AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळांचं मंत्रिपद हुकलं, मनोज जरागेंची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट हल्लाबोल

मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला, त्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळांचं मंत्रिपद हुकलं, मनोज जरागेंची पहिली प्रतिक्रिया समोर, थेट हल्लाबोल
| Updated on: Dec 16, 2024 | 3:34 PM
Share

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला. यामध्ये छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, काल नाशिकमध्ये मोठं आंदोलन झालं. तर आज जालन्यात देखील आंदोलन करण्यात आलं.

छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. मी नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला डावललं काय आणि फेकलं काय, कितिदा मंत्रिपद आलं गेलं पण भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की मला मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याचं बक्षिस मिळालं आहे. दरम्यान आता भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का? घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नाही. मराठा राक्षणाच्या मारेकऱ्याचंं आम्हाला काही देणं घेणं नाही. असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर फार बोलणं टाळलं आहे. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षाही जरांगेंनी यावेळी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी जरांगे पाटील यांनी  केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे. मात्र दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसीमधून नको अंशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे. यावरून अनेकदा हे दोन्ही नेते समोरा-समोर आले आहेत.

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी