Manoj Jarange Patil : मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने नाही येणार, मनोज जरांग पाटील यांनी घेतली समजूतदारपणाची भूमिका

Manoj Jarange Patil : "ओबीसींसाठी जीआर काढला, त्या सर्व सवलती लागू झाल्या पाहिजेत. केसेस मागे घेऊन बोललेलात त्या मागे घ्या, प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही"

Manoj Jarange Patil : मुंबईत मराठा-ओबीसी आमने-सामने नाही येणार, मनोज जरांग पाटील यांनी घेतली समजूतदारपणाची भूमिका
Manoj jarange patil
| Updated on: Aug 22, 2026 | 1:37 PM

“आम्ही आमची जबाबदारी पार पडतोय. संस्कारापासून लांब गेलेलो नाही. ओबीसी आमचाचं आहे, तो आल्यावर जाऊ. 29 ऑगस्टला अंतरवलीत फायनल आहे. पण त्याआधी सरकारने काही डाव टाकला, तर मग काय खरं नाही. मग, मुंबईला जाऊ माघार नाही” असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुंबईत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने-सामने येऊ शकतात. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘त्यांना जाऊन येऊ दे, मग आम्ही जाऊ’

एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावर मनोज जरांगे बोलले. “ते नेहमीच येतात. त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. सरकारने त्यांना पाठवलय असंही नाही. साधक-बाधक चर्चा झाली. त्या निमित्ताने आरक्षणावर चर्चा झाली. सरकारने पाठवलं असतं, तर सविस्तर बोलता आलं असतं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

तळतळाट घेऊ नका

“त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. शिंदे साहेबांच्या सांगण्यावरुन संजय शिरसाट आणि देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठ्यांची प्रमाणपत्र रद्द केली. हे सत्य आहे. शिंदे साहेबांकडून हे व्हायला नको होतं. गोरगरीबांचे आशीर्वाद घ्या, तळतळाट घेऊ नका. फडणवीस शिंदे राज्य करतात. गोरगरीबांच्या पाठिवरुन हात फिरवण्याची तुमची जबाबदारी आहे. समाजाने तुम्हाला गादीवर बसवलं. फडणवीस-शिंदे यांनी अन्याय करायला नको होता” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

जरांगे पाटलांनी काय मागण्या केल्या?

“मी सकारात्मकतेने जगणारा माणूस नाही. माझ्या समाजाच्या वेदना माझ्या डोळ्यासमोर दिसत असतील, तर मी सरकारशी बोलू शकत नाही. मला कृती पाहिजे. 58 लाख नोंदी शोधल्या मग 58 लाख प्रमाणपत्र पाहिजेत.29 ऑगस्टच्या आंदोलनावर मी ठाम आहे. 29 ऑगस्टला आंदोलन होणारचं. 58 लाख कुणबी प्रमाणपत्र डाटा द्यायचा. आम्ही दिलं म्हणून. नोंदी सापडल्याचं नको, कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. वॅलिडिटीसाठी ज्यांनी अर्ज केलेत त्यांना 28 ऑगस्ट पर्यंत, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलीच पाहिजेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसींसाठी जीआर काढला, त्या सर्व सवलती लागू झाल्या पाहिजेत. केसेस मागे घेऊन बोललेलात त्या मागे घ्या, प्रमाणपत्र वाटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. सातारा गॅझेटची जीआर काढून अंमलबजावणी करायची अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us