AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या नेभळ्या भोऱ्याला काय कळणार? मनोज जरांगे पाटील भाजपच्या बड्या नेत्यावर भडकले, सगळंच काढलं

कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्या नेभळ्या भोऱ्याला काय कळणार? मनोज जरांगे पाटील भाजपच्या बड्या नेत्यावर भडकले, सगळंच काढलं
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 07, 2026 | 2:57 PM
Share

कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या दौऱ्याबद्दल माहिती देताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जात आहोत, मात्र सरकारचा सगळ्यात मोठा प्लॅन हा आहे की कोल्हापूर आणि सातारा संस्थानचं गॅझेट द्यायचं नाही. मी जबाबदारीने सांगतो हा पूर्ण नियोजित कट आहे, काहीही झालं तरी सरकारला सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थांचा जीआर द्यायचा नाही.कारण कोल्हापूर संस्थान मध्ये 3 लाख 85 हजार कुणबी आहेत.  हे गॅझेट त्यांना लागू करायची नाही म्हणून त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हायला लागलेत. असा एक समाजाच्या बदनामीचा घाट घातला आहे, हा नवीन कट रचलेला आहे, असा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सातारा संस्थानचे गॅजेट आणि 58 लाख नोंदी यांना द्यायच्या  नाहीत, यासाठी यांनी नियोजित कट रचलेला आहे, मात्र मी यांच्या मुडक्यावर पाय देऊन नोंदी घेणार आहे.  त्यामुळे सगळ्या मराठा समाज बांधवांशी गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा विदर्भामध्येही जाणार आहे. आता मी त्यांना सोडणार नाही,मी यांची मस्ती पूर्णपणे जिरवून टाकणार आहे,  गरीब मराठा समाजातील लेकरांचा वाटोळं करण्याचं काम सध्या सुरू आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  अक्कल असणाऱ्या लोकांनी पक्षांमध्ये गेल्यावर अक्कल गहाण ठेवलेली असते, त्याला जातवान असावं लागतं, तेव्हाच त्याला गोरगरीब मराठ्यांच्या वेदना कळतात. त्या नेभळ्या भोऱ्याला काय कळणार आहे? असा हल्लाबोल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. मुंबईहून आल्यापासून मी फडणवीस साहेबांना एक शब्दही बोललो नाही, कारण आम्हाला अशा लागली होती की फडणवीस मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करतील, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा