत्येक फांदी मोहोर आल्याने बहरली आहे. तर काही झाडांना छोट्या कैऱ्या सुध्दा आल्या आहेत (Mango lover will taste Khudsu Keshar Mango this year).

राज्यात इतर ठिकाणी हवामान बदलाचा फटका बसल्याने हंगाम लांबणार असला तरी खुडूसचा केशर आंबा यंदा बाजारात येणार आहे. खुडूसचा सरगर यांचा केशर आंबा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होईल. त्यानंतर मे अखेर हा आंबा उपलब्ध असेल. सरगर यांची सहा एकर आंब्याची बाग आहे. एकरी 25 टन केशर आंबा मिळण्याचा अंदाज सरगर यांना आहे. माळशिरस तालुक्यातील केशर आंबा बागा आता बहरू लागल्या आहेत. योग्य व्यवस्थापन आणि बागेची काळजी घेतल्याने केशर आंबा चव नक्कीच चाखायला मिळेल.

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.