AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे बॅकफूटवर नाहीच, उमेदवार दिले नाही तरी मोठी रणनीती, मास्टरप्लॅन काय?

"माझ्या समाजाचं योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावं. मी इमानदार रक्त आहे, बेईमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही", असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

मोठी बातमी! मनोज जरांगे बॅकफूटवर नाहीच, उमेदवार दिले नाही तरी मोठी रणनीती, मास्टरप्लॅन काय?
मनोज जरांगे पाटील
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 05, 2024 | 4:09 PM
Share

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे भाजपच्या समर्थकांकडून मनोज जरांगेंवर टीका केली जात आहे. यानंतर आता मनोज जरांगे यांची नवी भूमिका समोर आली आहे. मनोज जरांगे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या आगामी काळातील रणनीतीबाबत माहिती दिली. “मराठे 6 कोटी आहेत. पण तरीही केवळ पाच-दहा आमदार निवडून आले असते तर समाजाने खाली मान घालून जाणं मला सहन झालं नसतं. आम्ही निर्णय काय एवढा वाईट घेतलाय? निवडणूक लढवायची नाही. संपला विषय. आमचा काही राजकारण हा खान्दानी धंदा नाही. आम्ही राजकारणासाठी आलो का? मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. हाच आमचा मूळ उद्देश आहे”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

यावेळी मनोज जरांगे यांना कुणाला पाडणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ते होईल ना, दोन-दोन दिवसांत समाधान होईल ना. मी काहींना काही दिशा सांगणार आहे. माझ्या समाजाचं योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावं. मी इमानदार रक्त आहे, बेईमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

‘आपली ताकद वाया जाऊ द्यायची नाही’

“जो बॉन्ड देईल, व्हिडीओग्राफी देईल त्यावर सुद्धा काही अपक्षांनी फॉर्म ठेवलेले आहेत. ते मला आज कळायला लागलं आहे. काहींनी त्या जीवावर फॉर्म ठेवले आहेत. आता मराठा समाजाला सांगतो कुणाचेही बॉन्ड मी घेणार नाही आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. कारण जे निवडून येणार नाहीत ते सुद्धा बॉन्ड द्यायला लागले आहेत. मराठा समाजाला काय करायचं आहे? आपल्याला आपली ताकद वाया जाऊ द्यायची नाही. कारण निवडून येण्याचं गणित आहे, त्या आधारावर मराठा समाजाची मते देवून त्याला निवडून आणायचं आहे. कुणीही लिहून दिलं आणि तो पराभवातच जमा असेल तर आपलाच उमेदवार उभा करायला आपल्याला अडचण काय होता?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

‘मनोज जरांगे यांचं मोलाचं आवाहन’

“मराठा समाजाच्या अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यांनी एका शब्दांत अर्ज मागे घेतले. याचाच अर्थ त्यांनी समाजाचा विश्वासघात केला नाही. काहींनी अर्ज मागे घेतले नाहीत. काही जण मी बॉन्ड दिला असल्याचं सांगतो. पण आपण कुणालाही बॉन्ड दिलेला नाही. जिंकून येणाऱ्या उमेदवाराकडूनच बॉन्ड घ्यायचे. मराठ्यांचे मतदान खाण्यासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी जातीसोबत असा डाव खेळायला नको होता. तसं करायचं असतं तर आम्ही आमच्या लोकांना अर्ज काढायला लावले नसते. कुणी बॉन्डबाबत बोलत असेल तर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

“मला मराठा समाजाला संकटात टाकायचं नाही. दहा-वीस लोकं राजकारणात जायचं बोलत होते. मला राजकारणाचा नाद असता तर 50 उमेदवार उभे केले असते. माझी ताकद दिली असती. माझा राज्यात दबदबा झाला असता. माझा स्ट्राईक रेट तो नाही. माझा स्ट्राईक मराठा समाज आहे. मला राजकारणाचा नाद नाही, मला गरिबाला सांभाळायचं आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?