AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दोन तीन वेळा माझ्या मागे आला पण गेवराईतूनच…’, जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंबाबत नवा खुलासा

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असून, मोठा खुलासा केला आहे.

'दोन तीन वेळा माझ्या मागे आला पण गेवराईतूनच...', जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंबाबत नवा खुलासा
| Updated on: Feb 03, 2025 | 7:12 PM
Share

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक जण अद्यापही फरार आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे. आज पुन्हा एकदा बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडे हे आपल्याला भेटायला आले होते, त्यांनी त्यावेळी वाल्मिक कराडची माझ्याशी ओळख करून दिली, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे हे पाया पडले का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, यावर त्यांनी थेट बोलणं टाळत काही राजकीय सामाजिक संकेत असतात ते पाळावे लागतात मी पाळत असतो, येणारा प्रत्येक जण मदत करा म्हणत होता पाया पडणे हा लय मोठा विषय आहे असं मला वाटत नाही, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.  ‘धनंजय मुंडे हे मला मराठ्यांनी सांभाळलं असं सांगत होते, पण मग मराठ्यांनी सांभाळलं तर आता मराठ्यांचेच मुडदे पाडायला लागले का? ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. धनंजय मुंडेने मला दोन ते तीन वेळा भेटायचा प्रयत्न केला, गेवराईपर्यंत पण आला होता तिथून माघारी गेला नंतर आठ दिवसांनी परत भेटायला आला’

‘वाल्मीक कराड हा त्या वेळी तिथे आलेला मला माहीत नव्हत, धनंजय मुंडेंनी ओळख करून दिली होती, तेव्हा मी म्हणालो हा तोच आहे का हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा. अनेक राजकिय नेते मला भेटायला आले पण आम्ही कुणाला शब्द दिला नव्हता, देणारही नव्हतो कारण आमचं गणित जुळवणं सुरू होतं.  हार्वेस्टर खरेदी करणाऱ्या लोकांना वाल्मिक कराडने मारलं होतं ते लोक माझ्याकडे आले होते, माझ्याकडे लोक आल्यानंतर त्यांच्या एका मध्यस्थीने हा विषय मिटवला आणि तो विषय तिथे थांबला’ आसा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...