AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांचा निर्णय पटला की नाही?, कौतुक की टीका?; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय?

सामाजिक संस्थांचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षाचा पाठिंबा लागतो. निवडणुकीत सगळ्यांचा पाठिंबा लागतो. तो सामाजिक संस्थांना मिळतोच असे नाही. राजकीय पक्षांना तसा पाठिंबा असतो, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे यांचा निर्णय पटला की नाही?, कौतुक की टीका?; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मनोज जरांगेंच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया काय ?
| Updated on: Nov 04, 2024 | 11:45 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर निवडणुकीच्या रण मैदानातून माघार घेतली आहे. त्यांनी सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले आहेत. जरांगे पाटील यांच्या या निर्णयाचं सत्ताधारी पक्षांनी आणि विरोधकांनी स्वागत केलं आहे. जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांनी चक्क जरांगे यांचं कौतुक केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे यांचं कौतुक केलं आहे. मी जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचे स्वागत करतो. देर आये दुरुस्त आये. एका समाजावर निवडणूक लढविणे शक्य नाही. इतर समाज साथ देत नाही. आता मराठा समाज मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेईल. सर्वच पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, त्यात 60 ते 70 टक्के मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय अतिशय योग्य आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

त्यावर मी काय बोलणार?

दलित आणि मुस्लिम नेत्यांनी यादी सादर केली नाही. म्हणून निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जरांगे म्हणाले. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जरांगे यांनी सांगितलं. त्यावर मी काय बोलणार? त्यांना सर्व धर्मीय आणि समाजाचा पाठिंबा हवा आहे असा त्याचा अर्थ आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

सामाजिक सलोखा राहील

मराठा आंदोलन हा भाग वेगळा आहे. मी समता परिषदेचे काम करतो. सामाजिक काम वेगळं. समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत नाही. तसेच आमच्या सामाजिक संस्थेचा सदस्य आहे म्हणून मतदान करा असे होत नाही. त्यांचे काम ते करतील त्रुटी सांगत राहतील. महाराष्ट्रातील निवडणूका मोकळ्या पद्धतीने होतील. सामाजिक सलोखा राहील असे वाटते, त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे उमेदवार मोकळेपणाने भूमिका मांडतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतल्या नेत्यांनी विचार करावा

नांदगावमध्ये उमेदवारी हा टॉपिक संपला आहे. समीर भुजबळने मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मग निवडणुकीला उभे राहिले. अपक्ष उभे राहिले पाहिजे. आम्ही घड्याळ चिन्ह दिले असते. आम्ही इथिक्स पाळले. आता मुंबईत बसलेल्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे, असा चिमटा त्यांनी काढला.

तर लोक चूक पोटात घालतात

अजित पवार यांनी बारामतीत चूक मान्य केली. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी नको द्यायला होती असं ते म्हणाले. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चूक झाली हे त्यांनी अनेक वेळा सांगितले. जाहीरपणे सांगितले तर लोक चूक पोटात घालतात, असं ते म्हणाले.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.